नाशिकमध्ये अकरावे शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन (Eleventh Farmers Literary Conference organized in Nashik)
नाशिक : शेतकऱ्यांच्या व्यथा, शेती क्षेत्रातील स्थित्यंतरे व शेतीसंबंधी समग्र साहित्य जाणिवा मांडणाऱ्या नवसाहित्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन येत्या ४ व ५ मार्चला नाशिकमध्ये होणार आहे.
मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्ममध्ये युगात्मा शरद जोशी विद्यानगरी येथे होणाऱ्या अकराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे असतील, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होईल.
शेतकरी संघटनेतर्फे नाशिकमध्ये होणारे हे पहिले शेतकरी संमेलन आहे. याविषयी सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष विलास शिंदे, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
आयोजन समितीच्या डॉ. मनीषा रिठे, प्रमोद राजेभोसले, ज्ञानेश उगले, शंकरराव ढिकले, सोपान संधान, निवृत्ती कर्डक, निर्मला जगझाप उपस्थित होते. संमेलनाला वन्हाडी कादंबरीकार तथा म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अॅड. वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील प्रमुख पाहुणे असतील.
साहित्य क्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत आहे. या प्रयत्नांचा एक भाग शेतकरी साहित्य संमेलन भरवले जाते. शेतकरी साहित्य चळवळीच्या प्रयत्नांना यश येऊन साहित्यिकांची नवीन पिढी अभ्यासपूर्ण, वास्तवचित्र, आक्रमक आणि सडेतोडपणे रेखाटायला लागली आहे, असे मत गंगाधर मुटे यांनी व्यक्त केले.
संमेलनात उदघाटन सत्र, शेतकरी कविसंमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविधांगी सत्र असणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इ.अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत.तरी सर्व शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
संमेलनाची रूपरेषा
४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत उदघाटन सत्र. दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत 'शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोन या विषयावर ज्ञानदेव राऊत, विकास पांढरे, मधुसूदन हरणे, डॉ. सुरेश मोहितकर यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर शेतकरी कविसंमेलन होईल. सायंकाळी पाचला 'अॅग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण यांची प्रकट मुलाखत होणार आहे. सायंकाळी सात ते रात्री नऊपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
५ मार्च रोजी शेतकरी कविसंमेलनाने प्रारंभ होईल, तर सकाळी साडेदहाला स्वानंद बेदरकर हे विलास शिंदे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत, त्यानंतर 'भारताकडून इंडियाकडे' याविषयावर चर्चासत्र, शेतकरी गझल मुशायरा व लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सांगितले कि, "शेती व शेतकन्यांच्या समस्या वेगवेगळ्या व्यासपीठावरून मांडल्या जातात. पण या साहित्य संमेलनातून शेतकऱ्यांना मार्ग दाखवण्यात येणार आहे. शेतकरी प्रचंड मेहनत घेतात. त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी है संमेलन उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
आभार सर
उत्तर द्याहटवा