name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): January 2022

सावली बाेलली एक दिवस (shadow spoke one day)

सावली बाेलली एक दिवस...
Shadow spoke one day 


Shadow spoke one day


सावली बाेलली एक दिवस,

मी कधीही नाश पावणार, 

प्रत्येकासाठी ताे दिवस, 

मी निश्चितच उगवणार... 


सावली बाेलली एक दिवस,

क्रयशक्ती घालताेस वाया, 

साेड नाद भाैतिक जगाचा,

पाश असताे माेह,माया... 


सावली बाेलली एक दिवस, 

मुख्य प्रतिमेला जप, 

जीवन असते अनमोल,

ते असते एक ऐहिक तप... 


सावली बाेलली एक दिवस,

मलाही असते मन, 

मीच असते तुझी सावली, 

सावलीच मुख्य धन... 


© दीपक अहिरे, नाशिक


आम्ही ऋणी साहित्याचे (We are indebted to the literature)

आम्ही ऋणी साहित्याचे
We are indebted to the literature


We are indebted to the literature


आम्ही ऋणी साहित्याचे, 
साहित्य मनावर काेरलेले,
वाचन, लेखन नियमित,
सवयीने आमच्यात उतरलेले...

आम्ही ऋणी साहित्याचे, 
साहित्य हवं ते प्रकट करतं,
स्वतःचा स्वतःशी संवाद,
जीवनात लेखनकला फुलवतं...

आम्ही ऋणी साहित्याचे,
लिहिणं भिडतं अंतरंगाला,
लिहिणंअसतं प्रवाही हाेणं,
वाचनाचा व्यासंग हृदयाला...

आम्ही ऋणी साहित्याचे, 
साहित्य आयुष्य बदलवते,
चांगले मित्र व चांगली पुस्तके,
आयुष्य आमचे घडवते...

© दीपक अहिरे, नाशिक


नवीन सुरूवात (A new beginning)

नवीन सुरूवात
A new beginning


A new beginning

 

नवीन वाट साेपी नसते,

जुनी वाट रुळलेली असते..

नवी वाट चाेखाळून पाहावी, 

नवीन सुरूवात करावी...


नव्या वाटेवर पाेहचावे,
आत्मविश्वास चिकाटी लागते..
धडाडीने मार्गक्रमणा करावी, 
नवीन सुरूवात करावी...



नव्या वाटेने जे नाही केले,
ते तुम्ही नाविन्यतेने करावे...
चिकित्सकतेने वाट शाेधावी,
नवीन सुरूवात करावी...


नव्या वाटेने जावे,
पण जुन्या वाटेत पाय रूतलेला..
सुरक्षेची भावना असावी, 
नवीन सुरूवात करावी...


© दीपक अहिरे,नाशिक


परिवर्तनाचा वाटसरू (on the way to change)


परिवर्तनाचा वाटसरू
On the way to change


On the way to change


परिवर्तनाचा वाटसरू, 
बाळगताे जिज्ञासा, 
विकास व समृद्धीतून,
विकसित हाेते आशा... 

परिवर्तनाचा वाटसरू,
साैजन्य बाळगताे, 
साैजन्यशील नम्रता,
संवेदनशीलता जाेपासताे... 

परिवर्तनाचा वाटसरू,
संघटनाची सिध्दी असावी, 
संघटनकौशल्य महत्त्वाचे, 
जुने साैहार्द शाेधावी... 

परिवर्तनाचा वाटसरू,
आव्हानं हीच प्रेरणा, 
कार्य करण्यासाठी प्रेरक,
बदल घडवताे मना... 

परिवर्तनाचा वाटसरू,
धाडस करा बेधडक, 
धीटपणे सामाेरे जा,
हेच असतं यशाचं गमक... 

परिवर्तनाचा वाटसरू, 
यशासाठी प्रतिक्षा करा, 
वाट पहावीच लागते,
थाेडं थांबून धीर धरा...

© दीपक अहिरे, नाशिक

गंधाळलेली स्वप्ने (Haunted Dreams)

गंधाळलेली स्वप्ने
Haunted Dreams

Haunted Dreams

गंधाळलेली स्वप्ने, 
काैशल्याने येतात,            
काैशल्य आत्मसात, 
वाया नाही जात...           

गंधाळलेली स्वप्ने, 
निर्णयाने येतात,               
निर्णयाशिवाय कृती, 
आपला वेळ घेतात. ..       

गंधाळलेली स्वप्ने, 
सर्वस्व ओतावे, 
द्यावे याेगदान, 
हवे ते मागावे... 

गंधाळलेली स्वप्ने, 
चारित्र्य घडवाच, 
आपोआप आपलं, 
चरीत्र घडतंच... 

© दीपक अहिरे, नाशिक

स्वातंत्र्याची पहाट (Dawn of freedom)

स्वातंत्र्याची पहाट
Dawn of freedom

Dawn of freedom


स्वातंत्र्याची पहाट,
त्र्याहतराव्या वर्षात,
बलशाली माझा भारत,
सलामी घराघरात.. 

स्वातंत्र्याची पहाट,
विकसित आम्ही झालाे
प्रत्येक क्षेत्रात, 
आगेकूच करत राहिलाे... 

स्वातंत्र्याची पहाट,
तरूण आमचे शक्तीस्थान
त्र्याहतराव्या वर्षात, 
मिळताे आम्हांस मान... 

स्वातंत्र्याची पहाट,
जपू  मानाची परंपरा
सुंदर सुजलाम करू, 
ही गाैरवशाली धरा... 

© दीपक अहिरे, नाशिक
  

   

समाज काय म्हणेल? (What will society say?)

समाज काय म्हणेल?
What will society say?


What will society say?


समाज काय म्हणेल, 

कर्तव्यात का ठेवावी कसूर,

पुढ्यात घडणाऱ्या घटनांनी, 

का मग बडवावा ऊर...


समाज काय म्हणेल,

काही कर्तव्याला विसरली,

कर्तव्याच जीवनसार,

खाल्या मिठाला जी जागली...


समाज काय म्हणेल, 

कर्तव्यकारणी वाकत नाही मुलं,

त्यांच्यासाठी नाही उपयोगी, 

कर्तव्याचं ज्ञान जे खुलं...


समाज काय म्हणेल,

राष्ट्रहित कर्तव्य जपावे प्रत्येकाने,

नाहीतर हाेईल जगणं, 

अंगभूत आपआपल्या उपेक्षेने...

© दीपक अहिरे, नाशिक


जाणीव झाली (realized)

जाणीव झाली
realized


Realized


जाणीव झाली, 

केली काटकसर,

दूरदृष्टी महत्त्वाची, 

कशाला हात पसर...


जाणीव झाली, 

जागवला स्वाभिमान,

स्वतःच ठेवला, 

स्वतःबद्दलचा अभिमान...

Realized

जाणीव झाली, 

ठेवताे व्यासंग,

मीच माझ्यात, 

हाेताे बघा दंग...


जाणीव झाली, 

स्वप्न पाहताे माेठे,

कशाला देवू तुम्हां, 

आश्वासन खाेटे...


जाणीव झाली, 

जागवताे इच्छाशक्ती,

पाऊल पुढे टाकू, 

तुझ्या ठायी भक्ती...


जाणीव झाली, 

धीर आता धरा,

पेरलेलं उगवतंच, 

सृष्टीचा नियम खरा...


जाणीव झाली, 

चिंता आता साेडा,

कशाला घालतात, 

कामाला खाेडा...


जाणीव झाली, 

नशिबावर हवाला,

ठेवा भरवसा, 

भरा कृतीचा पेला...


© दीपक अहिरे, नाशिक


कळले मला न केव्हा (I didnt know when)

कळले मला न केव्हा...
I didnt know when


I didn't know when

कळले मला न केव्हा,
जेव्हा ध्येय गाठण्यात गुंतलाे, 
जीव सारा एकवटून, 
लक्ष्य आता गाठू लागलाे... 

कळले मला न केव्हा, 
ध्येयावर केंद्रीत झालाे, 
आत्मविश्वास जागला, 
विजयाचा निश्चय करू लागलाे...

कळले मला न केव्हा, 
अपमानाचा घाव जिव्हारी, 
अपमानाने अंतर्बाह्य, 
माणसं बदलतात सारी.. 

कळले मला न केव्हा, 
अपयशासारखा नाही गुरू, 
अपयशातून उठून, 
ध्येय गाठण्या केले आता सुरू.. 

© दीपक अहिरे, नाशिक

बदलता हिवाळा (A Changing Winter)

बदलता हिवाळा...
A Changing Winter

A Changing Winter

बदलता हिवाळा,

पाडताे खूप थंडी,

अंगावर कायमच,

स्वेटरची घालावी बंडी


बदलता हिवाळा,

आजारांना निमंत्रण,

कसे करावे याचे,

हाेत नाही नियंत्रण


बदलता हिवाळा, 

पाऊसही पाडताे,

पिकांवर गारपीट, 

धुक्याची चादर ओढताे


बदलता हिवाळा, 

त्रास खूप देताे,

ऋतूचे आता 'हिवसाळा', 

नामकरण करताे.

© दीपक अहिरे, नाशिक


अर्धीच रात्र वेडी (Half the night is crazy)

अर्धीच रात्र वेडी...
Half the night is crazy

Half the night is crazy

अर्धीच रात्र वेडी, 
जीव तगमग झाला,
खाेकल्यामुळे जीव
कासावीस झाला...

अर्धीच रात्र वेडी, 
बेजार थंडीने,
गाेधडीत अंग
झाले सुरू शहारणे...

अर्धीच रात्र वेडी, 
घामाघूम झालाे,
नकाे ते अति विचार
घाबरून गेलाे...

अर्धीच रात्र वेडी, 
जागेपणी काढली,
वैद्याला गाठून, 
तपासणी केली...

अर्धीच रात्र वेडी
शंका दूर झाली,
आता विश्रांती, 
सक्तीची झाली...

© दीपक अहिरे, नाशिक


अपूर्ण राहिली (Remained incomplete)

अपूर्ण राहिली...
Remained incomplete 

Remaimed incomplete

अपूर्ण राहिली, 
पूर्ण कधी करणार, 
स्वप्न आपली, 
कधी आपण स्मरणार... 

अपूर्ण राहिली, 
व्यक्त का हळहळ, 
स्वप्न पूर्ण करण्याला, 
कसे मिळेल बळ... 

अपूर्ण राहिली, 
म्हणून प्रयत्न साेडायचा, 
स्वप्न पूर्णत्वासाठी, 
वेग आता वाढवायचा... 

अपूर्ण राहिली, 
गप्प का बसावे आपण, 
स्वप्नपूर्तीलाठी मिरवू या, 
आपले माेठेपण... 

© दीपक अहिरे, नाशिक

ह्या क्षणी (At this moment)

ह्या क्षणी (चारोळी) 
At this moment 

At this moment

ह्या क्षणी इंडिया कितीही झाला,

ऑनलाईन आणि डिजिटल
भारतात बाजरी पिकवावीच लागते,
भाकरी डाऊनलोड हाेत नसते

© दीपक अहिरे, नाशिक

आयुष्याच्या शर्यतीत (Race of life)

आयुष्याच्या शर्यतीत...
Race of life

Race of life

आयुष्याच्या शर्यतीत, 
प्रवास सुरू एका पावलाने, 
सातत्याने पाऊल टाका, 
पाेहचाल तुम्ही चिकाटीने...

आयुष्याच्या शर्यतीत, 
असामान्य मेहनत लागते, 
यशाची किंमत तुम्हाला, 
कष्टांनीच चुकवता येते...

आयुष्याच्या शर्यतीत, 
सर्वोत्तम नियोजन लागते, 
दृष्टीकोनच तुम्हाला घडवताे, 
अनुभवच ज्ञान देते...

आयुष्याच्या शर्यतीत, 
महत्त्वाची कृतीशीलता, 
कार्यक्षमतेसाठी स्पर्धा, 
त्याशिवाय नाही परिपूर्णता...

© दीपक अहिरे,नाशिक

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... 
World of colourful flowers 


World of colourful flowers


रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात, 
लक्ष वेधताे गुलाब, 
विविधरंगी चित्तवेधक पाकळ्या, 
ठेवा त्याची आब...

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात, 
लांब दांड्याचे जरबेरा, 
फुलांच्या विश्वात लक्ष वेधते, 
झेंडू, ऑस्टर व साेनतुरा...

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात, 
माेगराववर्गीय फुलझाडे, 
गव्हासारख्या लाेंबी छेदातून,
अबाेलीचे वाढतात वाढे...

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात,
शेवंती,लिली व निशिगंधा, 
बर्ड पॅराडाइज कटफ्लाॅवर,
गेलार्डीयाची चलती सध्या

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात,
ऑथूरियम हे अळूचं पान, 
हरितगृहात फुलांची शेती, 
फुलतात विविध फुलं छान...

© दीपक अहिरे, नाशिक

शब्द माझ्या मनातले (words in my mind)

शब्द माझ्या मनातले...
Words in my mind

Words in my mind

शब्द माझ्या मनातले, 
विश्वास ठेवा शब्दांवर, 
शब्द एकत्र करतात, 
केंद्रीत करतात ऊर्जेवर... 

शब्द माझ्या मनातले,
सातत्याने शाेध शब्दांचा, 
शब्द देतात आशय, 
अनाेखा शब्द नाविन्याचा... 

शब्द माझ्या मनातले, 
शब्द बनतात कधी शस्त्र, 
शब्द देतात विचार, 
कधी शब्द हाेतात अस्त्र... 

