प्रत्येक पानावरची स्वप्न
A dream on every page
प्रत्येक पानावरची स्वप्न आहेत निरनिराळी,
प्रत्येक स्वप्नांची येते प्रत्येकाच्या आयुष्यात पाळी...
प्रत्येक पानावरची स्वप्न सजतात आपल्या मनात,
त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी उर्जा येत राहते तनात...
प्रत्येक पानावरची स्वप्न दिवसागणिक बदलतात,
जसे उन्हाळ्यानंतर पावसाचे ढग झाकाेळून येतात..
प्रत्येक पानावरची स्वप्न जगायला ती शिकवतात,
आशा निराशेमध्ये खरं जगणं हिरावून बसतात...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment