जाणीव झाली
realized
जाणीव झाली,
केली काटकसर,
दूरदृष्टी महत्त्वाची,
कशाला हात पसर...
जाणीव झाली,
जागवला स्वाभिमान,
स्वतःच ठेवला,
स्वतःबद्दलचा अभिमान...
जाणीव झाली,
ठेवताे व्यासंग,
मीच माझ्यात,
हाेताे बघा दंग...
जाणीव झाली,
स्वप्न पाहताे माेठे,
कशाला देवू तुम्हां,
आश्वासन खाेटे...
जाणीव झाली,
जागवताे इच्छाशक्ती,
पाऊल पुढे टाकू,
तुझ्या ठायी भक्ती...
जाणीव झाली,
धीर आता धरा,
पेरलेलं उगवतंच,
सृष्टीचा नियम खरा...
जाणीव झाली,
चिंता आता साेडा,
कशाला घालतात,
कामाला खाेडा...
जाणीव झाली,
नशिबावर हवाला,
ठेवा भरवसा,
भरा कृतीचा पेला...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा