name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): April 2021

अस्तित्वाची लढाई...(A battle for survival)

अस्तित्वाची लढाई
A battle for survival


Astivatichi ladhai

अस्तित्वाची लढाई
लढताेय प्रत्येकजण,
जीवन आणि श्वास
हेच आजचे  धन...

अस्तित्वाची लढाई
प्रत्येकाला लढावी लागेल
करावा संकटाचा पाडाव
अस्तित्व टिकवावं लागेल... 

अस्तित्वाची लढाई
पुढ्यात येऊन ठेपली,
जाणीव जागृतीने
तुम्हां आम्हां कळाली

अस्तित्वाची लढाई
बनला जगण्याचा श्वास,
अस्तित्व टिकवणं
हाच राहिला ध्यास...

© दीपक अहिरे, 
नाशिक


विस्तव वास्तवातलं...( In real life fire)

 विस्तव वास्तवातलं...
In real life fire

Vistav vastavatlan

विस्तव वास्तवातलं
दाखवतं आक्राळ रूप,
जवळचीच माणसं
अनंतात गेली खूप...

विस्तव वास्तवातलं
वाईट घटना ऐकू येतात, 
काळजी घ्या,सुरक्षित राहा
यावर त्या पाणी फेरतात...

विस्तव वास्तवातलं
ह्रदयाचा जळता निखारा,
कसा लागेल आता
जीवनी शांत वारा...

विस्तव वास्तवातलं
कसं आम्ही स्विकारू, 
काहीही झालं तरी
वास्तवाला कसं नाकारू...

© दीपक अहिरे, 
नाशिक

मी रुग्णवाहिका...( I Ambulance)

मी रुग्णवाहिका 
I Ambulance

Mi rugnavahika

मी रुग्णवाहिका
काळजी असते रूग्णांची,
अपेक्षित रूग्णालयात
घाई करते पाेहचवण्याची...

मी रुग्णवाहिका
चाेवीस तास सदा सेवेसाठी, 
मी ओळखली जाते
नियाेजनात्मक तत्परतेसाठी... 
Mi rugnavahika

मी रुग्णवाहिका
सायरन हीच ओळख माझी, 
मला पाहताच द्या वाट
काळजी वाहते मी सर्वांची... 

मी रुग्णवाहिका
जीवदान देणं माझं काम, 
वापरा माझं माध्यम
अखंड सेवेसाठीच माझं नाम... 

© दीपक अहिरे, 
नाशिक
Mi rugnavahika

पवनपुत्र हनुमान (Hanuman the son of the wind)

पवनपुत्र हनुमान 
Hanuman the son of the wind


Pavanputra hanuman


पवनपुत्र हनुमान

तुम्हास आवडताे शेंदूर,

भक्तांचे संकट

करावे तुम्ही दूर...


पवनपुत्र हनुमान

आवडते आपणास तेल, 

भक्तांच्या  जीवनाचा

बसवावा तुम्ही मेळ...


पवनपुत्र हनुमान

रूई आपली आवडती,

भक्त अडचणीत

तुमचा धावा ते करती...


पवनपुत्र हनुमान

आजही अस्तित्व जाणवते,

प्राथर्ना करताे आम्ही

तुमच्या चरणी भक्ती वाहते...


© दीपक केदू अहिरे

नाशिक 


Pavanputra hanuman



deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

आधाराची गरज...(Need for support)

आधाराची गरज 
Need for support

Aadharachi garaj

आधाराची गरज
भासते सगळीकडे,
आधाराचा उपचार
आज महत्त्वाचे तागडे...

आधाराची गरज
नकाे काेरडी सहानुभूती, 
तुमच्या निस्वार्थ आधाराची
द्या रूग्णाला अनुभूती...

आधाराची गरज
भासते पदाेपदी,
आपलेच आधार
असे हिरावून नेती...

आधाराची गरज
कशी आता द्यावी, 
सगळीकडे लाॅकडाऊन
मनाची भ्रांत मिटावी...

© दीपक अहिरे, 
नाशिक

दुरावलेली माणुसकी...(Humanity alienated)

दुरावलेली माणुसकी 
Humanity alienated

Duravaleli manuski

दुरावलेली माणुसकी 
समीप आता येऊ द्या, 
काेराेनाने माजवले थैमान
ऑक्सीजन,व्हेंटिलेटर मिळू द्या...

