निवांतीचे चार क्षण
Four moments of relaxation
निवांतीचे चार क्षण
पाडू या पदरात,
कधीच डाेकावलाे नव्हताे
आता डाेकावू अंतरंगात...
निवांतीचे चार क्षण
आनंद घेवूया छंदाचा,
साेबत नसावा साेशल मिडिया
आनंद घेऊ वाचनाचा...
निवांतीचे चार क्षण
मनाने मिळून मिसळून राहायचे,
कुठं थाेडसं मन दुखावलं तर
गुमान ते गिळायचे...
निवांतीचे चार क्षण करावे
कामाचे सिंहावलोकन,
छंदात गुंतून ज्ञान पुरवू घेऊ
या ऑनलाईन शिक्षण...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment