नाशिकमध्ये ८ ते १० मार्च दरम्यान ‘ऑटोथॉन’(AUTOTHON EXHIBITION)
दुसरी आवृत्तीच्या वाहन प्रदर्शनाचे आयोजन;
नामवंत ऑटोमोबाईल कंपन्यांचा सहभाग
नाशिक - कृषी आणि पर्यटन क्षेत्रात अग्रसेर असलेल्या नाशिक जिल्ह्यात तितकेच पूरक वातावरण ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रालाही लाभले आहे. हाच धागा पकडून नाशिकमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राला अधिकाधिक वाव मिळावा तसेच ऑटोमोबाईल हब म्हणून लौकिक मिळावा या उद्देशाने मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि.कडून नाशिकमध्ये 'ऑटोथॉन' या राज्यातील सर्वात मोठ्या वाहन प्रदर्शनाचे ८ ते १० मार्च २०२४ दरम्यान दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक श्री. साहिल संजय न्याहारकर यांनी दिली.
पर्यटनाच्या दृष्टिने महत्त्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये वाहन सुरक्षितता आणि गतिमानशीलता आणणे आवश्यक आहे. नाशिकमधील ऑटोमोबाईल क्षेत्र २० हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करून देत असून यावर शेकडो लघुउद्योग अवलंबून आहेत. नाशिककरांनी ऑटो स्पोर्ट्समध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. मोटोक्रॉस असो अथवा रॅलीज असो ऑटो स्पोर्टससाठी नाशिकची नेहमीच निवड केली जाते. वाहन निर्मितीमधील नवीन अपडेट्स, लहान-मोठ्या वाहनांची ओळख करून देण्यासाठी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. बी टू बी वाहन कंपन्या एकाच व्यासपीठावर एकत्रित आल्यास त्यांच्या व्यवसायवृद्धीलाही मदत मिळेल. 'ऑटोथॉन' च्या माध्यमातून या गोष्टी साध्य करता येतील, असा विश्वास श्री. न्याहारकर यांनी व्यक्त केला.
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत नामवंत अटोमोबाईल्स उत्पादक आणि त्यांच्याशी संलग्न मूळ उपकरणे निर्माता आहेत. नाशिकमध्ये ई-बाइक्सची निर्मिती होऊ लागली आहे. या ठिकाणी व्यवसायाच्या संधी, नवीन उत्पादनाची माहिती आणि सोबतच आकर्षक डिल्ससाठी सर्वसामावेशक व्यासपीठ निर्माण व्हावे, म्हणून ऑटोथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजक श्री. साहिल न्याहारकर यांनी सांगितले.
ऑटोथॉन प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रमुख ऑटोमोबाईल ब्रँड्सना आमंत्रित करण्यात आले आहे. वाहन निर्माता कंपन्या नवीन मॉडेल आणि उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. वाहन क्षेत्रातील नवीन संकल्पना, संबंधित ब्रँडसचे नवे मॉडेल तसेच नाशिकमध्ये उपलब्ध नसलेले मॉडेल्स पाहण्याची सुवर्णसंधी वाहनप्रेमींना मिळणार आहे. नवीन उत्पादन लाँच करण्यासाठी आणि संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे एक व्यासपीठ असेल. वाहन चाहत्यांना व्हिंटेज कार पाहण्याची संधीही मिळणार आहे. तसेच एडव्हेंचर गेम्सचेही आयोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षीच्या ऑटोथॉन प्रदर्शनात ४० हुन अधिक कंपन्या स्टॉलधारक, ३०,००० हजाराहून अधिक व्हिजिटर्सनी ऑटोथॉनला भेट दिली होती. ३०० हुन अधिक टेस्ट ड्राईव्ह झाल्या असून यशस्वीपणे दोन वर्कशॉपचे आयोजन केले होते. यावर्षी ऑटोथॉनमध्ये पहिल्या दिवशी ८ मार्च रोजी वॉव ग्रुपची २००० महिलांची रॅली निघणार असून महिला दिन साजरा होणार आहे. एमआरएफ मॉगग्रीप सुपर क्रॉस चॅम्पियनशीप आयोजित होणार असून १०० हुन अधिक प्रोफेशनल रायडर्स सहभागी होणार आहे. यात इंटरनॅशनल रायडर्स स्टंट करणार आहेत. ऑटोथॉनमध्ये विविध खाद्यपदार्थांची रेलचेल,मनोरंजनासाठी लाइव्ह संगीताचे आयोजन आणि ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडित ऍक्टिव्हिटीज होणार आहेत. ऑटोथॉनमध्ये सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक श्री. साहिल न्याहारकर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा