name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): सेंद्रिय शेती : काळाची गरज (Organic farming: The need of the hour)

सेंद्रिय शेती : काळाची गरज (Organic farming: The need of the hour)

 सेंद्रिय शेती : काळाची गरज 
Organic farming: The need of the hour

Sendriya sheti

 वनस्पतीजन्य अवशेष, प्राणीजन्य अवशेष, शेण, मलमूत्र यापासून मिळणारी खते तसेच वनस्पतीपासून बनवली जाणारी किटकनाशके, रोगनाशके यांचा वापर करुन कोणताही रासायनिक पदार्थ न वापरता जी शेती करतो त्यालाच सेंद्रिय शेती असे म्हणतात.

Sendriya sheti


गोमाता : सेंद्रिय शेतीची जननी 
Mother Cow: The Mother of Organic Farming

   
   सेंद्रिय खतामध्ये कंपोस्ट खत, जोर खते, भर खते यांचा समावेश होतो. जमिनीमध्ये गांडूळ हा प्राणी महत्वाचे कार्य करतो. गांडूळ खताने जमिनीचा पोत सुधारतो. हिरवळीचे खते ही सेंद्रिय शेतीत महत्वाची ठरतात. जीवाणू खतेही जमिनीला वरदान ठरली आहेत. गोमाता म्हणजे गाय ही जणू काही सेंद्रिय शेतीची जननीच आहे. 

Sendriya sheti


सेंद्रिय शेतीमध्ये शेतकऱ्यांचे मित्र
Farmers' friends in organic farming

   
  रोग व किड नियंत्रणासाठी "निमअर्क दशपर्णी" अर्क वापरणे चांगले असते.सेंद्रिय शेतीमध्ये पिकांची फेरपालट, आंतरपिके घेणे, मिश्रपिकांचा वापर, अनेक मजली पद्धती यांच्या वापराने शेतीची थांबलेली उत्पादकता पुन्हा सुरु होईल व जमिनीचा पोतही उत्तम राहील. सेंद्रिय शेतीमध्ये शेतकऱ्यांचे मित्र म्हणून गांडूळ, बेडूक, साप, उंदीर, घुशी, विविध पक्षी यांचे कार्य महत्वाचे आहे.

Sendriya sheti

आच्छादनासाठी तण 
Weeds for mulch

   
  गांडूळ खत सेंद्रिय शेतीत अतिशय महत्वाचे आहे. किड नियंत्रणासाठी फेरोमॅन सापळ्याचा वापर, जैविक किड नियंत्रण पद्धत ही कमी खर्चाची व फायदेशीर ठरते. "तण देई धन" या म्हणीप्रमाणे तणाचा नाश न करता त्यांचा आच्छादनासाठी वापर करून जमिनीत ओल टिकविली जाते. आच्छादन हे सेंद्रिय शेतीत अतिशय महत्वाचे आहे. 
    
  रासायनिक शेतीतील विषारी उत्पादनापेक्षा सेंद्रिय शेतीतील विषमुक्त उत्पादन आरोग्यासाठी चांगले ठरते यामुळे मानवी प्रतिकारशक्ती वाढते म्हणूनच सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.

सेंद्रिय शेतीची वैशिष्ठ्ये :
Features of organic farming :


१) सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापराने जमिनीचा पोत सुधारतो, जमिन ही भुसभुशीत होते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते, पिकांचा योग्य वाढीसाठी जमिनीत २५ % हवा, २५ % पाणी, खनिजद्रव्ये व २५ % सेंद्रिय पदार्थ हवी असतात.

२) सेंद्रिय शेतीत जीवाणूची चांगली वाढ होते. हे आपणास हवे असते. याचा फायदा जमिनीवर होतो जमिनीचे आरोग्य सुधारते व त्याबरोबरच पिकांचा दर्जा व प्रतही सुधारते

३) जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजेच जमिनीची जलधारणाशक्ती वाढते.

४) पाण्याचा अतिवापर केल्याने जमिनी ह्या चोपन बनतात अशा जमिनीचा चिकटपणा कमी करण्यासाठी सेंद्रिय पदार्थ महत्वाचे कार्य करतात.

५) सेंद्रिय जमिनीतून पिकांना निरनिराळ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. मुळांची जोमदार वाढ होते. जमिन भुसभुशीत व सच्छिद्र बनल्याने मुळ्या व्यवस्थित वाढतात. व यासाठी शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत व पालापाचोळा वापरतात.

६) ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ हे विपूल प्रमाणात असतात ते जमिनीत सेंद्रिय कर्ब व अन्नद्रव्ये टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. सेंद्रिय पदार्थाचा या उपयोगामुळे पिकांवर याचा चांगला परिणाम होतो. पिके ही हिरवीगार व निरोगी दिसतात.

७) शेतात तण नियंत्रण करणेही काही प्रमाणात आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीचे आच्छादन करणे आवश्यक आहे. यासाठी वेगवेगळ्या आच्छादन पद्धतीचा वापर करतात. यात माती आच्छादन, पालापाचोळ्याची आच्छादन, जिवंत वनस्पतीचे आच्छादन तसेच पॉलीथीन कागदाचे आच्छादन करणे यांचा समावेश होतो.

८) सेंद्रिय शेतीत नत्राचे स्थिरीकरणासाठी विविध जीवाणूसंवर्धन खते वापरणे, व्दिदल पिकांची लागवड करणे, पिकांची फेरपालट करणे यांचा समावेश होतो.

