हे ही दिवस जातील
These days will pass
हे ही दिवस जातील
आशा मनात आहे,
काळजी घ्या यथायोग्य
दिवस बदलत आहे...
हे ही दिवस जातील
प्रगाढ श्रद्धा ईश्वरावर,
पालटेल ताे आपले दिवस
जीवन चालते विश्वासावर...
हे ही दिवस जातील
खूणगाठ मनात बांधा,
माणुसकी, स्नेहभावाचा
पुल आता ताे सांधा...
हे ही दिवस जातील
घ्या अंतरंगातून बाेध,
चाळत राहा स्मृतींची पाने
मिळेल काही घ्यावा शाेध...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment