कळले मला न केव्हा...
I didnt know when
कळले मला न केव्हा,
जेव्हा ध्येय गाठण्यात गुंतलाे,
जीव सारा एकवटून,
लक्ष्य आता गाठू लागलाे...
कळले मला न केव्हा,
ध्येयावर केंद्रीत झालाे,
आत्मविश्वास जागला,
विजयाचा निश्चय करू लागलाे...
कळले मला न केव्हा,
अपमानाचा घाव जिव्हारी,
अपमानाने अंतर्बाह्य,
माणसं बदलतात सारी..
कळले मला न केव्हा,
अपयशासारखा नाही गुरू,
अपयशातून उठून,
ध्येय गाठण्या केले आता सुरू..
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा