कोरोना युग
Corona Era
कोरोना युग
असे कसे अवतरले,
निमिषार्धात
होत्याचे नव्हते झाले....
कोरोना युग
भलतीच लक्षणं
भीतीच्या दबावाखाली
धास्ती घेतं मन
कोरोना युग
पाहिले कलियुगात
रोजच पाहतो
बातम्यांच्या जगात
कोरोना युग
प्रतिबंध हाच उपचार
तेव्हा कमी होईल
या आजाराची धार
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment