name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी व नवतेजस्विता महोत्सव ( A five-day Agricultural and Navtejasvita Mahotsav in Nashik)

नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी व नवतेजस्विता महोत्सव ( A five-day Agricultural and Navtejasvita Mahotsav in Nashik)

 नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी व नवतेजस्विता महोत्सव
A five-day Agricultural and Navtejasvita Mahotsav in Nashik

A five-day Agricultural and Navtejasvita Mahotsav in Nashik
शेतकरी सन्मान सोहळा

३५ शेतकऱ्यांसह, महिला उद्योजकांचा होणार सन्मान

नाशिक : जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये  कृषी व नवतेजस्विता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाचदिवसीय महोत्सवामध्ये प्रयोगशील शेतकरी, महिला बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या महोत्सवात यशस्वी प्रयोग राबविणाऱ्या ३५ शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला उद्योजकांना सन्मानित केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी पत्रकार परिषद घेत महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. 


  गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर दि. १० ते १४ फेब्रुवारी याकाळात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडणार असल्याचे निकम यांनी सांगितले. महोत्सवामध्ये कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराचे क प्रात्यक्षिक सादर केले जाईल. सेंद्रिय शेतीसंदर्भातही शेतकऱ्यांना ली मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, तसेच महिलांचे बचतगट यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टॉल्सदेखील असतील. या व्यतिरिक्त खवय्यांना येथे महाराष्ट्रातील विविध भागांमधील खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे.


  महोत्सवामध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात विविध यशस्वी प्रयोग राबविणाऱ्या ३५ शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला उद्योजकांना सन्मानित केले जाणार आहे. तसेच, यंदाच्या वर्षांपासून कृषिपूरक उद्योजक या विभागातही पारितोषिक देण्यात येणार असल्याचे निकम यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कृषी विभागाचे जगदीश पाटील व महिला आर्थिक विकास महामंडळाचे संजय गायकवाड उपस्थित होते.


कृषी महोत्सवामध्ये सहा डोममध्ये तब्बल २५० स्टॉल्स असणार आहेत. त्यामध्ये सरकारी दालन, महिला बचतगट, कृषीनिविष्ठा व सिंचन विभाग, कृषी अवजारे, गृहोपयोगी वस्तू, तसेच खाऊगल्लीचा समावेश असेल. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपन्यांची वाटचाल, कृषी पर्यटन संघी व फायदे, खरेदीदार-विक्रेता संमेलन, महिला परिसंवाद यांसह विविध विषयांवर तज्ज्ञांचे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.


No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...