name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... 
World of colourful flowers 


World of colourful flowers


रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात, 
लक्ष वेधताे गुलाब, 
विविधरंगी चित्तवेधक पाकळ्या, 
ठेवा त्याची आब...

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात, 
लांब दांड्याचे जरबेरा, 
फुलांच्या विश्वात लक्ष वेधते, 
झेंडू, ऑस्टर व साेनतुरा...

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात, 
माेगराववर्गीय फुलझाडे, 
गव्हासारख्या लाेंबी छेदातून,
अबाेलीचे वाढतात वाढे...

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात,
शेवंती,लिली व निशिगंधा, 
बर्ड पॅराडाइज कटफ्लाॅवर,
गेलार्डीयाची चलती सध्या

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात,
ऑथूरियम हे अळूचं पान, 
हरितगृहात फुलांची शेती, 
फुलतात विविध फुलं छान...

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 2026 : तीन वर्षांची मुदतवाढ, पात्रता, लाभ व अर्ज प्रक्रिया / Gopinath Munde Farmer Accident Security Ex-Gratia Grant Scheme 2026: 3-Year Extension, Eligibility, Benefits & Application Process

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस तीन वर्षांची मुदतवाढ Gopinath Munde Farmer Accident Security Ex-Gratia Grant Schem...