name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): परिवर्तनाचा वाटसरू (on the way to change)

परिवर्तनाचा वाटसरू (on the way to change)


परिवर्तनाचा वाटसरू
On the way to change


On the way to change


परिवर्तनाचा वाटसरू, 
बाळगताे जिज्ञासा, 
विकास व समृद्धीतून,
विकसित हाेते आशा... 

परिवर्तनाचा वाटसरू,
साैजन्य बाळगताे, 
साैजन्यशील नम्रता,
संवेदनशीलता जाेपासताे... 

परिवर्तनाचा वाटसरू,
संघटनाची सिध्दी असावी, 
संघटनकौशल्य महत्त्वाचे, 
जुने साैहार्द शाेधावी... 

परिवर्तनाचा वाटसरू,
आव्हानं हीच प्रेरणा, 
कार्य करण्यासाठी प्रेरक,
बदल घडवताे मना... 

परिवर्तनाचा वाटसरू,
धाडस करा बेधडक, 
धीटपणे सामाेरे जा,
हेच असतं यशाचं गमक... 

परिवर्तनाचा वाटसरू, 
यशासाठी प्रतिक्षा करा, 
वाट पहावीच लागते,
थाेडं थांबून धीर धरा...

© दीपक अहिरे, नाशिक

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...