name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला कृषी सन्मान २०२६ – नाशिकमध्ये महिलांसाठी मोठी संधी Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Krushi Samman 2026 Nashik | Big Opportunity for Women Farmers

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला कृषी सन्मान २०२६ – नाशिकमध्ये महिलांसाठी मोठी संधी Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Krushi Samman 2026 Nashik | Big Opportunity for Women Farmers

नाशिकमध्ये “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला कृषी सन्मान २०२६” साठी आवाहन
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Krushi Samman 2026 Nashik | Big Opportunity for Women Farmers


Punyshlok ahilyadevi holkar mahila krushi sanman


नाशिक : सलादे बाबा प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला कृषी सन्मान २०२६” जाहीर करण्यात आला आहे. नाथकृपा इव्हेंट, नाशिक यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून, महिलांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याचा उद्देश आहे.


 अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त हा विशेष सन्मान आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला कृषी पुरस्काराचे विजेते ठरलेल्या महिलांच्या नावांमधून यंदाही पात्र महिलांची निवड करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील शेती करणाऱ्या किंवा कृषीशी संबंधित उद्योगात कार्यरत असलेल्या महिलांची नावे सुचविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 नाव सुचविताना संबंधित महिलेचे नाव, पत्ता, पतीचे नाव, संपर्क क्रमांक तसेच सुचविणाऱ्या व्यक्तीची माहिती देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, पुरस्कार निवडीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. निवड झालेल्या महिलांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पारंपरिक महाराष्ट्र फेटा, तसेच इतर आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.


  हा सन्मान सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांचा गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमात सांस्कृतिक उपक्रमांचाही समावेश असणार आहे.

 

   अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9921330013 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नाशिकमध्ये केसर शेतीचा आधुनिक प्रयोग | Kusumbh Saffron Farm | Akshay Vadnere Success Story

नाशिकमध्ये आधुनिक केसर शेतीचा नवा प्रयोग! अक्षय वडनेरे यांचे कुसुंभ Saffron Farm & Training Center    भारतीय शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वाप...