दुरावलेली माणुसकी 
ओघ चालू आहे मदतीचा, 
पाेहचावी मदत गरजूंना
द्या सहकार्याचा हात आता.... 

दुरावलेली माणुसकी 
अनेक व्यक्ती, संस्था काळजी घेतात, 
काही नातं असतं का त्यांचं
मदतीसाठी अर्ध्या रात्रीही धावतात... 

दुरावलेली माणुसकी 
सेवाभाव ठेवू कायम स्थायीभाव, 
काेराेना दाखवताेय आक्राळ रूप
मदतीसाठी करा सहकार्य नी धावाधाव... 

© दीपक अहिरे, 
नाशिक

माझी डायरी...(my diary)

माझी डायरी 
My Diary

Mazi dayari


माझी डायरी राेज मला खुणावते,
दैनंदिन कामाची ती राेज नाेंद घेते... 

माझी डायरी माझ्या जगण्याचा श्वास, 
दररोज लागते मला डायरी लिहिण्याचा ध्यास... 

माझी डायरी सवडीने वाचत राहताे, 
अनेक अशा नाेंदी त्यात मी करत असताे... 

माझी डायरी जसा आयुष्याचा जीवनक्रम, 
प्रत्येक पानावरची नाेंद असते कधी सम, विषम... 

© दीपक अहिरे, 
नाशिक   


;



प्रत्येक पानावरची स्वप्न... (A dream on every page)

प्रत्येक पानावरची स्वप्न
A dream on every page

Pratyek panvarchi swapne

प्रत्येक पानावरची स्वप्न आहेत निरनिराळी, 
प्रत्येक स्वप्नांची येते प्रत्येकाच्या आयुष्यात पाळी... 

प्रत्येक पानावरची स्वप्न सजतात आपल्या मनात, 
त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी उर्जा येत राहते तनात... 

प्रत्येक पानावरची स्वप्न दिवसागणिक बदलतात, 
जसे उन्हाळ्यानंतर पावसाचे ढग झाकाेळून येतात..

प्रत्येक पानावरची स्वप्न जगायला ती शिकवतात, 
आशा निराशेमध्ये खरं जगणं हिरावून बसतात...
 
© दीपक अहिरे, 
नाशिक
                                                                                  
                                                      

निवांतीचे चार क्षण...( Four moments of relaxation)

निवांतीचे चार क्षण
Four moments of relaxation

Nivantiche char kshan

निवांतीचे चार क्षण 
पाडू या पदरात, 
कधीच डाेकावलाे नव्हताे
आता डाेकावू अंतरंगात... 

निवांतीचे चार क्षण 
आनंद घेवूया छंदाचा, 
साेबत नसावा साेशल मिडिया 
आनंद घेऊ वाचनाचा...

निवांतीचे चार क्षण 
मनाने मिळून मिसळून राहायचे,
कुठं थाेडसं मन दुखावलं तर
गुमान ते गिळायचे... 

निवांतीचे चार क्षण करावे
कामाचे सिंहावलोकन, 
छंदात गुंतून ज्ञान पुरवू घेऊ
या ऑनलाईन शिक्षण... 

© दीपक अहिरे, 
नाशिक

हे ही दिवस जातील.... (These days will pass)

हे ही दिवस जातील 
These days will pass

He hi divas jatil

हे ही दिवस जातील
आशा मनात आहे,
काळजी घ्या यथायोग्य
दिवस बदलत आहे...

हे ही दिवस जातील 
प्रगाढ श्रद्धा ईश्वरावर, 
पालटेल ताे आपले दिवस
जीवन चालते विश्वासावर...

हे ही दिवस जातील
खूणगाठ मनात बांधा,
माणुसकी, स्नेहभावाचा
पुल आता ताे सांधा...

हे ही दिवस जातील 
घ्या अंतरंगातून बाेध, 
चाळत राहा स्मृतींची पाने
मिळेल काही घ्यावा शाेध...

© दीपक अहिरे, 
नाशिक

स्वच्छंदी मन माझे...(My clean mind)

स्वच्छंदी मन माझे 
My clean mind 

Swachandi man maze

स्वच्छंदी मन माझे
खूप झाले चंचल,
राेजच निघत राहताे
मनाविषयीचा मल...

स्वच्छंदी मन माझे
पडताे माझाच विसर, 
भरून येणार कशी
माझ्या मनाचीच कसर...

स्वच्छंदी मन माझे
भरकटतच राहते,
अनाहूत विचार
मन मारून जाते...

स्वच्छंदी मन माझे
डाेहा-डाेहात डुंबते, 
अविचार करण्यास
मन माझे घाबरते...

© दीपक अहिरे, 
नाशिक

वाचाल तर वाचाल(काव्य)(If you read you will read)

वाचाल तर वाचाल...
If you read you will read

Vachal tar vachal

वाचाल तर वाचाल,
तरच जीवनाचा भवसागर तराल... 

वाचाल तर वाचाल,
तरच उजळेल जीवनाचा भविष्यकाळ...

वाचाल तर वाचाल,
तरच तुम्ही कराल योग्य सवाल...

वाचाल तर वाचाल,
तरच वेगळ्या नजरेने पाहाल... 

वाचाल तर वाचाल,
तरच जीवनाकडे आशेने पाहाल...

वाचाल तर वाचाल,
सुविचार डाेक्यात घाल... 

वाचाल तर वाचाल,
बाैध्दीकता कमवाल...

वाचाल तर वाचाल,
तरच वाचवेल हा कलीकाल...    

वाचाल तर वाचाल, 
शाबूत ठेवा विचारांची ढाल...

वाचाल तर वाचाल, 
राहाल तुम्ही खुशहाल...

वाचाल तर वाचाल, 
संपन्नतेची पांघरा ही शाल...

वाचाल तर वाचाल, 
पुस्तकांनी भरा ही पाल...

© दीपक अहिरे, 
नाशिक

वसुंधरा तुझे ऋण) (I owe you Vasundhara)

वसुंधरा तुझे ऋण
  (I owe you Vasundhara)

वसुंधरा तुझे रीन


वसुंधरा तुझे कर्ज

कसे आम्ही व्यक्त करावे ,

तू देतेस भरून 

काय आणखी मागावे...


वसुंधरा तुझे कर्ज, 

उतराई करू शकत नाही,

आज ओरबाडण्याची

आमची चालली नुसती घाई...  


वसुंधरा तुझे ऋण

आहेत तुझे थोर उपकार, 

दुसऱ्यासाठी जगण्याचा 

देतेस तू संदेशवार... 


वसुंधरा तुझे ऋण, 

झाडे लावून आम्ही फेडू,

तुझ्या साथीने जीवनात, 

आनंदाने आनंद वाढवू...


©  दीपक केदू अहिरे, 

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com वर ईमेल करा.

********************************************************
टेलिग्राम   :
********************************************************
फेसबुक :
********************************************************
इंस्टाग्राम  :  
********************************************************
युट्युब :

****************************************************
कोरा:
****************************************************
कू :
****************************************************
चित्ररेस्ट:
****************************************************
चॅट शेअर करा:
****************************************************
ट्विटर:
****************************************************
वेबसाइट:

****************************************************


जय श्री राम...!! (Jai shree Ram)

जय श्री राम...!!
Jai shree Ram 


Jay Shri ram


बोलावे जय श्रीराम
लिहावे जय श्रीराम,
करू नये कुठलेही
अनितीचे तुम्ही काम...

बोलावे जय श्रीराम
लिहावे जय श्रीराम,
भवसागरात देईल हे
चोख असे दाम...

बोलावे जय श्रीराम
लिहावे जय श्रीराम,
जगातले सर्वोकृष्ट 
संबोधनाचे हे नाम... 

बोलावे जय श्रीराम
लिहावे जय श्रीराम,
श्रीरामाच्या नामस्मरणाने 
काम होईल तमाम...

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

काेराेना युग...(Corona Era)

कोरोना युग
Corona Era

Corona yug

कोरोना युग
असे कसे अवतरले,
निमिषार्धात 
होत्याचे नव्हते झाले....

कोरोना युग
भलतीच लक्षणं
भीतीच्या दबावाखाली
धास्ती घेतं मन

कोरोना युग
पाहिले कलियुगात
रोजच पाहतो 
बातम्यांच्या जगात 

कोरोना युग
प्रतिबंध हाच उपचार 
तेव्हा कमी होईल
या आजाराची धार

© दीपक अहिरे, 
नाशिक


सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...