name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): चित्रकार (The painter)

चित्रकार (The painter)

चित्रकार
The Painter


Painter

चित्रकार काढताे
चित्र भावभावनांचे,
करा काैतुक त्याच्या
अभिनव कुंचल्याचे... 

चित्रकार ओतताे
चित्रात सारा जीव,
बघणार्याला वाटते
आहे कसे ते सजीव...
Painter

चित्रकार टिपताे
रंग रेषा मनस्वी,
दाद द्या काैतुकाने
चित्रांचा ताे तपस्वी...

चित्रकार आहे
चित्रसृष्टीचा नियंता,
नमस्कार त्याला माझा
या कुंचल्याचा भगवंता...

© दीपक अहिरे, नाशिक
Painter

No comments:

Post a Comment

रानवांगीची लागवड ते उत्पादन I Cultivation to production of wild brinjal

🌿 रानवांगीची लागवड ते उत्पादन Cultivation to Production of Wild Brinjal      रानवांगी ही नैसर्गिक औषधनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची वनस्प...