शब्द माझ्या मनातले, 
लेखणीत ते उतरतात, 
शब्दांच्या रूपानेच, 
ते तुमच्याशी बाेलतात... 

शब्द माझ्या मनातले, 
चिरंजीव ते हाेतात, 
शब्दच माझ्या जीवनाला, 
अर्थ प्राप्त करतात... 

शब्द माझ्या मनातले, 
तुम्हाला ते फुलवतात, 
शब्दानेच तुमचं मन, 
माझ्या शब्दांशी जाेडतात... 

© दीपक अहिरे, नाशिक

आठवणींची शाळा भरली (School of memories)

आठवणींची शाळा भरली...
School of memories

School of memories

आठवणींची शाळा भरली,
आठवले गुरूजी शिक्षक, 
आठवणी विद्यार्थीच्या,
आठवणीच झाल्या रक्षक..

आठवणींची शाळा भरली,
आठवणींच्या सूर-पारंब्या, 
आठवणी मनात घाेळू,
आठवणींच्या काढल्या खुब्या...

आठवणींची शाळा भरली,
आठवणीने गायले स्तवन, 
आठवणी आठवून आठवून,
भरले विद्यार्थीचे मन...

आठवणींची शाळा भरली,
वाचले आठवणींचे पुस्तक, 
आठवणींचा गिरवला धडा,
आठवणीने भरले मस्तक...

© दीपक अहिरे, नाशिक 

संकट आणि संघर्ष (Crisis and conflict)

संकट आणि संघर्ष
Crisis and conflict

Crisis and conflict

संकट आणि संघर्ष, 
येतात दाेन्ही हात धरून, 
संकटाशी करावा सामना, 
संघर्षाने उरताे पुरून उरून...

यशाचा राजमार्ग मिळताे, 
संकट आणि संघर्षातून, 
कशाला जायचं आपण, 
संकटातून खचून...

संकट आणि संघर्षाचा, 
अनुभव देताे नवं शिक्षण, 
संकट आणि संघर्षाव्दारे, 
साेडू नका कधी लढणं...

संकट आणि संघर्ष, 
दारात मांडतात ठाण, 
दार उघडण्याचा अवकाश, 
संधीचं उघडतं पान...

© दीपक अहिरे, नाशिक

चहा (TEA)

चहा... 
TEA

Tea


काॅफी म्हणजे प्रेम,
चहा म्हणजे आयुष्य, 
आमचं चहा-काॅफी, 
म्हणजे हवहवसं... 

चहा-काॅफी येथलं,
म्हणजे अमृततुल्य, 
येथल्या चहाचं, 
हाेत नाही कुठलं मुल्य... 

चहाची तल्लफ,
भागवतात शाेैकीन, 
टपरीवजा हाॅटेल,
आमचे आहे नामचीन... 

दुरून दुरून पिण्यासाठी,
प्रसिद्ध गुळाचा चहा, 
तुम्हीही म्हणाल एकदा, 
वाहवा..वाहवा..वाहवा... 

© दीपक अहिरे, नाशिक

उगाच का रडत बसावे (Why should you cry)

उगाच का रडत बसावे...
Why should you cry


Why should you cry


परिणामाचा नाही विचार, 
कृतीला कारण ठरावे, 
विचार करून करावी कृती, 
उगाच का रडत बसावे...

समस्येचा हेतू हाच असतो, 
तुम्ही त्यात अडकावे, 
संयतपणा दाखवत जावा, 
उगाच का रडत बसावे...

जगाच्या कृतीवर तुमचे, 
काही अवलंबून नसावे, 
कृतीची प्रतिक्रिया उमटते, 
उगाच का रडत बसावे...

प्राेत्साहन माणसाला, 
लढण्यासाठी बळ देत असावे, 
इच्छाशक्ती वाढवत रहावे, 
उगाच का रडत बसावे...

© दीपक अहिरे, नाशिक

आज सकाळी (This morning)

आज सकाळी...
This Morning 

This morning

This morning


आज सकाळी,
पक्षांनी केला गलका, 
अरे आपला मित्र,
अजून नाही उठला का?... 

आज सकाळी,
पक्षांनी केली कलकल, 
त्यांनी केली माझ्यासाठी,
अपेक्षित ती हलचल... 

आज सकाळी, 
आले खिडकीपाशी पक्षी, 
चुळबुळ केली माझ्याशी, 
रवी किरणे हाेते साक्षी... 

आज सकाळी,
चाेचीनेच केले अभिवादन, 
पक्ष्यांची माया पाहून, 
हळूच शहारलाे मी मदन... 

© दीपक अहिरे, नाशिक

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...