वाचाल तर वाचाल...
If you read you will read
वाचाल तर वाचाल,
तरच जीवनाचा भवसागर तराल...
वाचाल तर वाचाल,
तरच उजळेल जीवनाचा भविष्यकाळ...
वाचाल तर वाचाल,
तरच तुम्ही कराल योग्य सवाल...
वाचाल तर वाचाल,
तरच वेगळ्या नजरेने पाहाल...
वाचाल तर वाचाल,
तरच जीवनाकडे आशेने पाहाल...
वाचाल तर वाचाल,
सुविचार डाेक्यात घाल...
वाचाल तर वाचाल,
बाैध्दीकता कमवाल...
वाचाल तर वाचाल,
तरच वाचवेल हा कलीकाल...
वाचाल तर वाचाल,
शाबूत ठेवा विचारांची ढाल...
वाचाल तर वाचाल,
राहाल तुम्ही खुशहाल...
वाचाल तर वाचाल,
संपन्नतेची पांघरा ही शाल...
वाचाल तर वाचाल,
पुस्तकांनी भरा ही पाल...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment