माझ्या दारी
माझ्या दारी
फुलली आंब्याची बाग,
विविध फळफुलझाडांना
लागलाय भरघोस लाग...
माझ्या दारी
रान तुळस फुलल्या,
झुपकेदार मंजिरी
बघा कशा आल्या...
माझ्या दारी
फुलला गुलाब,
फळझाडांची ठेवताे
निगा आणि आब...
माझ्या दारी
फुलवली बाग छाेटेखानी,
तीच देते आनंद
वेळ लागतो सत्कारणी...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा