name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेती (Bamboo farming for sustainable income)

शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेती (Bamboo farming for sustainable income)

शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेती (Bamboo farming for sustainable income) 

बांबू (Bamboo) ही जलद वाढणारी, सदाहरीत व दिर्घायु प्रजाती आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळते. 
Bamboo farming
बांबू शेती 

आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास हिरवे सोने असे म्हटले जाते. देशात बांबूची बाजारपेठ सुमारे २६ हजार कोटीची असून त्यामध्ये बांबू फर्निचर, बांबू पल्प, बांबू मॅट बोर्ड, कार्टेज इंडस्ट्रीज, प्लाय बोर्ड आदी समाविष्ट आहे.बांबू लागवडीमुळे शेत जमीनीची धूप व जलसंवर्धन या दोन्ही बाबींचा सुध्दा फायदा मिळतो. 

राज्यातील सर्व महामार्गाच्या दुतर्फा बांबू लावण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.वातावरण बदलाच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेत केले.  

हवामान : 
  • समशीतोष्ण हवामानात बांबूची लागवड करावी. ज्या भागातील सरासरी वार्षिक तापमान ८.८ ते ३६ अंश सेल्सिअस असते.
  •  ज्या भागात  ७० ते १०० मिलिमीटर पाऊस पडतो अशा वातावरणात बांबूचे उत्पादन घेता येऊ शकते.
  • बांबूची लागवड संपूर्ण भारतात केली जाते. बांबूची मुळे ३ ते ४ फुटांपर्यंत वाढतात. याला सोटमूळ नाही, फक्त तंतुमय मुळे आहेत.
  • खड्डा खणताना तो २ फूट x २  फूट x २  फूट  किंवा ३ फूट x ३ फूट x २ फूट खणावा. 
जमीन : 
  • बांबू हे पीक कोणत्याही जमिनीत येते. हे पीक जमिनीच्या बाबतीत चोखंदळ नाही. 
  • वालुकामय किंवा चिकणमाती असल्येल्या जमिनीत बांबू पीक चांगले येते. 
  • मातीचे तापमान हे ६.५ ते ७.५ असावे. अधिक उताराच्या जमिनीमध्ये बांबूचे उत्पादन घटू शकते. 
  • सपाट व कमी उताराची जमीन बांबू उत्पादनासाठी योग्य ठरते.

