name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

नाशिकमध्ये अकरावे शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन (Eleventh Farmers Literary Conference organized in Nashik)

 नाशिकमध्ये अकरावे शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन (Eleventh Farmers Literary Conference organized in Nashik)

नाशिक : शेतकऱ्यांच्या व्यथा, शेती क्षेत्रातील स्थित्यंतरे व शेतीसंबंधी समग्र साहित्य जाणिवा मांडणाऱ्या नवसाहित्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन येत्या ४ व ५ मार्चला नाशिकमध्ये होणार आहे. 
संमेलन स्थळ: सह्याद्री फार्म्स 

       मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्ममध्ये युगात्मा शरद जोशी विद्यानगरी येथे होणाऱ्या अकराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे असतील, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उ‌द्घाटन होईल. 

    शेतकरी संघटनेतर्फे नाशिकमध्ये होणारे हे पहिले शेतकरी संमेलन आहे. याविषयी सह्याद्री  फार्म्सचे अध्यक्ष तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष विलास शिंदे, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी  पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

       आयोजन समितीच्या डॉ. मनीषा रिठे, प्रमोद राजेभोसले, ज्ञानेश उगले, शंकरराव ढिकले, सोपान संधान, निवृत्ती कर्डक, निर्मला जगझाप उपस्थित होते. संमेलनाला वन्हाडी कादंबरीकार तथा म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अॅड. वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील प्रमुख पाहुणे असतील. 

   साहित्य क्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत आहे. या प्रयत्नांचा एक भाग शेतकरी साहित्य संमेलन भरवले जाते. शेतकरी साहित्य चळवळीच्या प्रयत्नांना यश येऊन साहित्यिकांची नवीन पिढी अभ्यासपूर्ण, वास्तवचित्र, आक्रमक आणि सडेतोडपणे रेखाटायला लागली आहे, असे मत गंगाधर मुटे यांनी व्यक्त केले. 

    संमेलनात उदघाटन सत्र, शेतकरी कविसंमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविधांगी सत्र असणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इ.अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत.तरी सर्व शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

संमेलनाची  रूपरेषा 

४ मार्च रोजी  सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत उदघाटन सत्र. दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत 'शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोन या विषयावर ज्ञानदेव राऊत, विकास पांढरे, मधुसूदन हरणे, डॉ. सुरेश मोहितकर यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर शेतकरी कविसंमेलन होईल. सायंकाळी पाचला 'अॅग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण यांची प्रकट मुलाखत होणार आहे. सायंकाळी सात ते रात्री नऊपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

५ मार्च रोजी शेतकरी कविसंमेलनाने  प्रारंभ होईल, तर सकाळी साडेदहाला स्वानंद बेदरकर हे विलास शिंदे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत, त्यानंतर 'भारताकडून इंडियाकडे' याविषयावर चर्चासत्र, शेतकरी गझल मुशायरा व लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

स्वागताध्यक्ष विलास शिंदे

     यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सांगितले कि, "शेती व शेतकन्यांच्या समस्या वेगवेगळ्या व्यासपीठावरून मांडल्या  जातात. पण या साहित्य संमेलनातून शेतकऱ्यांना मार्ग दाखवण्यात येणार आहे. शेतकरी प्रचंड मेहनत घेतात. त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी है संमेलन उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.

डोळ्यांचा कोरडेपणा (Dry Eye Disease)

 डोळ्यांचा कोरडेपणा 
(Dry Eye Disease)

 डोळे,अश्रू किंवा डोळ्यातील पाणी  हे नेहमीच सुंदरता किंवा कवि कल्पना व शायरीचे विषय समजले जातात. व त्यामुळेच डोळ्यांचा कोरडेपणा ही समस्या किंवा त्याचे निदानही फारसे कोणी करून घेत नाही तर डोळे, अश्रू व डोळ्यांचा ओलावा या नेहमीच रोमँटिक गोष्टी नसून ६० ते ७० टक्के लोकसंख्येत कोरड्या डोळ्यांची समस्या आता वेगवेगळ्या प्रमाणात आढळते. कोरडे डोळे तुमच्या रोजच्या आयुष्याच्या गुणवत्तेवर किंवा आनंदावर परिणाम करू शकते व हा त्रास दिर्घकाळ राहू शकतो. 


Dolyancha kordepana
अश्रू तयार करण्यास सहभागी संरचना 


 माझ्या ओपीडीत येणाऱ्या रुग्णात ३० ते ४० टक्के रुग्ण हे डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, डोळ्यात कचरा गेल्यासारखे वाटणे, खाज येणे, लालसरपणा, थकवा, अचानक खूप पाणी येणे, दृष्टी कमी जास्त होणे ज्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो तर काही जण काम थांबवतात. डोळ्यांवर गार पाण्याचा शिपका मारतात किंवा चक्क डोळे बंद करून बसतात. बऱ्याच वेळा हे त्रास दुर्लक्षिले जातात. किंवा काही जण सहज मिळतील असे औषधाचे थेंब टाकतात. 

  डोळयांचा कोरडेपणा हा अनेक गोष्टीमुळे होऊ शकतो. डोळ्यांच्या नैसर्गिक अवस्थेतील बदल किंवा काही डोळ्यांच्या आजारामुळे ४०-५० वर्षावरील व्यक्ती, सहसा मेनोपॉजड स्रिया, कोरडे किंवा उष्ण वातावरण, वारा, ऊन, प्रदूषण या पर्यावरणीय गोष्टी  तसेच एअर कंडिशनची थंड व कोरडी हवा, स्क्रीन टाइम, काही शारीरिक आजार जसे संधिवात, थायोरॉईड ग्रंथीचा आजार, मधुमेह किंवा हार्मोनल बदल किंवा आजार, ऑटो इम्यून आजार, व काही प्रकारच्या औषधांचा साईड इफेक्ट या सर्वसामान्य गोष्टीमुळे कोरडेपणा ही समस्या उद्भवते. 
 
   कोरड्या डोळ्यांचा आजार हा डोळ्यांच्या बाह्य किंवा पृष्ठभागाचा रोग आहे. ज्यामुळे डोळ्यांचे अश्रू कमी तयार होतात. किंवा ते बाष्पीभवनाने लवकर सुकतात. यामुळे अश्रूंचा ओलावा कमी होऊन डोळ्याचा नैसर्गिक तोल बिघडतो. व डोळ्यांना चुरचुरते. डोळ्यांचा कोरडेपणा समजून घेण्यासाठी अश्रूंची माहिती घेणे किंवा डोळ्यांचा ओलावा जाणून घेणे आवश्यक आहे. डोळ्यातील पाण्याचा किंवा अश्रूंचा थर हा डोळ्यावर कायम समतल ओलावा ठेवतो. अश्रूच्या ओलाव्याचे तीन थर असतात. सर्वात वर तैलकट थर, मधला जलीय किंवा पाण्याचा थर जो ओलाव्याचा ९५ टक्के भाग असतो. व सर्वात तळाशी असतो तो म्युसिन किंवा निसरडा थर. 