९) सेंद्रिय शेतीमध्ये पिकावर रोग पडल्यानंतर त्यावर उपाय करण्यापेक्षा ते रोग वा किडी पडू नयेत म्हणून प्रतिबंधक उपाय करतात. यामध्ये फेरोमन ट्रॅप, प्रकाश सापळे, स्टीकी ट्रॅप याचा वापर करतात याला रोगनाशके व किटकनाशके फवारण्यापेक्षा तुलनात्मक कमी खर्च येतो.

१०) सेंद्रिय शेतीत बांधावर आलेले तण व इतर पाणवठ्याच्या ठिकाणी चारागवताची लागवड करावी व याचा चारा म्हणून वापर करावा. जनावरांचे पालन करावे व दुग्धव्यवसाय करावा यापूरक उद्योगधंद्यामुळे अतिरिक्त आर्थिक प्राप्ती होते त्याचबरोबर बांधावर लिंबासारखी झाडे लावावीत, कारण लिंबाच्या लिंबोळ्यापासून विविध किटकनाशके रोगनाशके, निंबोळीपेंड आपण तयार करु शकतो. याचा शेतात फवारण्यासाठी वापर करावा अतिरिक्त खर्च करुन बाहेरुन किटकनाशक, रोगनाशक, खते खरेदी करुन आणू नयेत. 

११) पशुपालनामुळे मोठ्या प्रमाणात शेण व मूत्र उपलब्ध होते. यापासून बायोगॅस सयंत्राची निर्मिती करावी म्हणजे इंधन व खत हे दोन्ही उपलब्ध होऊ शकतात व असे केल्याने आपणास बाहेरून खते आणण्याची गरज भासत नाही.


सेंद्रिय शेतीसाठी शिफारस केलेल्या पद्धती
Recommended practices for organic farming


हिरवळीची खते : Green manures:

  शेवरी, सुबाभूळ, गिरिपुष्प किंवा पडीक जमिनीत, बांधालगत वाढलेली झाडे झुडपे अशा वनस्पतींची पाने, पालापाचोळा जमिनीत गाडावा अथवा हिरवळीच्या खताचे पीक म्हणून धैंचा, ताग, गवार व चवळी घेऊन ते त्याच जमिनीत गाडावे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारुन उत्पादन वाढते.

सेंद्रिय पदार्थ :Organic matter:

यामध्ये शेणखत, लेंडीखत, कोंबडीखत व कंपोस्ट खताचा समावेश होतो. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.


गांडूळ खत : Vermicompost:

शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाणारे गांडूळ हे खत तयार करते.


जैविक खते :Organic fertilizers:

रायाझोबिअम, स्फुरद विरघळणारे जीवाणू व अझॉटोबॅक्टर तसेच ट्रायकोडर्मा बुरशी यांचा समावेश होतो.


वनस्पतीच्या पानांचा अर्क : Plant leaf extract:

करंज, निंबोळी अर्क, लसणाचा अर्क व वनस्पतीच्या पानांचा अर्क हा रोग व किडींच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया म्हणून किंवा पिकांवर फवारणीसाठी वापरतात.


बिजामृत : Bijamrut:

१ किलो गाईचे शेण, १ लिटर गोमुत्र, चुना ५० ग्रॅम, पोयटा माती, ५० ग्रॅम व ट्रायकोडर्मा विरीडी १०० ग्रॅम रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी बीजप्रक्रियेसाठी वापरावे.


जीवामृत: jivamrut 

बैलाचे किंवा गाईचे १० किलो शेण, १० लिटर गोमुत्र, २ किलो गुळ, बेसनपीठ २ किलो, १ किलो वनातील माती हे २०० लिटर पाणी असलेल्या प्लॅस्टिकच्या ड्रम मध्ये ५ ते ७ दिवस आंबवून घेऊन दररोज तीन वेळा ढवळून घ्यावे. एक एकर क्षेत्रासाठी पाण्यावाटे द्यावे.


दशपर्णी :Dashaparni:

यामध्ये १० वनस्पतींचा २० ते २५ कि. पाला, हिरव्या मिरच्याचा ठेचा २ किलो, २५० ग्रॅम लसूण, ३ किलो शेण व ५ लिटर गोमुत्र हे २०० लिटर पाणी असलेल्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये १ महिना आंबवून घेऊन दररोज तीन वेळा ढवळून काढावे. अशाप्रकारे २०० लिटर मधून गाळलेले ५ लिटर दशपर्णी अर्क व ५ लिटर गोमुत्र २०० लिटर पाण्यात मिसळून रोग व किडींच्या नियंत्रणासाठी फवारावे.


संजीवक :Sanjivak:

गाईचे शेण १०० ग्रॅम, गोमुत्र १०० लिटर, ५०० ग्रॅम गुळ, ३ लिटर पाण्याचे मिश्रण १० दिवस आंबवावे. नंतर त्याच्या २० पट पाणी घेऊन ग्रॅम पाण्यावाटे देतात.


पंचगव्य : Panchagavya:

शेण ५ किलो, नारळाचे पाणी किंवा गोमुत्र ३ लिटर, गाईचे दुध १ लिटर व तूप १ किलो सात दिवसांसाठी आंबवून दिवसातून २ वेळा ढवळावे. तयार झालेले पंचगव्य १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर पाण्यावाटे फवारावे. एक एकरासाठी २० लिटर पंचगव्य लागते.

कृषियोग: सेंद्रिय शेती विशेषांक
मूल्य : २५ रू., पाने : ६०


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...