  • बांबू लागवडीसाठी साधारणतः नदीकाठ किंवा खडकापासून बनलेल्या वालुकामय चिकन ते चिकन पोयटा प्रकारची जमीन योग्य मानली जाते. 
  • थोडक्यात उतारावरील, वरकस किंवा मुरुमाड जमीन लागवडीसाठी सर्वांत चांगली असते. 
  • काळी जमीन ही जरी चांगली असली तरी इतर भुसार पिके घेणे शक्य नसेल तरच लागवड करावी.
रोपवाटिका : 
  • साधारणपणे बांबूची रोपवाटिका मार्च ते एप्रिल महिन्यात केली जाते. 
  • बांबूला कलम तयार करुन बांबू रोपे तयार केली जातात. 
  • उत्तम बांबू रोपे आणि प्रजातीच्या शुद्धतेची गुणवत्ता टिकवून ठेवणे व मोठया प्रमाणात बांबू रोपांच्या निर्मितीसाठी टिश्यूकल्चर बांबू रोपे तयार करणे हा एक उत्तम पर्याय आहे.
पाणीपुरवठा : 
  • बांबूच्या लागवडीला भरपूर पाणी लागते म्हणून नियमितपणे पाणीपुरवठा होणाऱ्या जामिनीत बांबूची लागवड करणे गरजेचे आहे.
  • ठिबक सिंचनावर या रोपांची लागवड केल्यास त्याची वाढ झपाट्याने होते.
  • बांबू लागवडीखाली किमान तीस वर्षे जमीन गुंतवून ठेवणार आहोत हे लक्षात घेऊन नियोजन करावे. 
  • पूर्ण अभ्यास करून बांबू लागवडीकडे वळावे व यथायोग्य पाण्याचे नियोजन करावे. 
जाती : 
  • बांबूच्या शेकडो जाती पाहायला मिळतात. बांबूसा ओर्डीनेऐसी, बांबूसा पॉलीमॉर्फा, किमोनोबांबूसा, डेंड्रोकलामस हामिटोनी आणि मेलोकाना बेकीफेरा या सर्वात लोकप्रिय जाती आहेत. 
  • महाराष्ट्रात बांबूच्या १२१ जाती असून त्यापैकी कळक, काटेरी, मानगा, चिवा, चिवारी, मोठा बांबू, पिवळा बांबू इ. जाती कोकणात आढळून येतात. 
  • व्यावसायिकदृष्ट्या कळक, मानवेल, माणगा व मेस या बांबूच्या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. 
  • राष्ट्रीय बांबू मिशनने देशामध्ये बांबूची व्यावसायिक दृष्टीने लागवड करण्यासाठी १७ प्रजातींची शिफारस केली आहे. 
लागवड : 
  • बांबूची लागवड जमिनीत बिया टाकूनही होऊ शकते. बांबूची रोपे तयार करून याची लागवड करू शकतात. 
  • बांबूच्या उरलेल्या मुळया टोकून  बांबूची लागवड होऊ शकते. 
  • बांबूची शक्यतो रोपे नर्सरीमधून आणून लागवड करतात. या पद्धतीने लागवड केल्यास कमी वेळेत जास्त नफा मिळू शकतो. 
  • सरकारी रोपवाटिकेत बांबूची मोफत रोपे मिळतात. 
  • अलीकडे बांबूचा समावेश गवतवर्गीय पिकात समावेश केल्यामुळे बांबूची लागवड आता शेतात किंवा बांधावरही करता येऊ शकते.
  • बांबूची लागवड पावसाळ्यात करता येते. मात्र सिंचनाची व्यवस्था असल्यास नोव्हेंबर डिसेंबर मध्येही लागवड करता येते. 
आंतरपीक : 
  • बांबू पिकात आंतरपीक म्हणून अद्रक, हळद, भाजीपाला  पिकांची  लागवड करता येऊ शकते. 
  • परसबाग, शेतीच्या बांधावर, मृदसंवर्धनासाठी तसेच बांबूची व्यावसायिक लागवड शक्य आहे. 
  • सर्वसाधारणपणे पहिली दोन वर्षे नेहमीची पिके बांबू लागवडीत मिश्रपीक म्हणून घेता येतात. नंतर बांबूची सावली वाढते, त्यामुळे मिश्र पिकांचे उत्पादन मिळत नाही.
  • बांबू प्रजातीचे जीवनचक्र ४० -१०० वर्ष असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही.
लागवडीचे अंतर : 
  • कमी व्यासाच्या जातीसाठी ३x३ मी., मध्यम व्यासाकरिता (उदा. माणगा, माणवेल इ.) ५x५ मी. आणि अधिक मोठ्या व्यासाच्या बांबूसाठी ७x७ मी. तर हेमिलटोनीसाठी १०x१० मी अंतराची शिफारस करण्यात आलेली आहे. 
  • बांबूच्या बेटांमध्ये दरवर्षी 8-10 नवीन बांबू तयार होत असतात. 
  • पाणी साचलेल्या जमिनीवर, क्षारयुक्त जमिन तसेच मुरमाड जमिनीवर सुध्दा बांबूची लागवड यशस्वीरित्या होवू शकते. 
खतव्यवस्थापन : 
  • सुरवातीला बांबू लागवड करताना शेणखत किंवा गांडूळखत दिले तर पीक जोमाने येते. 
  • लागवड करण्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यातून पाच किलो कंपोस्ट किंवा गांडूळखत, युरिया १०० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट १०० ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश ५० ग्रॅम मिसळावे. 
  • रोपे खड्ड्याच्या मधोमध सरळ उभी ठेवून माती एका पेरापर्यंत घट्ट लावून घ्यावी.  त्यानंतर रोपाभोवती माती पसरवून आच्छादन करून घ्यावे. 
  • रोपाच्या भोवती पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 
  • बांबूच्या लागवडीमध्ये तुम्हाला खते किंवा खतांवर जास्त पैसे खर्च करण्याची गरज पडत नाही. 
तणनियंत्रण : 
  • लागवडीनंतर दर महिन्याला पिकात खुरपणी करावी  
  • वेळोवेळी तण काढल्याने तण नष्ट होतात. याचा पिकाला फायदा होतो. बांबूच्या रोपांभोवती  गोल आळे मारून घ्यावे. 
कापणी : 
  • बांबूची कापणी तीन वर्षांनी करू शकतात. 
  • तुम्हाला सुरुवातीला तीन वर्षे वाट पहावी लागेल पण नंतर तुम्ही दरवर्षी बांबूची कापणी करू शकतात.  
  • बांबू  एकदा लावल्यानंतर ते तुम्हाला अनेक वर्षे उत्पन्न देते.  
अर्थशास्त्र : 
  • एक एकर बांबू शेतीत ९०० रोपे बसल्यास एका बांबूपासून चार बांबूची झाडे निघतात याप्रमाणे तीन वर्षात ३६०० बांबूची झाडे मिळतात. 
  • आज ४० फूट बांबू सरासरी ६० रुपये दराने विकल्यास तरी २,१६००० दरवर्षी मिळतात.  
बाजारपेठ : 
  • बांबूपासून उत्पन्न होणाऱ्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे दृष्टीने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. 
Bamboo farming
बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तू
फायदे : 
  • बांबूपासून घर,छप्पर, चटई, टेबल अशा अनेक वस्तू बनवता येतात. 
  • बांबूपासून इथेनॉलही बनवता येत असल्याने आगामी काळात बांबूची मागणी वाढणार आहे. 
  • बांबू शेतीपासून आर्थिक उन्नती आणि रोजगाराच्या भरपूर संधी बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना मिळत आहेत. 
  • बांबूचे सुमारे १५०० प्रकाराने कामकाजासाठी उपयोग होतो. 
  • बांबूचा उपयोग खाण्यासाठी तसेच कृषी अवजारे, घरबांधणी, हस्तकला, पेपर निर्मिती इ. कामासाठी होतो.
  • बांबू हा लाकडाला उत्तम पर्याय असून फर्निचर,पार्टीशन निर्मितीसाठी उपयुक्त आहे. 
  • एक बांबू ३२० किलो प्राणवायू निर्माण करतो. 
  • कार्बनचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतो. इतर वृक्षांच्या तुलनेत ३० टक्के जास्त कार्बन शोषण करण्याची क्षमता बांबूमध्ये आहे.
अनुदान योजना  
  • अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी आर्थिक अनुदान देते. 
  • अटल बांबू समृद्धी योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग खात्यामार्फत सुरु करण्यात आली आहे.बांबू लागवडीला प्रोत्साहन म्हणून प्रती हेक्टरी ७ लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे.

© दीपक केदू अहिरे, नाशिक

  • deepakahire1973@gmail.com
  • www.ahiredeepak.blogspot.com
  • www.digitalkrushiyog.com
  • digitalkrushiyog@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...