स्वच्छंदी मन माझे
My clean mind
स्वच्छंदी मन माझे
खूप झाले चंचल,
राेजच निघत राहताे
मनाविषयीचा मल...
स्वच्छंदी मन माझे
पडताे माझाच विसर,
भरून येणार कशी
माझ्या मनाचीच कसर...
स्वच्छंदी मन माझे
भरकटतच राहते,
अनाहूत विचार
मन मारून जाते...
स्वच्छंदी मन माझे
डाेहा-डाेहात डुंबते,
अविचार करण्यास
मन माझे घाबरते...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment