name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): खंत...

खंत...

खंत

खंत जीवनात             

नका आता साचवू ,        

निपटारा करा तिचा        

कशाला ती आठवू...        

खंत बाेलावी ती

संयम आणि संहतपणे,

यानेच हाेतील व्यवहार

जगणे सुरळीतपणे...

खंत जीवनाची               

बाेलून दाखवा आता,      

किती आणि कधी         

आळवत त्या बसता...      

खंत साेडावी

अगदी हळूवार,

जसा शहाण्याला

शब्दांचा बसताे मार...

© दीपक केदू अहिरे, नाशिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...