ते दिवस आठवतात...
Remember those days
ते दिवस आठवतात
येते डाेळ्यातून पाणी,
गरीबीत राहूनसुध्दा
गायचाे श्रीमंतीची गाणी...
ते दिवस आठवतात
गळायची आमची घरं,
शिडात कुठे घुसायचं
आडदांडपणे हे वारं...
ते दिवस आठवतात
खायला नव्हते काेरकू,
कुपाेषित बालक आम्ही
म्हणूनच म्हणायचे बारकू...
ते दिवस आठवतात
शेळ्या चारत हुंदडायचाे,
घरच्या ओढीने परत
राहुटीत येऊन बसायचाे...
@ दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment