name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): शेतमाल विक्रीचा सखोल अभ्यास करावा : आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील (Agricultural produce sale should be studied in depth: Adarsh ​​Sarpanch Bharaskarrao Pere Patil)

शेतमाल विक्रीचा सखोल अभ्यास करावा : आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील (Agricultural produce sale should be studied in depth: Adarsh ​​Sarpanch Bharaskarrao Pere Patil)

शेतमाल विक्रीचा सखोल अभ्यास करावा : आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील

Agricultural produce sale should be studied in depth: Adarsh ​​Sarpanch Bharaskarrao Pere Patil

Agricultural produce sale should be studied in depth: Adarsh ​​Sarpanch Bharaskarrao Pere Patil
भास्करराव पेरे पाटील 

नाशिक : शेतकरी शेतात उत्तम दर्जाचे पीके घेतात. पण बाजारात गेल्यावर त्याला योग्य मोबदला मिळत नाही. याविषयी शेतकऱ्यांनी संघटित होऊन बाजाराचा अभ्यास करायला हवा, योग्य दर्जाच्या पीक उत्पादनाप्रमाणेच शेतमाल विक्रीचा सखोल अभ्यास करायला हवा असे प्रतिपादन आदर्श सरपंच भारस्करराव पेरे पाटील यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय व रोटरी क्लब देवळाली कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मेळाव्याचे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे होते. 

    ते पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनेत सहभाग नोंदवायला हवा. त्याला पैसे लागत नाही. पण योजनेत यश मिळाले तर बक्षीस म्हणून मिळणाऱ्या रकमेत गावाचा विकास करण्याची संधी मिळते. बक्षीस मिळाले नाही तरी आपले नुकसान काहीच होत नाही. याकडे भास्कर पेरे पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. भास्कर पेरे-पाटील यांनी त्यांच्या गावात राबविलेले विविध उपक्रम व शासकीय योजनांची माहिती दिली. वेळेत कर भरणाऱ्या शेतकरी वर्गाला ग्रामपंचायत  स्तरावर तीस टक्के सवलत दिल्याची माहिती भास्कर पेरे पाटील यांनी दिली. 

   यावेळी एस.व्ही.के.टी. व  महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ तसेच रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शेतकरी व आदर्श सरपंच पुरस्कार देऊन शेतकऱ्यांना गौरविले. यामध्ये आदित्य विलास धुर्जड, सुभाष मुरलीधर पाळदे, शिवराम बापूराव मुठाळ, गोकुळ प्रकाश जाधव, निरवूत्ती बाळू वाकचौरे, हिरामण दशरथ आडके, मीना गायकवाड यांना आदर्श शेतकरी म्हणून तर पंढरीनाथ ढोकणे यांना आदर्श सरपंच पुरस्कार यांचा गौरव झाला.  

ऍड.नितीन ठाकरे

मविप्रचे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे म्हणाले कि, मविप्रचे बहुतांश सभासद हे शेतकरी आहे. शेती व्यवसायात निर्माण होणाऱ्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी तसेच कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळविता येईल, हा प्रमुख उद्देश समोर ठेवून संस्थेच्या विविध शाखेत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले जाते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शेतीचे मार्गदर्शक तत्वे शेतकऱ्यांना समजावे. यासाठी शेतकरी मेळाव्यासारख्या उपक्रमांची आवश्यकता आहे.

मविप्रचे संचालक रमेश पिंगळे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. ते यावेळी म्हणाले कि, सतत बदलणारे वातावरण, हवामान, शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरले आहे. शासनाने तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांनी याविषयी शेतकरी वर्गाला मार्गादर्शन करायला हवे. महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...