name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): माेजकेच बाेलू (Little talk)

माेजकेच बाेलू (Little talk)

माेजकेच बाेलू ...
Little talk

Little talk

माेजकेच बाेलू 
आवरा फापटपसारा, 
नेमक्या शब्दांच्या 
काेसळू द्या धारा...

माेजकेच बाेलू 
साधू ह्दयस्थ संवाद, 
माेजके बाेलणे घालते 
मनामनाला साद... 

माेजकेच बाेलू 
हेच जीवनाचे सार, 
शब्दांना हवी जरा 
आपुलकीची धार... 

माेजकेच बाेलू 
का करावी व्यर्थ बडबड, 
माेजकेच बाेलून फुलवू 
हा जीवनाचा वड... 

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा