name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): आम्ही ऋणी साहित्याचे (We are indebted to the literature)

आम्ही ऋणी साहित्याचे (We are indebted to the literature)

आम्ही ऋणी साहित्याचे
We are indebted to the literature


We are indebted to the literature


आम्ही ऋणी साहित्याचे, 
साहित्य मनावर काेरलेले,
वाचन, लेखन नियमित,
सवयीने आमच्यात उतरलेले...

आम्ही ऋणी साहित्याचे, 
साहित्य हवं ते प्रकट करतं,
स्वतःचा स्वतःशी संवाद,
जीवनात लेखनकला फुलवतं...

आम्ही ऋणी साहित्याचे,
लिहिणं भिडतं अंतरंगाला,
लिहिणंअसतं प्रवाही हाेणं,
वाचनाचा व्यासंग हृदयाला...

आम्ही ऋणी साहित्याचे, 
साहित्य आयुष्य बदलवते,
चांगले मित्र व चांगली पुस्तके,
आयुष्य आमचे घडवते...

© दीपक अहिरे, नाशिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...