   दोन मुख्य प्रकारचा डोळ्यांचा कोरडेपणा असतो. एकात कमी अश्रू तयार होतात व  दुसऱ्या प्रकारात अश्रुंचे बाष्पीभवन लवकर होते ह्यामुळे हा दुसऱ्या प्रकारचा कोरडेपणा जो अश्रुंचे लवकर बाष्पीभवन झाल्यामुळे ज्यात सर्वात वरचा तेलकट लिपिड द्रव्याचा थर कमी झाल्या कारणामुळे अश्रुंचे बाष्पीभवन लवकर होते व कोरडेपणाचे ठिपके बुब्बुळावर तयार होतात. एकंदरीत हा तेलकट थर अश्रूंचा सरंक्षित थरच असतो. डोळ्यांच्या कोरडेपणात डोळ्यातील अश्रूंचा थर व पृष्टभागावर बदल होतो. व त्यामुळे डोळ्यांची जळजळ व दृष्टी अस्पष्ट होते. 

   आजच्या युगात असे आढळून येते कि मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप खुप लोक वापरतात. व जी एक जीवनावश्यक गोष्ट आपल्याला स्वीकारावीच लागेल. बऱ्याच वेळा कामाचा भाग किंवा सोशल मीडियावरच्या टाईमपासमुळे स्क्रिनचा वापर खूपच वाढला आहे. स्क्रीन वापरतांना आपण त्यात इतके एकाग्र होतो कि डोळ्यांची उघडझाप कमी व्हायला लागते. किंवा अर्धवट होते. खूप वेळ डोळे उघडे राहिल्यामुळे अश्रूंचा सरंक्षित तेलकट थर अस्थिर होतो. या प्रकारच्या कोरड्या डोळ्यांवर सर्वसामान्य  टीअर सप्लिमेंट्स किंवा डोळ्यांचा ओलावा वाढवणारे ड्रॉप्स वापरून त्रास कमी करता येतो. 

२०-२०-२० चा नियम-

दिवसभर स्क्रिन वापरणाऱ्या लोकांसाठी हा नियम कोरडेपणा टाळण्यासाठी खूप उपयोगाचा आहे. यात दर २० मिनिट स्क्रिनवर काम केल्यावर २० सेकंदासाठी २० फूट दूरवर दृष्टी फिरवायची ज्यामुळे डोळ्यांचा ताण पण कमी होतो. काम करताना डोळ्यांची पूर्ण उघडझाप ही मिनिटात ३०-४० वेळा जाणीवपूर्वक करावी. स्क्रिन हा डोळ्यांच्या लेव्हलच्या खाली असावा. ज्यामुळे डोळे पूर्ण उघडावे लागत नाहीत. स्क्रिन उंचावर असल्यास डोळे पूर्ण उघडावे लागतात. त्यामुळे ते लवकर कोरडे पडतात. एअरकंडीशनर किंवा पंख्याचा झोत चेहऱ्यावर येऊ नये याची काळजीपण घेणे आवश्यक असते. 


  डोळ्यांच्या वरच्या व खालच्या पापण्यात जवळपास एकूण ८० ते १०० मेबोमियन ग्रंथी असतात. ज्या तेलकट सरंक्षित स्त्राव पापण्यांच्या कडेवर सोडतात या डोळे ओले ठेवण्याचे खूप महत्त्वाचे कार्य करतात. या ग्रंथीवर डोळ्यांचा ताण पडल्याने किंवा ग्रंथीवर सूज येऊन त्यांचे कार्य बिघडू शकते. त्यासाठी डोळ्यांना गरम शेक,  मसाज, काही एन्टीबायोटीक्स वापरून या ग्रंथीचे कार्य नियमित करता येऊ शकते. 

   कोरड्या डोळ्यांचा उपचार हा वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतो. उपचार हे कोरडेपणा कधीपासून आहे त्याची तीव्रता व कोणत्या कारणामुळे कोरडेपणा आला, वय, शारीरिक आजार, जीवनशैली, आहार इ. यासारख्या अनेक बदलांवर अवलंबून असतात. आता प्रगत तंत्रज्ञानाने कोरडेपणचे निदान, अश्रूंच्या तीन थरांचा कॉम्पुटर तपशील किंवा एनालिसिस व उपचार हे शक्य झाल्यामुळे  या त्रासांपासून सुटका होणे शक्य झालेय. 

  फक्त मोजक्या नेत्र रुग्णालयात किंवा फक्त काही नेत्र रोग तज्ज्ञ हे उपचार करतात कारण ही कॉम्पुटर टेकनॉलॉजी खर्चिक असल्यामुळे I R P L ( intense requalated pulsed light) या नवीन उपचार पद्धतीत विशिष्ट लाईट लहरींनी डोळ्याच्या पापण्यातील मेबोबियन  ग्रंथीचा आजार नाहीसा करून त्यांची कार्यक्षमता वाढवता येते. ज्यामुळे बाष्पीभवन जास्त झाल्याने (अश्रूंचा सर्वात वरचा संरक्षित तेलकट थर) कमी झाल्याने होणारा कोरडेपणा काही तासातच कमी करता येतो. 
   या उपचारात काही मिनिटातच कोणताही त्रास न होता रुग्णास डोळ्यांचा कोरडेपणा नियंत्रीत करता येतो. (पारंपरिक पद्धतीत खूप महिने डोळ्यांना शेक, औषध, मसाज खूप काळ किंवा महिने करावा लागतो) 

डोळ्यांच्या कोरडेपणा घालविण्याचे  घरगुती उपाय 

१) उन्हात व वाऱ्यात जातांना डोळा साईडने झाकणारे गॉगल्स वापरावे. 
२) डोळ्यांचा ओलावा वाढविणारे आर्टीफिसिएल टियर ड्रॉप्स वापरावे. 
३) डोळ्यांची उघडझाप आठवणीने करावी. 
४) २० मिनिटांनी स्क्रिन वरून २० सेकंद लांबवर/दूरवर बघा.
५) भरपूर पाणी प्या 
६) ओमेगा ३ फॅटी ऍसिड- अक्रोड, जवस जेवणात घ्या. 
७) डोळ्यांना सकाळ, संध्याकाळी गरम शेक द्या व पापण्यांचा मसाज करा. 
८) व्हिटॅमिन ए, बी व डी चे सेवन करा. 
९) नियमित योगासनांनी डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो. 
१०) स्क्रिनचा अतिवापर टाळा.

डॉ. शरद पाटील (मेडिकल डायरेक्टर)
सुशील आय केअर, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे केंद्र, नाशिक

शेतमाल विक्रीचा सखोल अभ्यास करावा : आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील (Agricultural produce sale should be studied in depth: Adarsh ​​Sarpanch Bharaskarrao Pere Patil)

शेतमाल विक्रीचा सखोल अभ्यास करावा : आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील

Agricultural produce sale should be studied in depth: Adarsh ​​Sarpanch Bharaskarrao Pere Patil


Agricultural produce sale should be studied in depth: Adarsh ​​Sarpanch Bharaskarrao Pere Patil
भास्करराव पेरे पाटील 

नाशिक : शेतकरी शेतात उत्तम दर्जाचे पीके घेतात. पण बाजारात गेल्यावर त्याला योग्य मोबदला मिळत नाही. याविषयी शेतकऱ्यांनी संघटित होऊन बाजाराचा अभ्यास करायला हवा, योग्य दर्जाच्या पीक उत्पादनाप्रमाणेच शेतमाल विक्रीचा सखोल अभ्यास करायला हवा असे प्रतिपादन आदर्श सरपंच भारस्करराव पेरे पाटील यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय व रोटरी क्लब देवळाली कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मेळाव्याचे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे होते. 

    ते पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनेत सहभाग नोंदवायला हवा. त्याला पैसे लागत नाही. पण योजनेत यश मिळाले तर बक्षीस म्हणून मिळणाऱ्या रकमेत गावाचा विकास करण्याची संधी मिळते. बक्षीस मिळाले नाही तरी आपले नुकसान काहीच होत नाही. याकडे भास्कर पेरे पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. भास्कर पेरे-पाटील यांनी त्यांच्या गावात राबविलेले विविध उपक्रम व शासकीय योजनांची माहिती दिली. वेळेत कर भरणाऱ्या शेतकरी वर्गाला ग्रामपंचायत  स्तरावर तीस टक्के सवलत दिल्याची माहिती भास्कर पेरे पाटील यांनी दिली. 

   यावेळी एस.व्ही.के.टी. व  महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ तसेच रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शेतकरी व आदर्श सरपंच पुरस्कार देऊन शेतकऱ्यांना गौरविले. यामध्ये आदित्य विलास धुर्जड, सुभाष मुरलीधर पाळदे, शिवराम बापूराव मुठाळ, गोकुळ प्रकाश जाधव, निरवूत्ती बाळू वाकचौरे, हिरामण दशरथ आडके, मीना गायकवाड यांना आदर्श शेतकरी म्हणून तर पंढरीनाथ ढोकणे यांना आदर्श सरपंच पुरस्कार यांचा गौरव झाला.  

ऍड.नितीन ठाकरे

मविप्रचे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे म्हणाले कि, मविप्रचे बहुतांश सभासद हे शेतकरी आहे. शेती व्यवसायात निर्माण होणाऱ्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी तसेच कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळविता येईल, हा प्रमुख उद्देश समोर ठेवून संस्थेच्या विविध शाखेत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले जाते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शेतीचे मार्गदर्शक तत्वे शेतकऱ्यांना समजावे. यासाठी शेतकरी मेळाव्यासारख्या उपक्रमांची आवश्यकता आहे.

मविप्रचे संचालक रमेश पिंगळे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. ते यावेळी म्हणाले कि, सतत बदलणारे वातावरण, हवामान, शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरले आहे. शासनाने तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांनी याविषयी शेतकरी वर्गाला मार्गादर्शन करायला हवे. महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

****************************************

नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी व नवतेजस्विता महोत्सव ( A five-day Agricultural and Navtejasvita Mahotsav in Nashik)

 

नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी व नवतेजस्विता महोत्सव
A five-day Agricultural and Navtejasvita Mahotsav in Nashik

३५ शेतकऱ्यांसह, महिला उद्योजकांचा होणार सन्मान


A five-day Agricultural and Navtejasvita Mahotsav in Nashik
शेतकरी सन्मान सोहळा

नाशिक : जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये  कृषी व नवतेजस्विता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाचदिवसीय महोत्सवामध्ये प्रयोगशील शेतकरी, महिला बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या महोत्सवात यशस्वी प्रयोग राबविणाऱ्या ३५ शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला उद्योजकांना सन्मानित केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी पत्रकार परिषद घेत महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. 


  गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर दि. १० ते १४ फेब्रुवारी याकाळात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडणार असल्याचे निकम यांनी सांगितले. महोत्सवामध्ये कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. सेंद्रिय शेतीसंदर्भातही शेतकऱ्यांना ली मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, तसेच महिलांचे बचतगट यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टॉल्सदेखील असतील. या व्यतिरिक्त खवय्यांना येथे महाराष्ट्रातील विविध भागांमधील खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे.


  महोत्सवामध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात विविध यशस्वी प्रयोग राबविणाऱ्या ३५ शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला उद्योजकांना सन्मानित केले जाणार आहे. तसेच, यंदाच्या वर्षांपासून कृषिपूरक उद्योजक या विभागातही पारितोषिक देण्यात येणार असल्याचे निकम यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कृषी विभागाचे जगदीश पाटील व महिला आर्थिक विकास महामंडळाचे संजय गायकवाड उपस्थित होते.


कृषी महोत्सवामध्ये सहा डोममध्ये तब्बल २५० स्टॉल्स असणार आहेत. त्यामध्ये सरकारी दालन, महिला बचतगट, कृषीनिविष्ठा व सिंचन विभाग, कृषी अवजारे, गृहोपयोगी वस्तू, तसेच खाऊगल्लीचा समावेश असेल. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपन्यांची वाटचाल, कृषी पर्यटन संघी व फायदे, खरेदीदार-विक्रेता संमेलन, महिला परिसंवाद यांसह विविध विषयांवर तज्ज्ञांचे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.


महापालिकेतर्फे 'पुष्पोत्सव' प्रदर्शनाचे आयोजन ('Pushpotsav' exhibition Organized by Municipal Corporation)

महापालिकेतर्फे 'पुष्पोत्सव' प्रदर्शनाचे आयोजन ('Pushpotsav' exhibition Organized by Municipal Corporation)

Pushpotsav exhibition Organized by Municipal Corporation
अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर

नाशिक :  महापालिकेकडून ९ ते ११ फेब्रुवारी या तीन दिवसाच्या दरम्यान पुष्पोत्सव (Pushpotsav)प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुष्पोत्सव प्रदर्शनात  नाशिककरांना फुलांचे विविध प्रकार पाहायला मिळणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी माहिती दिली.

पुष्पोत्सव प्रदर्शनाच्या निमित्ताने  विविध गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. त्यासाठी १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.  या पुष्पोत्सव प्रदर्शनात  ४२ नर्सरीचे स्टॉल व वीस फूड स्टॉल आहेत. महापालिका मुख्यालय आवारात पुष्पोत्सव प्रदर्शन होईल. प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात आली आहे. प्रांगणात सेल्फी पॉइंट, तर मिनोचर लैंडस्केपिंग तसेच महापालिका मुख्यालयाच्या तीनहीं मजल्यावर विविध प्रकारची गुलाबपुष्ये, मौसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या ठेवल्या जाणार आहेत.

Pushpotsav' exhibition Organized by Municipal Corporation

हे  पुष्पोत्सव  प्रदर्शन सर्वांसाठी मोफत राहील. सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल, या पुष्पोत्सवाचे उ‌द्घाटन अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर यांच्या हस्ते होईल. १० फेब्रुवारीला सकाळ सत्रात निसर्ग व फुलांवर आधारित कविता सत्र व सायंकाळी संगीतसंध्या होईल. ११ फेब्रुवारीला संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी विजेत्यांना ट्रॉफीचे वितरण अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते होईल. 

पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ९ फेब्रुवारीला सकाळी साडेसहा वाजता गणेशवाडी फूल बाजार येथून सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. पुष्पोत्सव प्रदर्शनात स्पर्धेव्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटिंग फुलांची माहिती देणारे छायाचित्र तमेच शिल्पकला व काव्यात्मक रचनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आयुष्यातीत सामाजिक व भावनिक विषय मांडणारी कलाकृती ठेवली जाणार आहे. ग्रामीण संस्कृती व मधमाशी यांचे महत्त्व दर्शविणारा देखावा पुष्पोत्सवात आहे.

या पुष्पोत्सव प्रदर्शनात  १७९७ प्रवेशिका आल्या असून गुलाब पुष्पे (खुला गट) या प्रकारात ४४६ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. त्याचबरोबर कृत्रिम आच्छादनाखालील गुलाबपुष्पे गटात २३०, तर गुलाबपुष्पे खुल्या गटात ८३ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. 

Pushpotsav' exhibition Organized by Municipal Corporation

मोसमी बहुवर्षीय फुलांच्या गटात ५२१, तर कुंडीतील शोभा व वनस्पती गटात  २६२ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. ११४ पुष्परचना व ४३ प्रवेशिका फळे व भाजीपाला गटात, तर ९८ प्रवेशिका कुंड्यांची सजावट व परिसर प्रतिकृती प्रकारात प्राप्त झाल्या आहेत. अशा एकूण १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. 

पुष्पोत्सवात पहिल्या मजल्यावर गुलाब पुष्परचना व शुष्क काष्ठ तर दुसऱ्या मजल्यावर मोसमी बहवर्षीय, बोन्साय, कॅक्टस फुले ठेवली जाणार आहे. तिसऱ्या मजल्यावर फळे व भाजीपाला तबक उद्यान व पुष्प रांगोळी असे प्रकार पाहायला मिळतील.

नाशिकमध्ये ८ ते १० मार्च दरम्यान ‘ऑटोथॉन’(AUTOTHON EXHIBITION)

नाशिकमध्ये ८ ते १० मार्च दरम्यान ‘ऑटोथॉन’(AUTOTHON EXHIBITION)

दुसरी आवृत्तीच्या वाहन प्रदर्शनाचे आयोजन; 
नामवंत ऑटोमोबाईल कंपन्यांचा सहभाग

नाशिक - कृषी आणि पर्यटन क्षेत्रात अग्रसेर असलेल्या नाशिक जिल्ह्यात तितकेच पूरक वातावरण ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रालाही लाभले आहे. हाच धागा पकडून नाशिकमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राला अधिकाधिक वाव मिळावा तसेच ऑटोमोबाईल हब म्हणून लौकिक मिळावा या उद्देशाने मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि.कडून नाशिकमध्ये 'ऑटोथॉन' या राज्यातील सर्वात मोठ्या वाहन प्रदर्शनाचे ८ ते १० मार्च २०२४ दरम्यान  दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक श्री. साहिल संजय न्याहारकर यांनी दिली.  

पर्यटनाच्या दृष्टिने महत्त्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये वाहन सुरक्षितता आणि गतिमानशीलता आणणे आवश्यक आहे. नाशिकमधील ऑटोमोबाईल क्षेत्र २० हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करून देत असून यावर शेकडो लघुउद्योग अवलंबून आहेत. नाशिककरांनी ऑटो स्पोर्ट्समध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. मोटोक्रॉस असो अथवा रॅलीज असो ऑटो स्पोर्टससाठी नाशिकची नेहमीच निवड केली जाते. वाहन निर्मितीमधील नवीन अपडेट्स, लहान-मोठ्या वाहनांची ओळख करून देण्यासाठी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. बी टू बी वाहन कंपन्या एकाच व्यासपीठावर एकत्रित आल्यास त्यांच्या व्यवसायवृद्धीलाही मदत मिळेल. 'ऑटोथॉन' च्या माध्यमातून या गोष्टी साध्य करता येतील, असा विश्वास श्री. न्याहारकर यांनी व्यक्त केला. 

नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत नामवंत अटोमोबाईल्स उत्पादक आणि त्यांच्याशी संलग्न मूळ उपकरणे निर्माता आहेत. नाशिकमध्ये ई-बाइक्सची निर्मिती होऊ लागली आहे. या ठिकाणी व्यवसायाच्या संधी, नवीन उत्पादनाची माहिती आणि सोबतच आकर्षक डिल्ससाठी सर्वसामावेशक व्यासपीठ निर्माण व्हावे, म्हणून ऑटोथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजक श्री. साहिल न्याहारकर यांनी सांगितले. 

ऑटोथॉन प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रमुख ऑटोमोबाईल ब्रँड्सना आमंत्रित करण्यात आले आहे. वाहन निर्माता कंपन्या नवीन मॉडेल आणि उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. वाहन क्षेत्रातील नवीन संकल्पना, संबंधित ब्रँडसचे नवे मॉडेल तसेच नाशिकमध्ये उपलब्ध नसलेले मॉडेल्स पाहण्याची सुवर्णसंधी वाहनप्रेमींना मिळणार आहे. नवीन उत्पादन लाँच करण्यासाठी आणि संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे एक व्यासपीठ असेल. वाहन चाहत्यांना व्हिंटेज कार पाहण्याची संधीही मिळणार आहे. तसेच एडव्हेंचर गेम्सचेही आयोजन करण्यात आले आहे. 

