देशात दुसरी धवलक्रांती घडवण्यासाठी 'राष्ट्रिय गोकुळ मिशन''(National Gokul Mission' to create a second light revolution in the country)
दुग्ध व्यवसाय विकासावर सरकार भर देत असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम तयार केला जाईल. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेचा उल्लेख केला आहे.
भारत हा सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. परंतु दुभत्या जनावरांची उत्पादकता कमी आहे. राष्ट्रिय गोकुळ मिशन, राष्ट्रिय पशुधन अभियान यासारख्या विद्यमान योजनांचे यश पाहता या धर्तीवर हा कार्यक्रम तयार केला जाईल.
राष्ट्रिय गोकुळ मिशनसाठी केंद्र सरकारच्या एनआयइडीसीओ महामंडळ व नॅशनल डेअरी डेव्हलपेंट बोर्ड- एनडीडीबी संस्था केंद्रस्थानी आहे. केंद्र सरकारची ही योजना असून देशात दुसरी धवल क्रांती घडवण्यासाठी केंद्रातील सरकारने २८ जुलै २०१४ रोजी राष्ट्रीय गोकुळ मिशन या योजनेची सुरुवात केली होती.
राष्ट्रीय गोकुळ मिशनचा उद्देश :
- दुभत्या जनावरांच्या स्वदेशी जातींचा विकास
- स्वदेशी पशुंसाठी वाण सुधार कार्यक्रम यामुळे अनुवांशिक सुधार व पशुसंख्येमध्ये वृद्धी
- दूध उत्पादन व उत्पादकता वाढवणे
- साहिवाल, राठी, देवणी, थारपारकर, रेड सिंधी आणि जातिवंत स्वदेशी वाणांच्या माध्यमातून अन्य वाणाना उन्नत बनवणे.
- योजनेमार्फत उच्च अनुवांशिक योग्यतेच्या सांडचे वितरण.
केंद्र सरकारने या योजनेसाठी २०१४-१५ मध्ये १५० कोटी वितरीत केले होते. बाराव्या पंचवार्षिक योजनेत ५०० कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे.
खालील कामासाठी पुरवला जातो निधी :
१) गोकुळ मिशन अंतर्गत एकीकृत स्वदेशी पशु केंद्र म्हणजे गोकुळ ग्राम बनवणे.
२) उच्च अनुवंशिक क्षमतेच्या स्वदेशी वाणाच्या संरक्षणासाठी मदर्स फॉर्म्स मजबूत करणे.
३) प्रजनन तंत्रात क्षेत्र प्रदर्शन रेकॉर्डिंग (एफपीआर)स्थापना.
४) जर्म प्लाजम संरक्षण संस्था/संघटनांना मदत देणे.
५) स्वदेशी वाणांच्या जातिवंत जनावरांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्याना अर्थिक मदत
६) शेतकऱ्यांना पुरस्कार (गोपाल रत्न) आणि ब्रिटन सोसायटी (कामधेनू) बनवणे.
७) स्वदेशी वाणांसाठी वेळोवेळी दुग्ध उत्पादन स्पर्धा.
८) स्वदेशी पशु विकास कार्यक्रम संचालित करणाऱ्या संस्थांमध्ये काम करणारे तांत्रिक व अतांत्रिक लोकांना प्रशिक्षण कार्यक्रम.
गोकुळ ग्राम बनवणे :
१) गोकुळ ग्राम देशी पशु केंद्र आणि स्वदेशी वाणांच्या विकासासाठी केंद्रस्थानी काम करणे. या प्रोजेक्टचा मुख्य हेतू हा आहे की नवनवीन ब्रीड तयार करणे आणि दुग्ध व्यवसाय उत्पादन वाढविणे.(आयव्हीएफ तंत्रज्ञान किंवा बुल वापरून)
२) गोकुळ ग्राम मूळ प्रजनन भाग व शहरी आवाससाठी जनावरांसाठी मोठ्या शहरात बनवण्यात आले आहे.
३) शेतकऱ्याना उच्च आनुवंशिक प्रजनन स्टॉकचा पुरवठा करण्यासाठी एक विश्वासू स्त्रोत आहे.
४) गोकुळ ग्राम शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रात आधुनिक सुविधा प्रदान करते.
