name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): सारे म्हणतात मी कविता करताे

सारे म्हणतात मी कविता करताे


सारे म्हणतात मी कविता करतो,
खरं सांगतो कवितेद्वारे मी भावना मांडतो...

कवितेद्वारे होतो भावभावनांचा निचरा,
साफ होऊन जातो मनातील कचरा...

कवितेद्वारे साधतो मी संवाद,  
कुठलाही नसतो यात निरर्थक वाद...

कवितेद्वारे फोडतो मी  प्रश्नांना वाचा, 
कवितेद्वारे जोडतो मी  मनामनातील काचा... 

कवितेद्वारे होते असंख्य प्रश्नांची उकल, 
वाचकाला आवडतात म्हणून ते देतात फळ... 

सारे म्हणतात मी कविता करतो, 
खरं सांगतो मी कवितेद्वारे शब्दखेळ मांडतो... 

@ दीपक केदू अहिरे, नाशिक 





No comments:

Post a Comment

मायक्रोग्रीन शेती व्यवसाय | Microgreen Farming Business : कमी गुंतवणुकीत घरातून जास्त नफा

  🌱 मायक्रोग्रीन शेती व्यवसाय: कमी जागेत जास्त नफा देणारा आधुनिक उद्योग Microgreens Business in Marathi | कमी गुंतवणुकीत जास्त कमाई      ...