मागील वर्षीच्या ऑटोथॉन प्रदर्शनात ४० हुन अधिक कंपन्या स्टॉलधारक, ३०,००० हजाराहून अधिक व्हिजिटर्सनी ऑटोथॉनला भेट दिली होती. ३०० हुन  अधिक टेस्ट ड्राईव्ह झाल्या असून यशस्वीपणे दोन वर्कशॉपचे आयोजन केले होते. यावर्षी ऑटोथॉनमध्ये पहिल्या दिवशी ८ मार्च रोजी वॉव ग्रुपची २००० महिलांची रॅली निघणार असून महिला दिन साजरा होणार आहे. एमआरएफ मॉगग्रीप सुपर क्रॉस चॅम्पियनशीप आयोजित होणार असून १०० हुन अधिक प्रोफेशनल रायडर्स सहभागी होणार आहे. यात इंटरनॅशनल रायडर्स स्टंट करणार आहेत. ऑटोथॉनमध्ये विविध खाद्यपदार्थांची रेलचेल,मनोरंजनासाठी लाइव्ह संगीताचे आयोजन आणि ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडित ऍक्टिव्हिटीज होणार आहेत. ऑटोथॉनमध्ये सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक श्री. साहिल न्याहारकर यांनी केले आहे.

देशात दुसरी धवलक्रांती घडवण्यासाठी राष्ट्रिय गोकुळ मिशन' (National Gokul Mission' to create a second light revolution in the country)

देशात दुसरी धवलक्रांती घडवण्यासाठी 'राष्ट्रिय गोकुळ  मिशन'

National Gokul Mission' to create a second light revolution in the country

     दुग्ध व्यवसाय विकासावर सरकार भर देत असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम तयार केला जाईल. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेचा उल्लेख केला आहे.

Dairy yojna

     भारत हा सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. परंतु दुभत्या जनावरांची उत्पादकता कमी आहे. राष्ट्रिय गोकुळ मिशन, राष्ट्रिय पशुधन अभियान यासारख्या विद्यमान योजनांचे यश पाहता या धर्तीवर हा कार्यक्रम तयार केला जाईल.
      राष्ट्रिय गोकुळ मिशनसाठी केंद्र सरकारच्या एनआयइडीसीओ महामंडळ व नॅशनल डेअरी डेव्हलपेंट बोर्ड- एनडीडीबी संस्था केंद्रस्थानी आहे.  केंद्र सरकारची ही योजना असून देशात दुसरी धवल क्रांती घडवण्यासाठी केंद्रातील सरकारने २८ जुलै २०१४ रोजी राष्ट्रीय गोकुळ मिशन या योजनेची सुरुवात केली होती.

राष्ट्रीय गोकुळ मिशनचा उद्देश :
  • दुभत्या जनावरांच्या स्वदेशी जातींचा विकास

  • स्वदेशी पशुंसाठी वाण सुधार कार्यक्रम यामुळे अनुवांशिक सुधार व पशुसंख्येमध्ये वृद्धी
  • दूध उत्पादन व उत्पादकता वाढवणे
  •  साहिवाल, राठी, देवणी, थारपारकर, रेड सिंधी आणि जातिवंत स्वदेशी वाणांच्या माध्यमातून अन्य वाणाना उन्नत बनवणे.
  • योजनेमार्फत उच्च अनुवांशिक योग्यतेच्या सांडचे वितरण.

       केंद्र सरकारने या योजनेसाठी २०१४-१५ मध्ये १५० कोटी वितरीत केले होते. बाराव्या पंचवार्षिक योजनेत ५०० कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे.

खालील कामासाठी पुरवला जातो निधी :

१) गोकुळ मिशन अंतर्गत एकीकृत स्वदेशी पशु केंद्र म्हणजे गोकुळ ग्राम बनवणे. 

२) उच्च अनुवंशिक क्षमतेच्या स्वदेशी वाणाच्या संरक्षणासाठी मदर्स फॉर्म्स मजबूत करणे.

३) प्रजनन तंत्रात क्षेत्र प्रदर्शन रेकॉर्डिंग (एफपीआर)स्थापना.

४) जर्म प्लाजम संरक्षण संस्था/संघटनांना मदत देणे.

५) स्वदेशी वाणांच्या जातिवंत जनावरांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्याना अर्थिक मदत

६) शेतकऱ्यांना पुरस्कार (गोपाल रत्न) आणि ब्रिटन सोसायटी (कामधेनू) बनवणे.

७) स्वदेशी वाणांसाठी वेळोवेळी दुग्ध उत्पादन स्पर्धा.

८) स्वदेशी पशु विकास कार्यक्रम संचालित करणाऱ्या संस्थांमध्ये काम करणारे तांत्रिक व अतांत्रिक लोकांना प्रशिक्षण कार्यक्रम.

गोकुळ ग्राम बनवणे :

१) गोकुळ ग्राम देशी पशु केंद्र आणि स्वदेशी वाणांच्या विकासासाठी केंद्रस्थानी काम करणे. या प्रोजेक्टचा मुख्य हेतू हा आहे की नवनवीन ब्रीड तयार करणे आणि दुग्ध व्यवसाय उत्पादन वाढविणे.(आयव्हीएफ तंत्रज्ञान किंवा बुल वापरून)

२) गोकुळ ग्राम मूळ प्रजनन भाग व शहरी आवाससाठी जनावरांसाठी मोठ्या शहरात बनवण्यात आले आहे.

३) शेतकऱ्याना उच्च आनुवंशिक प्रजनन स्टॉकचा पुरवठा करण्यासाठी एक विश्वासू स्त्रोत आहे.

४) गोकुळ ग्राम शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रात आधुनिक सुविधा प्रदान करते.

५) एक हजार जनावरांच्या क्षमता असणाऱ्या या गोकुळ ग्राममध्ये दुग्ध उत्पादक आणि अनुत्पादक जनावरांचे प्रमाण ६०:४० असे असते. गोकुळ ग्राम पशूंच्या पोषणसंबंधी आवश्यकता पुर्ण करण्यासाठी घरात चारा उत्पादन करण्यासाठी बनवण्यात आले आहे.

Dairy yojna

६) राष्ट्रिय गोकुळ मिशन प्रोजेक्टसाठी २०० देशी, एचएफ, साहिवाल, देवणी, गीर गाई  किंवा २०० म्हशी (मुरा किंवा जाफराबादी) दोन्ही पैकी एक, २०० अनिवार्य किंवा दोन्ही मिळून १०० गाई आणि १०० म्हशी असे २०० करू शकता).

प्रोजेक्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी:

१) सिबिल स्कोर ७००+ आवश्यक आहे (सेटलमेंट, NPA किंवा राईट ऑफ केलेले नसावे). आणि चालू महिन्यामध्ये ट्रान्स युनियन मधून काढलेला सिबील रिपोर्ट आवश्यक आहे.

२) पाच एकर जमीन असणे आवश्यक आहे स्वतःच्या नावे किंवा लिझने म्हणजे रीतसर शासकीय रजिस्ट्रेशन करुन १० वर्षासाठी घेणे आवश्यक आणि त्या जमिनीची मार्केट व्हॅल्यू (२कोटी) होणे आवश्यक आहे,
       जर जमीन लिझने भाडे तत्वावर घेणार असाल तर ज्यांची जमीन घेणार आहात त्यांचा पण सिबील स्कोअर ७००+ लागेल आणि जमीन मॉर्गेज करण्यासाठी त्यांचे समत्ती पत्र घेणे गरजेचे आहे.

३) टोटल प्रोजेक्ट हा ४.५ कोटीचा आहे, ज्यामध्ये २ कोटी लोन उपलब्ध होईल, २ कोटी सबसिडी असेल आणि टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या १०% टक्के म्हणजे ४५-५० लाख स्वतःची गुंतवणुक आवश्यक आहे असा टोटल ४.५ कोटी चा प्रोजेक्ट आहे.

४) नॅशनल बँकेकडून १००% सेक्युर कर्ज २ कोटी उपलब्ध करून देण्यात येते, त्याच्या बदल्यात बँकेला २कोटीचे मोर्गेज(तारण) करून देणे आवश्यक आहे, आणि ज्या जमिनीवर प्रोजेक्ट उभारणार आहात तीच जमीन मॉर्गेज(तारण) करुन देणे आवश्यक आहे, आणि त्या जमिनीची मार्केट व्हॅल्यू २कोटी होणे गरजेचे आहे जर जमिनीची किंमत मार्केट व्हॅल्यू नुसार २कोटी होत नसेल तर पर्याय म्हणून घर, मोकळी जागा,एन ए प्लॉट हेही मोर्गेज करु शकता.

५) रेट ऑफ इंटरेस्ट ७.५ ते ११.५ टक्केपर्यंत असेल आणि कर्ज परतफेड (३ / ५ /  ७) वर्ष अशी असेल, (कर्जाचा हप्ता २.४० लाखपर्यंत लोन रकमेनुसार असेल आणि हप्ता हा - महिन्याला, ३ महिन्याला किंवा ६ महिन्याला करु शकता)
      लोन हे रीडूसिंग पद्धतीचे असेल आणि सबसिडीही लोन सोबत समतोल स्वरूपात किंवा थोड्या कालांतराने येईल. जी ८ टप्यामध्ये जमा होत जाईल. सरकारी नियमानुसार सबसिडी जमा होण्याच्या नियमामधे बदल होऊ शकतो. २०० गाईंच्या १० टक्के नवीन पिल्ले(कालवडी स्वरुपात)जन्माला आली की सबसिडीचा शेवटचा हप्ता वर्ग होईल. 

६) गाई किंवा म्हैस खरेदी करणे आणि दूध विक्री करणे ह्यावर कोणतेही सरकारी बंधन नसेल, उपब्धतेनुसार गाई खरेदी आणि दूध विक्री करता येईल.

७) लोन आणि सबसिडीची रक्कम ही कॅश स्वरूपात हाताळता येणार नाही, ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या खात्यातून समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा करावी लागेल. कोटेशन किंवा किमतीनुसार ती वळती होईल.

© दीपक केदू अहिरे, 
नाशिक

शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेती (Bamboo farming for sustainable income)

शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेती 
Bamboo farming for sustainable income 

  बांबू (Bamboo) ही जलद वाढणारी, सदाहरीत व दिर्घायु प्रजाती आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळते. 


Bamboo farming
बांबू शेती 

 आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास हिरवे सोने असे म्हटले जाते. देशात बांबूची बाजारपेठ सुमारे २६ हजार कोटीची असून त्यामध्ये बांबू फर्निचर, बांबू पल्प, बांबू मॅट बोर्ड, कार्टेज इंडस्ट्रीज, प्लाय बोर्ड आदी समाविष्ट आहे.बांबू लागवडीमुळे शेत जमीनीची धूप व जलसंवर्धन या दोन्ही बाबींचा सुध्दा फायदा मिळतो. 

  राज्यातील सर्व महामार्गाच्या दुतर्फा बांबू लावण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.वातावरण बदलाच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेत केले.  

हवामान : 
  • समशीतोष्ण हवामानात बांबूची लागवड करावी. ज्या भागातील सरासरी वार्षिक तापमान ८.८ ते ३६ अंश सेल्सिअस असते.
  •  ज्या भागात  ७० ते १०० मिलिमीटर पाऊस पडतो अशा वातावरणात बांबूचे उत्पादन घेता येऊ शकते.
  • बांबूची लागवड संपूर्ण भारतात केली जाते. बांबूची मुळे ३ ते ४ फुटांपर्यंत वाढतात. याला सोटमूळ नाही, फक्त तंतुमय मुळे आहेत.
  • खड्डा खणताना तो २ फूट x २  फूट x २  फूट  किंवा ३ फूट x ३ फूट x २ फूट खणावा. 
जमीन : 
  • बांबू हे पीक कोणत्याही जमिनीत येते. हे पीक जमिनीच्या बाबतीत चोखंदळ नाही. 
  • वालुकामय किंवा चिकणमाती असल्येल्या जमिनीत बांबू पीक चांगले येते. 
  • मातीचे तापमान हे ६.५ ते ७.५ असावे. अधिक उताराच्या जमिनीमध्ये बांबूचे उत्पादन घटू शकते. 
  • सपाट व कमी उताराची जमीन बांबू उत्पादनासाठी योग्य ठरते.

  • बांबू लागवडीसाठी साधारणतः नदीकाठ किंवा खडकापासून बनलेल्या वालुकामय चिकन ते चिकन पोयटा प्रकारची जमीन योग्य मानली जाते. 
  • थोडक्यात उतारावरील, वरकस किंवा मुरुमाड जमीन लागवडीसाठी सर्वांत चांगली असते. 
  • काळी जमीन ही जरी चांगली असली तरी इतर भुसार पिके घेणे शक्य नसेल तरच लागवड करावी.
रोपवाटिका : 
  • साधारणपणे बांबूची रोपवाटिका मार्च ते एप्रिल महिन्यात केली जाते. 
  • बांबूला कलम तयार करुन बांबू रोपे तयार केली जातात. 
  • उत्तम बांबू रोपे आणि प्रजातीच्या शुद्धतेची गुणवत्ता टिकवून ठेवणे व मोठया प्रमाणात बांबू रोपांच्या निर्मितीसाठी टिश्यूकल्चर बांबू रोपे तयार करणे हा एक उत्तम पर्याय आहे.
पाणीपुरवठा : 
  • बांबूच्या लागवडीला भरपूर पाणी लागते म्हणून नियमितपणे पाणीपुरवठा होणाऱ्या जामिनीत बांबूची लागवड करणे गरजेचे आहे.
  • ठिबक सिंचनावर या रोपांची लागवड केल्यास त्याची वाढ झपाट्याने होते.
  • बांबू लागवडीखाली किमान तीस वर्षे जमीन गुंतवून ठेवणार आहोत हे लक्षात घेऊन नियोजन करावे. 
  • पूर्ण अभ्यास करून बांबू लागवडीकडे वळावे व यथायोग्य पाण्याचे नियोजन करावे. 
जाती
  • बांबूच्या शेकडो जाती पाहायला मिळतात. बांबूसा ओर्डीनेऐसी, बांबूसा पॉलीमॉर्फा, किमोनोबांबूसा, डेंड्रोकलामस हामिटोनी आणि मेलोकाना बेकीफेरा या सर्वात लोकप्रिय जाती आहेत. 
  • महाराष्ट्रात बांबूच्या १२१ जाती असून त्यापैकी कळक, काटेरी, मानगा, चिवा, चिवारी, मोठा बांबू, पिवळा बांबू इ. जाती कोकणात आढळून येतात. 
  • व्यावसायिकदृष्ट्या कळक, मानवेल, माणगा व मेस या बांबूच्या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. 
  • राष्ट्रीय बांबू मिशनने देशामध्ये बांबूची व्यावसायिक दृष्टीने लागवड करण्यासाठी १७ प्रजातींची शिफारस केली आहे. 
लागवड : 
  • बांबूची लागवड जमिनीत बिया टाकूनही होऊ शकते. बांबूची रोपे तयार करून याची लागवड करू शकतात. 
  • बांबूच्या उरलेल्या मुळया टोकून  बांबूची लागवड होऊ शकते. 
  • बांबूची शक्यतो रोपे नर्सरीमधून आणून लागवड करतात. या पद्धतीने लागवड केल्यास कमी वेळेत जास्त नफा मिळू शकतो. 
  • सरकारी रोपवाटिकेत बांबूची मोफत रोपे मिळतात. 
  • अलीकडे बांबूचा समावेश गवतवर्गीय पिकात समावेश केल्यामुळे बांबूची लागवड आता शेतात किंवा बांधावरही करता येऊ शकते.
  • बांबूची लागवड पावसाळ्यात करता येते. मात्र सिंचनाची व्यवस्था असल्यास नोव्हेंबर डिसेंबर मध्येही लागवड करता येते. 
आंतरपीक : 
  • बांबू पिकात आंतरपीक म्हणून अद्रक, हळद, भाजीपाला  पिकांची  लागवड करता येऊ शकते. 
  • परसबाग, शेतीच्या बांधावर, मृदसंवर्धनासाठी तसेच बांबूची व्यावसायिक लागवड शक्य आहे. 
  • सर्वसाधारणपणे पहिली दोन वर्षे नेहमीची पिके बांबू लागवडीत मिश्रपीक म्हणून घेता येतात. नंतर बांबूची सावली वाढते, त्यामुळे मिश्र पिकांचे उत्पादन मिळत नाही.
  • बांबू प्रजातीचे जीवनचक्र ४० -१०० वर्ष असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही.
लागवडीचे अंतर : 
  • कमी व्यासाच्या जातीसाठी ३x३ मी., मध्यम व्यासाकरिता (उदा. माणगा, माणवेल इ.) ५x५ मी. आणि अधिक मोठ्या व्यासाच्या बांबूसाठी ७x७ मी. तर हेमिलटोनीसाठी १०x१० मी अंतराची शिफारस करण्यात आलेली आहे. 
  • बांबूच्या बेटांमध्ये दरवर्षी 8-10 नवीन बांबू तयार होत असतात. 
  • पाणी साचलेल्या जमिनीवर, क्षारयुक्त जमिन तसेच मुरमाड जमिनीवर सुध्दा बांबूची लागवड यशस्वीरित्या होवू शकते. 
खतव्यवस्थापन : 
  • सुरवातीला बांबू लागवड करताना शेणखत किंवा गांडूळखत दिले तर पीक जोमाने येते. 
  • लागवड करण्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यातून पाच किलो कंपोस्ट किंवा गांडूळखत, युरिया १०० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट १०० ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश ५० ग्रॅम मिसळावे. 
  • रोपे खड्ड्याच्या मधोमध सरळ उभी ठेवून माती एका पेरापर्यंत घट्ट लावून घ्यावी.  त्यानंतर रोपाभोवती माती पसरवून आच्छादन करून घ्यावे. 
  • रोपाच्या भोवती पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 
  • बांबूच्या लागवडीमध्ये तुम्हाला खते किंवा खतांवर जास्त पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. 
तणनियंत्रण : 
  • लागवडीनंतर दर महिन्याला पिकात खुरपणी करावी  
  • वेळोवेळी तण काढल्याने तण नष्ट होतात. याचा पिकाला फायदा होतो. बांबूच्या रोपांभोवती  गोल आळे मारून घ्यावे. 
कापणी : 
  • बांबूची कापणी तीन वर्षांनी करू शकतात. 
  • तुम्हाला सुरुवातीला तीन वर्षे वाट पहावी लागेल पण नंतर तुम्ही दरवर्षी बांबूची कापणी करू शकतात.  
  • बांबू  एकदा लावल्यानंतर ते तुम्हाला अनेक वर्षे उत्पन्न देते.  
अर्थशास्त्र : 
  • एक एकर बांबू शेतीत ९०० रोपे बसल्यास एका बांबूपासून चार बांबूची झाडे निघतात याप्रमाणे तीन वर्षात ३६०० बांबूची झाडे मिळतात. 
  • आज ४० फूट बांबू सरासरी ६० रुपये दराने विकल्यास तरी २,१६००० दरवर्षी मिळतात.  
बाजारपेठ : 
  • बांबूपासून उत्पन्न होणाऱ्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. 
Bamboo farming
बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तू

फायदे : 
  • बांबूपासून घर,छप्पर, चटई, टेबल अशा अनेक वस्तू बनवता येतात. 
  • बांबूपासून इथेनॉलही बनवता येत असल्याने आगामी काळात बांबूची मागणी वाढणार आहे. 
  • बांबू शेतीपासून आर्थिक उन्नती आणि रोजगाराच्या भरपूर संधी बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना मिळत आहेत. 
  • बांबूचे सुमारे १५०० प्रकाराने कामकाजासाठी उपयोग होतो. 
  • बांबूचा उपयोग खाण्यासाठी तसेच कृषी अवजारे, घरबांधणी, हस्तकला, पेपर निर्मिती इ. कामासाठी होतो.
  • बांबू हा लाकडाला उत्तम पर्याय असून फर्निचर,पार्टीशन निर्मितीसाठी उपयुक्त आहे. 
  • एक बांबू ३२० किलो प्राणवायू निर्माण करतो. 
  • कार्बनचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतो. इतर वृक्षांच्या तुलनेत ३० टक्के जास्त कार्बन शोषण करण्याची क्षमता बांबूमध्ये आहे.
अनुदान योजना  
  • अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी आर्थिक अनुदान देते. 
  • अटल बांबू समृद्धी योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग खात्यामार्फत सुरु करण्यात आली आहे.बांबू लागवडीला प्रोत्साहन म्हणून प्रती हेक्टरी ७ लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

