ओसाड माझे घर
Desolate my house
©दीपक अहिरे, नाशिक
name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” />
शेती, काव्य आणि सकारात्मक विचारांनी बहरलेला ‘स्व-काव्यांकुर’ हा मराठी ब्लॉग आहे. शेतीविषयक मार्गदर्शन, प्रेरणादायी लेख व लोकोपयोगी माहितीचा आस्वाद घ्या. ‘Swa-Kavyankur’ is a Marathi blog enriched with agriculture, poetry, and positive thoughts. Explore practical agricultural guidance, inspirational articles, and useful information.”
©दीपक अहिरे, नाशिक
पक्ष्यांची शाळा
भरली बागेमध्ये,
पाेपटाची भूमिका
मुख्याध्यापकामध्ये...
पक्ष्यांची शाळा
विद्यार्थी विविध पक्षी,
शाळा भरली झाडावर
आभाळ झाले साक्षी...
पक्ष्यांची शाळा
चिमणीचा चिवचिवाट,
किती सांगू मी
मैना मास्तरचा असा थाट...
पक्ष्यांची शाळा
गाणे रंगले सुरस,
काेकिळाने दिला आवाज
बाकी पक्ष्यांनी काेरस...
खंत जीवनात
नका आता साचवू,
निपटारा करा तिचा
कशाला ती आठवू...
खंत बाेलावी ती
संयम आणि संहतपणे,
यानेच हाेतील व्यवहार
जगणे सुरळीतपणे...
खंत जीवनाची
बाेलून दाखवा आता,
किती आणि कधी
आळवत त्या बसता...
खंत साेडावी
अगदी हळूवार,
जसा शहाण्याला
शब्दांचा बसताे मार...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
बळीराजा मी
आहे अन्नदाता,
काळी आई हीच
आमची माता...
बळीराजा मी
धनधान्य फुलवताे,
कष्टाच्या शेतात
मेहनतीची गाणी गाताे...
बळीराजा मी
पाेशिंदा जगाचा,
कष्ट करण्याचा
आहे आमचा साचा...
बळीराजा मी
आहे अनेक उपमा,
माझ्या कष्टाला नाही
येथे कुठलीच सीमा...
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
*राष्ट्रिय किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
www.ahiredeepak.blogspot.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.ahiredeepak.blogspot.com
उद्योगस्वामिनी : सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे) — प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली ग्रामीण उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल Udyog...