उगाच का रडत बसावे...
Why should you cry
परिणामाचा नाही विचार,
कृतीला कारण ठरावे,
विचार करून करावी कृती,
उगाच का रडत बसावे...
समस्येचा हेतू हाच असतो,
तुम्ही त्यात अडकावे,
संयतपणा दाखवत जावा,
उगाच का रडत बसावे...
जगाच्या कृतीवर तुमचे,
काही अवलंबून नसावे,
कृतीची प्रतिक्रिया उमटते,
उगाच का रडत बसावे...
प्राेत्साहन माणसाला,
लढण्यासाठी बळ देत असावे,
इच्छाशक्ती वाढवत रहावे,
उगाच का रडत बसावे...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा