name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): शेतकरी उत्पादक कंपनीची ओळख : विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कं.लि.(vimalai mahila farmers producer company Ltd.)

शेतकरी उत्पादक कंपनीची ओळख : विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कं.लि.(vimalai mahila farmers producer company Ltd.)

शेतकरी उत्पादक कंपनीची ओळख :

विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कं.ली. (vimalai mahila farmers producer company)

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना अध्यक्षा सौ. प्रिती अभिजीत पाटील यांनी केली आहे. 

Farmer producer company
Sou. Priti Abhijeet patil

    सुरुवातीपासून त्यांना शेतकरी वारसा लाभला आहे.  त्यांनी  कॉम्पुटर सायन्समध्ये एम.एस.ची पदवी अमेरिकेतील मिसूरी सेंट लुइस विद्यापीठातून घेतली आहे.  तसेच कृषी क्षेत्रातील मोन्सॅन्टो या नामांकित कंपनीत आय. टी. डिव्हिजन मध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनीअर या पदावर काम करून त्याचा लाभ आपल्या परिसरातल्या शेतकरी बांधवाना कसा होईल तसेच शेतकरी कुटुंबातील महिलांचा शेती व्यवसायात सहभाग वाढवून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक सबलीकरण कसे करता येईल हे स्वप्न उराशी बाळगून आपल्या मातीत दि. २ एप्रिल २०२१ रोजी कंपनीच्या अध्यक्षा सौ. प्रिती पाटील यांनी परिसरातील होतकरू महिलांना सोबत घेऊन यांनी विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली.

  विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये एकूण पाच महिला संचालक असून ३१० महिला सभासद आहेत. एकूण भागभांडवल ६ लाख असून २०२०-२१ मध्ये या आर्थिक वर्षात उलाढाल १२ लाख झाली असून २०२१-२२ मध्ये ही उलाढाल २५ लाखापर्यंत पोहचली. २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ५० लाख एवढी उलाढाल झाली आहे. 

On Training institute 

    कंपनीच्या अध्यक्षा सौ. प्रीती पाटील यांनी आपला आय.टी., कॉम्पुटर व फायनान्स क्षेत्रातील आपला अनुभव पणाला लावून परिसरातील शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी महिला म्हणून माझी जबाबदारी काय? या प्रश्नावर त्यांनी काम केले. त्यांनी त्यावर मॉडेल प्रशिक्षण विकसित केले. यात त्यांनी समाविष्ट केले कि, एक महिले मध्ये जी कामाची व्यावहारिकता, अचूकता व सातत्य असते. जे इतर कोणातही नसते. 

    त्याचा फायदा आपल्या कुटुंबाची शेती व्यवसाय करतांना कसा करता येईल याच्यासाठी त्यांनी एक अभ्यासक्रम तयार केला. व तो अभ्यासक्रम ते आपल्या विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत प्रशिक्षण केंद्रातून महिलांपर्यंत पोहचवीत आहेत. जसे कि, आजच्या शेती व्यवसायात आपण पाहतो कि, शेतकरी बांधव आपल्या घराबाहेरील सगळे काम करू शकतो. पण अजून बरीच अशी कामे आहेत कि जी कामे शेतकरी बांधव वेळेच्या अभावी करू शकत नाही. पण त्या कामांमध्ये जर महिला सहभागी झाल्यानंतर त्या कुटुंबाचे उत्पन्न निश्चित २० ते ३० टक्के वाढू शकते. असे सौ. प्रीती पाटील यांना वाटते.

  आज कुठल्याही शेतकरी बांधवाकडे आपल्या व्यवसायाचा लेखा-जोखा नसतो. आपल्या व्यवसायाचे कुठलेही आर्थिक ताळेबंद नसते ते ताळेबंद ठेवणे. अशी बरीच जोडधंदे आहेत कि जे महिला घरातल्या घरात करू शकतात. व्यवसायातील बारकाव्यांचा अभ्यास करू शकतात. मजुरांचा हिशोब ठेऊन त्यांच्याकडून योग्य पद्धतीने काम करून घेऊ शकतात. 

   पिकांच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून चांगल्या प्रतीचा माल तयार करू शकतात. आपल्या घराचे व शेती- व्यवसायाचे आर्थिक व्यवस्थापन महिला चांगल्या रीतीने करू शकतात. या व इतर पैलूच्या आधारे भरपूर विषयांचा अभ्यास सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला भगिनीपर्यंत कंपनीच्या अध्यक्षा सौ. प्रीती पाटील व संचालक मंडळ पोहचवीत असतात.

    विमलाई धान्य, मिरची खरेदी व प्रतवारी केंद्रातर्फे धान्य खरेदी व प्रतवारी केंद्रात विविध प्रकारचे धान्ये जसे कि, सोयाबीन, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी तसेच लाल मिरची, हिरवी मिरची खरेदी करून त्याची योग्य प्रतवारी करून कंपन्यांना विकली जातात. 

Stall of vimalai mahila farmer company 

      कंपनीचे शहादा येथे शेतकरी सुविधा व सल्ला केंद्र आहे. त्याच्यामार्फत कंपनी शेतकरी बांधवाना पिकविमाविषयी मार्गदर्शन करून पीकविमा काढून देणे, शेतकरी अपघात विमा काढून देणे, शेतकरी बांधवाना माती व पाणी परिक्षणानुसार अन्नद्रव्ये व्यवस्थापन करून देणे, कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन सदर योजनांचे अर्ज करून देणे जसे कि,  एन.एच. एम., एन.एच.बी., डीबीटी, मनरेगा, पीएमएफएमई, स्मार्ट, मॅंग्नेट, एमओएफपीआय, पीएमकेएसवाय, ई. योजनांचे अर्ज भरून देण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. याबरोबरच परिसरातील विविध बचतगटातील महिलांमध्ये उद्योजकता निर्माण करून त्यांना विविध प्रकारचे उद्योगधंदे उभारण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम या सुविधा केंद्रामार्फत केले जाते.

  सद्यस्थितीत कंपनीचे वरीलप्रमाणे प्रकल्प सुरु असून कंपनीला स्मार्ट प्रकल्पातून धान्य क्लिनिंग, ग्रेडिंग व सोर्टेक्स युनिट, गोदाम बांधकाम २००० मे. टन असा असून ३.५० कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर झाला असून सदर प्रकल्पाचे चालू होईल. 

    तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव विविध प्रकारच्या भरडधान्याचे (मिलेट) उत्पादन घेत असतात. सदर परिसरातील शेतकरी बांधव व महिलांना सोबत घेऊन मिलेटची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी मिलेटस पार्क उभारणार असल्याची माहिती सौ. प्रीती पाटील यांनी दिली.

संपर्क : विमलाई महिला फार्मर्स प्रोड्युसर कं. लि., शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार
ई मेल : vimlaimfpcl@gmail.com

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...