****************************************

भारतातील हरितक्रांतीचे जनक : एम.एस. स्वामीनाथन (Father of Green Revolution in India : M.S. Swaminathan)



भारतातील हरितक्रांतीचे जनक : एम.एस. स्वामीनाथन 
Father of Green Revolution in India : M.S.  Swaminathan

Haritkrantiche janak: m.s. swaminathan 
M.S. Swaminathan

  डॉ. मोंकोम्बू सांबासिवन स्वामीनाथन हे एक प्रसिद्ध भारतीय कृषीशास्त्रज्ञ आहेत. ज्यांना आपण सर्व  एम्.एस. स्वामीनाथन या नावाने ओळखतो. भारतीय कृषी इतिहासात डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जाते. 

 भारतातील दुष्काळी परिस्थितीत डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी केलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला, तसेच देश आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना "भारतीय हरित क्रांतीचे जनक" म्हटले जाते. देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून केंद्र शासनाने त्यांना २०२४ मध्ये "भारतरत्न" या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. 

    या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिनांक ७ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्र शासनाने शाश्वत शेती दिन" म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे

अतुलनीय समर्पण

 ज्यांनी हरितक्रांतीद्वारे भारतातील कृषीक्षेत्र बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.  तामिळनाडूतील कुंभकोणम येथे ७ ऑगस्ट १९२५ रोजी जन्मलेल्या स्वामिनाथन यांचे अन्नसुरक्षा सुधारण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण कृषी पद्धतींचा अवलंब करून भूकबळी कमी करण्यासाठी त्यांचे अतुलनीय समर्पण आहे

कृषीक्षेत्राला आकार

     डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचे जीवन आणि कार्य हे विज्ञानाच्या परिवर्तनशील शक्तीचा आणि एका उदात्त कार्यासाठी समर्पणाचा पुरावा आहे.  कृषी क्षेत्रातील त्यांच्या अग्रगण्य प्रयत्नांमुळे लाखो भारतीयांसाठी केवळ अन्नसुरक्षाच नाही तर शास्त्रज्ञांच्या भावी पिढ्यांना शाश्वत आणि पर्यावरणपूरक कृषी पद्धतींसाठी काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. भारतातील हरितक्रांतीचे जनक म्हणून एम.एस. स्वामिनाथन यांचा वारसा देशाच्या कृषीक्षेत्राला आकार देत आहे आणि हे नावीन्यपूर्ण आणि प्रगतीचे चिरस्थायी प्रतीक आहे.

 जीवनप्रवास आणि शिक्षण 

      एम.एस. स्वामिनाथन यांचा एक प्रतिष्ठित कृषीशास्त्रज्ञ होण्याचा प्रवास भक्कम शैक्षणिक पायापासून सुरू झाला.  त्यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) मधून कृषी विज्ञान विषयात बॅचलर पदवी घेतली.  त्यानंतर त्यांनी युनायटेड स्टेट्समधील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातून जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्यानंतर पीएच.डी. त्याच संस्थेतून कृषी वनस्पतिशास्त्रात केली.

करिअरची सुरुवात

      १९५० दशकाच्या सुरुवातीस भारतात परतल्यानंतर स्वामीनाथन यांनी देशाच्या कृषीक्षेत्राला आकार देणारा प्रवास सुरू केला. त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रवेश घेतला आणि नंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेत (ICAR) प्रमुख पदे भूषवली. त्यांचे कार्य प्रामुख्याने उच्च-उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जातींच्या प्रजननावर केंद्रित होते. जे देशातील अन्नटंचाईच्या सततच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करतात.

हरितक्रांती 

    एम.एस स्वामिनाथन यांची कारकीर्द १९६०च्या दशकात आली. जेव्हा त्यांनी नॉर्मन बोरलॉगसह इतर शास्त्रज्ञांसोबत  सहकार्य करून भारतात हरितक्रांतीची ओळख करून दिली. ज्यावेळी भारताला वारंवार अन्नसंकटांचा सामना करावा लागत होता. आणि उपासमारीचा धोका मोठा होता तेव्हा स्वामीनाथन यांचे समर्पण आणि दूरदृष्टी उच्च-उत्पादक पीक जाती विशेषत: गहू आणि तांदूळ विकसित आणि अंमलात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

भारतातील हरितक्रांतीचे जनक

   हरितक्रांतीने पीक उत्पादनात  वाढ घडवून आणली. प्रामुख्याने या उच्च-उत्पादनाच्या वाणांची लागवड सुधारित सिंचन पद्धती आणि खते आणि कीटकनाशकांचा वापर  याने केवळ अन्नसंकट टळले नाही तर भारताला अन्न उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण राष्ट्र बनवले.  स्वामीनाथन यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांना "भारतातील हरितक्रांतीचे जनक" अशी उपाधी मिळाली.

योगदान आणि वारसा 

  एम.एस. स्वामीनाथन यांचे भारतीय शेतीतील योगदान हरितक्रांतीपुरते नसून त्याच्या पलीकडे आहे.  पर्यावरणीय समतोल आणि जैवविविधतेचे जतन करण्यावर भर देऊन शाश्वत कृषी पद्धतींचा पुरस्कार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  त्यांच्या नाविन्यपूर्ण पध्दतीमध्ये सेंद्रिय शेतीच्या वापरास प्रोत्साहन देणे, पर्यावरणास अनुकूल कीटक व्यवस्थापन आणि देशी पिकांच्या जातींचे संवर्धन करणे समाविष्ट आहे. 

स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना

 स्वामीनाथन त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत  गरिबांचे जीवनमान सुधारणे आणि गरिबी कमी करणे या उद्देशाने अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या कार्याला वाहून घेतले. त्यांनी स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) १९८८ मध्ये स्थापन केले. हे  फाउंडेशन शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि अन्नसुरक्षा या दिशेने कार्य करत आहे.

मिळालेले पुरस्कार 

    एम.एस. स्वामिनाथन यांच्या कृषी आणि अन्न सुरक्षेतील  योगदानामुळे त्यांना १९८७ मध्ये प्रतिष्ठित जागतिक अन्न पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांसह पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार देखील मिळाले आहेत. एम.एस. स्वामिनाथन यांचे निधन २८ सप्टेंबर २०२३ रोजी झाले आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. भारतातील कृषी क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...