५) एक हजार जनावरांच्या क्षमता असणाऱ्या या गोकुळ ग्राममध्ये दुग्ध उत्पादक आणि अनुत्पादक जनावरांचे प्रमाण ६०:४० असे असते. गोकुळ ग्राम पशूंच्या पोषणसंबंधी आवश्यकता पुर्ण करण्यासाठी घरात चारा उत्पादन करण्यासाठी बनवण्यात आले आहे.
६) राष्ट्रिय गोकुळ मिशन प्रोजेक्टसाठी २०० देशी, एचएफ, साहिवाल, देवणी, गीर गाई किंवा २०० म्हशी (मुरा किंवा जाफराबादी) दोन्ही पैकी एक, २०० अनिवार्य किंवा दोन्ही मिळून १०० गाई आणि १०० म्हशी असे २०० करू शकता).
प्रोजेक्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी:
१) सिबिल स्कोर ७००+ आवश्यक आहे (सेटलमेंट, NPA किंवा राईट ऑफ केलेले नसावे). आणि चालू महिन्यामध्ये ट्रान्स युनियन मधून काढलेला सिबील रिपोर्ट आवश्यक आहे.
२) पाच एकर जमीन असणे आवश्यक आहे स्वतःच्या नावे किंवा लिझने म्हणजे रीतसर शासकीय रजिस्ट्रेशन करुन १० वर्षासाठी घेणे आवश्यक आणि त्या जमिनीची मार्केट व्हॅल्यू (२कोटी) होणे आवश्यक आहे,
जर जमीन लिझने भाडे तत्वावर घेणार असाल तर ज्यांची जमीन घेणार आहात त्यांचा पण सिबील स्कोअर ७००+ लागेल आणि जमीन मॉर्गेज करण्यासाठी त्यांचे समत्ती पत्र घेणे गरजेचे आहे.
३) टोटल प्रोजेक्ट हा ४.५ कोटीचा आहे, ज्यामध्ये २ कोटी लोन उपलब्ध होईल, २ कोटी सबसिडी असेल आणि टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या १०% टक्के म्हणजे ४५-५० लाख स्वतःची गुंतवणुक आवश्यक आहे असा टोटल ४.५ कोटी चा प्रोजेक्ट आहे.
४) नॅशनल बँकेकडून १००% सेक्युर कर्ज २ कोटी उपलब्ध करून देण्यात येते, त्याच्या बदल्यात बँकेला २कोटीचे मोर्गेज(तारण) करून देणे आवश्यक आहे, आणि ज्या जमिनीवर प्रोजेक्ट उभारणार आहात तीच जमीन मॉर्गेज(तारण) करुन देणे आवश्यक आहे, आणि त्या जमिनीची मार्केट व्हॅल्यू २कोटी होणे गरजेचे आहे जर जमिनीची किंमत मार्केट व्हॅल्यू नुसार २कोटी होत नसेल तर पर्याय म्हणून घर, मोकळी जागा,एन ए प्लॉट हेही मोर्गेज करु शकता.
५) रेट ऑफ इंटरेस्ट ७.५ ते ११.५ टक्केपर्यंत असेल आणि कर्ज परतफेड (३ / ५ / ७) वर्ष अशी असेल, (कर्जाचा हप्ता २.४० लाखपर्यंत लोन रकमेनुसार असेल आणि हप्ता हा - महिन्याला, ३ महिन्याला किंवा ६ महिन्याला करु शकता)
लोन हे रीडूसिंग पद्धतीचे असेल आणि सबसिडीही लोन सोबत समतोल स्वरूपात किंवा थोड्या कालांतराने येईल. जी ८ टप्यामध्ये जमा होत जाईल. सरकारी नियमानुसार सबसिडी जमा होण्याच्या नियमामधे बदल होऊ शकतो. २०० गाईंच्या १० टक्के नवीन पिल्ले(कालवडी स्वरुपात)जन्माला आली की सबसिडीचा शेवटचा हप्ता वर्ग होईल.
६) गाई किंवा म्हैस खरेदी करणे आणि दूध विक्री करणे ह्यावर कोणतेही सरकारी बंधन नसेल, उपब्धतेनुसार गाई खरेदी आणि दूध विक्री करता येईल.
७) लोन आणि सबसिडीची रक्कम ही कॅश स्वरूपात हाताळता येणार नाही, ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या खात्यातून समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा करावी लागेल. कोटेशन किंवा किमतीनुसार ती वळती होईल.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
- deepakahire1973@gmail.com
- www.ahiredeepak.blogspot.com
- www.digitalkrushiyog.com
- digitalkrushiyog@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा