name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): शब्द माझ्या मनातले (words in my mind)

शब्द माझ्या मनातले (words in my mind)

शब्द माझ्या मनातले...
Words in my mind

Words in my mind

शब्द माझ्या मनातले, 
विश्वास ठेवा शब्दांवर, 
शब्द एकत्र करतात, 
केंद्रीत करतात ऊर्जेवर... 

शब्द माझ्या मनातले,
सातत्याने शाेध शब्दांचा, 
शब्द देतात आशय, 
अनाेखा शब्द नाविन्याचा... 

शब्द माझ्या मनातले, 
शब्द बनतात कधी शस्त्र, 
शब्द देतात विचार, 
कधी शब्द हाेतात अस्त्र... 

शब्द माझ्या मनातले, 
लेखणीत ते उतरतात, 
शब्दांच्या रूपानेच, 
ते तुमच्याशी बाेलतात... 

शब्द माझ्या मनातले, 
चिरंजीव ते हाेतात, 
शब्दच माझ्या जीवनाला, 
अर्थ प्राप्त करतात... 

शब्द माझ्या मनातले, 
तुम्हाला ते फुलवतात, 
शब्दानेच तुमचं मन, 
माझ्या शब्दांशी जाेडतात... 

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 2026 : तीन वर्षांची मुदतवाढ, पात्रता, लाभ व अर्ज प्रक्रिया / Gopinath Munde Farmer Accident Security Ex-Gratia Grant Scheme 2026: 3-Year Extension, Eligibility, Benefits & Application Process

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस तीन वर्षांची मुदतवाढ Gopinath Munde Farmer Accident Security Ex-Gratia Grant Schem...