कळतं मला
कळतं मला
शब्द कसा वापरावा,
घासून पुसून
शब्द असा बाेलावा...
कळतं मला
पाणी कुठे मुरतंय,
वरवरच्या मलमपट्टीला
सर्वच आता सरावतंय...
कळतं मला
चांगले संबंध राखावे,
जग हे जपत असते
स्वार्थी देखावे...
कळतं मला
मी नाही राहिलाे लहान,
नाहक कारण नसतांना
हाेताेय तुमचा ताण...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा