दुरावलेली माणुसकी
Humanity alienated
दुरावलेली माणुसकी
समीप आता येऊ द्या,
काेराेनाने माजवले थैमान
ऑक्सीजन,व्हेंटिलेटर मिळू द्या...
दुरावलेली माणुसकी
ओघ चालू आहे मदतीचा,
पाेहचावी मदत गरजूंना
द्या सहकार्याचा हात आता....
दुरावलेली माणुसकी
अनेक व्यक्ती, संस्था काळजी घेतात,
काही नातं असतं का त्यांचं
मदतीसाठी अर्ध्या रात्रीही धावतात...
दुरावलेली माणुसकी
सेवाभाव ठेवू कायम स्थायीभाव,
काेराेना दाखवताेय आक्राळ रूप
मदतीसाठी करा सहकार्य नी धावाधाव...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment