name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

राष्ट्राची एकात्मता व आपण (The unity of the nation and us)

राष्ट्राची एकात्मता व आपण
(जनजागरण)
The unity of the nation and us
 (mass awakening)

The Unity of the nation and us

      राष्ट्रीय एकात्मता म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी उत्कृष्ठ प्रकारच्या एकत्वाच्या, बंधुत्वाच्या भावनेचा परिपोष होय. समानभाव, समानधर्म, समान इतिहास, समान परंपरा, समान स्वभावधर्म, इत्यादी कारणांमुळे अगर यापैकी काही कारणांमुळे देशात एकात्मता येवू शकते. 

  भारताची संस्कृती ही इंद्रधनुष्याची संस्कृती आहे. सप्तरंगाची संस्कृती आहे. इंद्रधनुष्यातील एक एक रंग अलग केल्यास इंद्रधनुष्य राहणार नाही तसेच भारतातील प्रत्येक प्रांत अलग केल्यास भारत हे राष्ट्र म्हणून उरणार नाही. पण हे घडणार नाही. कारण एका बाजूला आमच्यावर मानवतावाद बंधन आहे तर दुसऱ्या बाजूला या मातीशी इथल्या वातावरणाशी आमचे प्रेम जडलेले आहे.

हिमालयाची आम्ही लेकरे

सागर आमचा भ्राता 

गंगा यमुना आमच्या माता

कसला भेद आता

गीता बायबल कुराण आम्हा

पवित्र या देशी

बुध्द महावीर शिवरायाची

गाऊ आम्ही आरती

हिंदू मुस्लिम शिख ईसाई

आम्ही सारे भाई-भाई

कोटी कोटी शरीरे आमची

जीव मात्र एका ठायी

   ही भारताची राष्ट्रीय एकात्मता आहे. शतकानुशकते भारत या ना त्या रुपात एक राष्ट्र म्हणून उभा आहे. वृत्तपत्रामधल्या रोज प्रसिध्द होणाऱ्या विध्वंसक बातम्या वाचल्या की, त्यावेळेस राष्ट्राच्या ऐक्याबद्दल चिंता वाटू लागते व भारताची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आली की काय असे वाटू लागते. 

The Unity of nation and us

  सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्व धर्माविषयी सारखाच आदरभाव, प्रेम होय. भारताने निधर्मी राज्याची, धर्मनिरपेक्षतेची कल्पना स्वीकारलेली आहे याचा अर्थ धर्माला विरोध किंवा धर्माचा अनादर करणे असा नसून धर्माबद्दल सारखा आदर असा आहे. 

   आर्यापासून ते इंग्रजांपर्यंत अनेक परकीय या देशात आले येतांना ते आपला धर्म, आपली संस्कृती व भाषा घेवून गेले. पण या सर्वांना भारतीय संस्कृतीने आपल्या विशालतेत सामावून घेतले. भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला व सर्वधर्मसमभावाच्या तत्वाला धक्का देणाऱ्या, तडा जाणाऱ्या अनेक गोष्टी भारतात घडत असल्या तरीसुध्दा भारत हे एक राष्ट्र म्हणून आज खंबीरपणे उभे आहे व भविष्यकाळातही एक राष्ट्र म्हणून जिवंत राहणार आहे. 

   नैसर्गिक आपत्ती, राष्ट्रीय संकट, परचक्र अशा आव्हानांच्या प्रसंगी भारतीय जनता परस्परांतील मतभेद विसरून एक होवून संकटाच्या मुकाबला करण्यास उभी राहते हे अनेकवार सिध्द झालेले आहे.

   भारतीय जनतेने आपल्या थोर नेत्यांच्या मार्गदर्शनाने, शहिदांच्या बलिदानाने, स्वातंत्र्यसैनिकाच्या त्यागातून, कोट्यवधी जनतेच्या निर्धारातून आणि कष्टातून स्वातंत्र्य मिळविले आहे. हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आर्थिक समृध्दीच्या प्रयत्नांबरोबरच देशात अंतर्गत शांतता, जातीय सलोखा, बंधूता व राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्याची गरज आहे. 

  राष्ट्रीय एकात्मतेची उभारणी विटा, माती आणि हातोड्याने होत नाही लोकांच्या मनात आणि हृदयात या भावनेचा संथपणे विकास झाला पाहिजे.

  राष्ट्रीय एकात्मतेच्या वाढीसाठी सर्वधर्मसमभावाची भावना वाढण्याची गरज आहे. प्राचीन भारतीय ऋषीमुनीनी व साधुसंतांनी सर्वधर्म एकच आहेत ही शिकवण दिली आहे. या जगाला परमेश्वर एकच आहे. अल्ला, कृष्ण, राम, ईश्वर ही सर्व त्याचीच रुपे आहेत. आणि जगातील सर्व प्राणी त्याचीच संतान आहेत हीच शिकवण वेद, उपनिषेद, कुराण व बायबलमधून देण्यात आली आहेत. 

The unity of the nation and us

  स्वतःच्या धर्माचा प्रसार व प्रचार करताना इतर धर्माची निंदा करतात तेव्हा साहजिकच धार्मिक तेढ निर्माण होवून राष्ट्रीय ऐक्याला धोका पोहचतो.

  भारतामध्ये वारंवार होणाऱ्या जातीय दंगली व दिसून येणारा धार्मिक संघर्ष नाहिसा करून सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी व त्याद्वारे राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी हे माझे आहे, हे तुझे आहे हा संकुचित विचार त्यागून हे जग एक संयुक्त कुटुंब आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे.       

  ऋषिमुनी, साधुसंत, विचारवंत यांनी दिलेली सर्वधर्मभावाची शिकवण लोकांच्या मनात हृदयात बिंबली पाहिजे. एखाद्या जातीतील काही मूठभर लोकांनी राष्ट्रविरोधी, जातीय संघर्ष पेटविणारी कृत्ये केली याचा अर्थ त्याबद्दल सुडाची व बदल्याची भावना धरणे सर्वार्थाने चुकीचे आहे. 

   राष्ट्रीय एकात्मता ही देशाची आज नितांत गरज आहे. व ही एकता सर्वधर्मसमभावाच्या पायावर आधारलेली असते. केवळ कायदे करून एकात्मता येणार नाही. तशी मनाची जडणघडण झाली पाहिजे. मी देशासाठी, त्याच्या ऐक्यासाठी सर्वस्वाचे बलिदान करायला तयार आहे ही प्रत्येक नागरिकाची जीवननिष्ठा असली पाहिजे.

© दीपक के.अहिरे
नाशिक

(पूर्व प्रसिध्दी : दै. तरुण भारत)

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube

Linkedin :
https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


साहित्यिकांच्या शब्दात 'पाऊस' ('Rain' in the words of writers)

 साहित्यिकांच्या शब्दात 'पाऊस'
'Rain' in the words of writers


Sahitiyankachya shabdat paus

  अश्मयुगापासून तर आजच्या अणुयुगापर्यंत मानवी मनाचे पावसाशी नाते आहे. भावनांच्या अदिम आविष्कारापासून तो अभिजात स्पंदनांपर्यंत 'पाऊस' सर्वसाक्षी आहे. अनेक लेखकांनी, कवींनी पावसावर लिहिले. पावसाचे आणि त्यांचे नाते इतके घट्ट आहे जसे जीवन-मरणाचे, मातीचं आणि पावसाचं नातं सांगणारी कविता शांता शेळके सहजपणे करून जातात
'आला पाऊस मातीच्या वासात गं...
मोती गुंफीत मोकळ्या केसात गं...
      
  पावसाच्या थेंबाचं संजीवन धरतीला मिळालं की धरती टवटवीत होते. उन्हाळ्याने केलेला कठोर आघात विसरण्याचा प्रयत्न करते. अरुणा ढेरेंच्या  कवितेत 'पाऊस' वेगळाच भासतो-
'घन आले म्हणता म्हणता
पाऊस असा आला की
जरी मिटुनी घेतले डोळे
हृदयाची भिजली माती
तू ओंजळ फक्त पसरली
अन् म्हटले नाही काही
सोसल्या अनावर धारा
जशी सोसत असते बाई !'
 
 मंगेश पाडगावकरांना प्रियकराला आर्जवून सांगणाऱ्या सखीच्या भूमिकेत पाऊस दिसतो
'मातीच्या ओल्या ओल्या वासात
वाऱ्याच्या खोल खोल श्वासात
झाडाचं भिजणं सुंदर आहे
माझ्या जीवा जगणे सुंदर आहे.'
        
   पाऊस कधी मातीच्या कुशीत तान्हं बाळ होतं, मोराचं पीस खोवलेला नटखट श्यामल कान्हा होतो. कधी पाऊस छेड काढतो म्हणून इंदिरा संत आपल्या कवितेत म्हणतात-
'नको नको रे पावसा,
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली

Sahitiyankachya shabdat paus

जमिनीवर कोसळणाऱ्या पावसाच्या धारांना पाहून कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात -
'बरसे रे घन बरसे रे
बरसे जलसर आले सरसर
मल्हाराचे स्वरसे रे, 
बन बरसे रे!'
  
 वा. रा. कांताच्या काव्यातून होणारी पाऊसभेट नि झपाटणारं प्रेम काव्यातून अनुभवायला रसिकमन हवं. ते म्हणतात -
'केस चिंब ओले होते
थेंब तुझ्या गाली
ओठावर माझ्या त्यांची
किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा
प्रीतीच्या रसाची

 अंतःकरणातून दाटून आलेलं दुःख पावसांच्या धारांनी एकरूप होते. याचा प्रत्यय ग्रेस यांच्या कवितेत येतो
'पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलकी पाने
हलकेच जाग मज ओली
दुःखाच्या मंद सुराने ॥"
 
 अशाप्रकारे साहित्यिकांच्या मनात पावसाने घर केलेले आहे. पावसाची विविध रूपे आपल्याला भुरळ पाडतात. पाऊस हवाहवासा वाटतो कारण तो जमिनीची भूक तर भागवतोच, पण आपल्या मनाचीही भागवतो. म्हणून म्हणावंसं वाटतं-

'पाऊस मातीलाच नव्हे तर
मनालाही भिजवतो
कोंब कोंब मातीत नव्हे
मनातही उगवतो."

दीपक के. अहिरे
आनंदपूर / नाशिक

(पूर्व प्रसिध्दी : दै. लोकमत दि. ९ ऑगस्ट १९९८)

Rain in the words of writers

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

जागतिक पर्यावरण आरोग्य दिन (World Environmental Health Day)


जागतिक पर्यावरण 
आरोग्य दिन 
World Environmental Health Day


World environmental health day
World environmental health day


दरवर्षी २६ सप्टेंबरला होतो 
जागतिक पर्यावरण आरोग्यदिन साजरा, 
वर्तमान व भावी 
पिढ्यांच्या हितासाठी 
जबाबदारीने पर्यावरणाचं रक्षण करा... 

पर्यावरण आणि आरोग्य 
पूरक आहेत एकमेकांना, 
तुमचं शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी 
निसर्गाच्या सान्निध्यात राहा..ना... 


निसर्गाचं महत्व समजण्याची गरज 
घरात, शेतात आजूबाजूला झाडे लावा, 
तुळस,स्पायडर प्लांट,अरेका पाम लावून 
घरात हवा शुद्ध नी खेळती ठेवा... 


वाढत्या प्रदूषणामुळे मिळत नाही ऑक्सिजन 
वाढत आहेत श्वसनाचे विकार,  
निसर्ग जगला तर 
मानव जगेल 

निसर्गाची हानी करण्याला द्या नकार... 


© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube

Linkedin :
https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


शिक्षण महर्षी- कर्मवीर भाऊराव पाटील (Shikshan Maharshi- Karmaveer Bhaurao Patil)

शिक्षण महर्षी- कर्मवीर भाऊराव पाटील
Shikshan Maharshi- Karmaveer Bhaurao Patil

Karmveer

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कै. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती दि. २२ सप्टेम्बर रोजी सर्वत्र साजरी करण्यात येईल त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा हा लेख. (पूर्व प्रसिध्दी: २२ सप्टेंबर १९९०, दैनिक रामभुमी )

      

 कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्हयातील कुंभोज गावी सप्टेम्बर १८८७ मध्ये झाला. कर्मवीर भाऊरावांच्या जीवनाचा आलेख मोठा मनोहारी व स्फूर्तीदायी आहे. खेडयातील रम्य परिसराचा व सत्प्रवण माता पित्यांच्या शिकवणुकीचा भाऊरावांच्या मनावर मोठा परिणाम झाला. सत्यनिष्ठा, समदृष्टी, सेवाभाव, ममत्व हे गुण त्या त्यांच्यात आढळून येत. त्यांच्या स्वतःच्या कार्यामागे स्पष्ट, वस्तुनिष्ठ विचारांची बैठक होती. आपल्या कार्याविषयी श्रद्धा होती. हे सर्व गुण बालपणीच त्यांच्या मनःपटलावर कायमचे ठसलेले होते.

  

 शंभर वर्षांपूर्वीही जनमानसात इंग्रजी शिक्षणावर विश्वास होता. त्यानुसार भाऊरावांना कोल्हापुरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी धाडण्यात आले. इंग्रजी सहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे शिक्षण थांबले. कोल्हापुरात शिकत असतांना भाऊरावांची राहण्याची व्यवस्था जैन वसतिगृहात होती. तेथील कर्मठ शिस्त त्यांना सहन होत नसे. अशातच एकदा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी घडलेल्या मिस क्लार्क होस्टेलच्या उद्घाटनप्रसंगी भाऊरावांनी काम केले. त्याबद्दल भाऊरावांना आंघोळ करून येण्यास सांगितले. आपल्यासारख्याच माणसाला स्पर्श केल्याने आपण अमंगल होतो हे भाऊरायांना पटत नव्हते. त्याचा एकूण परिणाम असा झाला की भाऊरायांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. पण त्याचा भाऊरावांना फायदाच झाला. ते छत्रपती शाहू महाराजाच्या सानिध्यात आले. त्यांच्यामुळे भाऊरावांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. समाजातील विषमता, दारिद्रय, अज्ञान, उच्चनिचपणा पाहुन भाऊरावांची समाजसेवेची ईच्छा बळावली. यासाठी शिक्षण हेच एकमेव प्रभावी साधन आहे हे त्यांनी ओळखले व आपले आयुष्य समाजास सुशिक्षित, ज्ञानी, सुसंस्कृत बनविण्यासाठी वेचले.

Karmveer

शैक्षणिक कार्यास प्रारंभ
भाऊरावांनी आपल्या वयाच्या ३२ व्या वर्षी शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला १९२९ साली ग्रामीण जनतेच्या, गरीब रयतेच्या कल्याणासाठी भाऊरायांनी सातारा येथे एक शिक्षण संस्था काढली. ती संस्था आज 'रयत शिक्षण संस्था या  नांवाने आजरामर झाली आहे.

"इवलेसे रोप लाविले व्दारी
तयाचा वेलू गेला गगनावरी"
  
  या पद्य पंक्तीप्रमाणे ह्या संस्थेचा विकास झाला आहे, होत आहे, होणार आहे. वयाच्या ३४व्या म्हणजेच १९२१ साली भाऊरावांच्या जीवनात एक क्रांतिक्षण आला. मुंबईला स्वदेशी चळवळीत भाऊरावांची म. गांधीशी भेट झाली. गांधीजीच्या व्यापक व्यक्तिमत्वाचा भाऊरावावर प्रभाव पडला. भाऊरावांनी विदेशी वस्त्रांचा त्याग केला व खादीची वस्त्रे वापरू लागले. टोपी व चप्पल वापरणेही सोडून दिले. अशा प्रकारे निः संगवृत्ती धारण केली.


ग्रामीण जनतेसाठी धडपड
   भाऊरावांची धडपड ग्रामीण गरीब जनतेसाठी होती. भारत हा खेड्यापाड्यांचा देश आहे. म्हणून प्रथम खेड्यात सुधारणा होणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. तांत्रिक, वैज्ञानिक, वैद्यकीय ज्ञान खेड्यापर्यन्त पोहोचले पाहिजे असे त्यांचे मत होते. गरीब जनतेस, सुलभतेचे शिक्षण मिळावे ही आजची राष्ट्रीय गरज आहे व खेडी आपल्या पायावर उभी राहिली म्हणजे राष्ट्र सामर्थ्यशाली बनेल हे भाऊरावांचे महत्वाचे विचार होते. महाग शिक्षणाबरोबरच गुणवत्तेवर निकालातील प्रवेशपध्दतीच्याही हे विरोधात होते. आपल्या गावापुरते एखादे कॉलेज, एक दोन शाळा काढणे हा मर्यादित दृष्टीकोन भाऊरावांचा नव्हता. त्यांनी शिक्षणप्रसाराची चळवळच हाती घेतली होती. प्रत्येक खेड्यात शाळा अशा शेकडो शाळा, बालकमंदिरे स्थापन करून प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षणाची भाऊरावांची विशाल दृष्टी होती. या सर्वांमागे श्रम व श्रधेबरोबरच भाऊरावांच्या साथीला जनतेचे सहकार्य होते.
७५ टक्के स्त्रियांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते आहे. या सर्व परिस्थितीत निपटण्यासाठी प्रचंड निर्धार व आर्थिक सहाय्याची गरज आहे. आज शिक्षण महाग बनत चालले आहे. पिळवणूक केली जात आहे आणि अभ्यासक्रम अवघड व सदोष बनत आहे. बाहे. खाजगी क्लासेस व गाईड बुकांना महत्व दिले जात आहे.  शिस्त व चारित्र्य संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. बुध्दिमत्ता आळसावत चालली आहे. शिक्षण हे स्पर्धात्मक बनत आहे.  वयाच्या वीस- पंचविस वर्षानंतरच्या अध्ययनानंतरही नोकरी वा रोजगारांची निश्चिती नसल्याने तरुण पिढीत उदासिनतेचे सावट पसरलेले आहे. या सर्व परिस्थितीवर मात केली पाहिजे व ते शक्य आहे. केवळ कर्मवीरांच्या ध्येयदृष्टीची व निर्धाराची कास धरावी.

गरजा ओळखल्या
  भाऊरावांनी समाजाचे दुःख जाणले. त्यांच्या गरजा ओळखल्या. अशा असाहाय्य समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. ह्या भावनेतून भाऊरावांनी जे शैक्षणिक कार्य केले ते प्रचंड आहे. चैतन्यमय आहे. यांच्या विशुद्ध भूमिकेने व दिशेने गेल्यास संपूर्ण देशात सामाजिक स्थित्यंतर घडून आल्यास नवल नाही. कर्मवीरांच्या बाबतीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की, कर्मविर भाऊरावांनी महाराष्ट्राच्या कड्या-कपाऱ्यांना लिहिता वाचता केलं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे तेराव्या शतकात महाराष्ट्रावर जेवढे उपकार आहेत तेवढेच या ज्ञानवंत कर्मवीर भाऊरायांचे विसाव्या शतकात महाराष्ट्रावर उपकार आहेत.
  अशा प्रकारे महाराष्ट्रातील दलित, गरीब समाजास जागृत करणारे कर्मवीर ९ मे १९५९ या दिवशी अनंतात विलीन झाले. परंतु हजारो ज्ञानदीप पेटवून गेला.
दीपक के. अहिरे,  
आनंदपूर (बागलाण)

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube

Linkedin :
https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


निरोगी जपानी लोक | Healthy Japanese People | दीर्घायुष्याचे रहस्य

निरोगी जपानी लोक: दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे रहस्य
Healthy Japanese People

nirogi japani lok

प्रस्तावना

    जगात सर्वाधिक दीर्घायुष्य आणि निरोगी जीवनशैली असलेल्या लोकांमध्ये जपानी लोकांचा अग्रक्रम लागतो. जपानमध्ये 90–100 वर्षांपर्यंत सक्रिय व आजारमुक्त जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. मग प्रश्न पडतो — जपानी लोक इतके निरोगी कसे राहतात? चला जाणून घेऊया त्यामागची कारणे.


जपानी लोकांच्या निरोगी जीवनशैलीची वैशिष्ट्ये

1️⃣ संतुलित आणि नैसर्गिक आहार

nirogi japani lok

जपानी आहार हा हलका, पौष्टिक आणि नैसर्गिक असतो.
त्यांच्या आहारात प्रामुख्याने:

  • भात (Rice)

  • मासे (Fish)

  • समुद्री शैवाळ (Seaweed)

  • भाज्या

  • मिसो सूप

  • टोफू व सोयाबीन पदार्थ

👉 तेलकट, प्रक्रिया केलेले (processed) अन्न फार कमी प्रमाणात घेतले जाते.


2️⃣ “Hara Hachi Bu” – पोट 80% भरल्यावर थांबा

जपानी लोकांचा एक सुवर्णनियम आहे —
“Hara Hachi Bu” म्हणजे पोट पूर्ण न भरता 80% झाल्यावर खाणे थांबवणे.

यामुळे:

  • लठ्ठपणा टाळला जातो

  • पचन सुधारते

  • मधुमेह व हृदयरोगाचा धोका कमी होतो


3️⃣ नियमित चाल

nirogi japni lok


जपानी लोक:

  • लहान अंतरासाठीही चालतात

  • सायकलचा वापर करतात

  • वृद्ध वयातही सक्रिय राहतात

👉 व्यायाम म्हणजे फक्त जिम नव्हे, दररोजची हालचाल हेच त्यांचे रहस्य आहे.


4️⃣ ताणतणावमुक्त जीवन (Low Stress Life)

जपानी संस्कृतीत:

  • ध्यान (Meditation)

  • निसर्गाशी जवळीक

  • काम व वैयक्तिक आयुष्यात समतोल

यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. ताण कमी = आजार कमी हे जपानी लोक उत्तमरीत्या पाळतात.


5️⃣ सामाजिक संबंध आणि उद्देशपूर्ण जीवन

nirogi japni lok

जपानी लोकांमध्ये Ikigai ही संकल्पना प्रसिद्ध आहे.
👉 Ikigai म्हणजे जगण्याचा उद्देश.

  • कुटुंबाशी घट्ट नाते

  • समाजात सक्रिय सहभाग

  • आयुष्याला अर्थ देणारे काम

यामुळे मानसिक समाधान व दीर्घायुष्य मिळते.


6️⃣ स्वच्छता आणि शिस्त

जपानमध्ये:

  • वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता

  • वेळेचे काटेकोर पालन

  • शिस्तबद्ध जीवनशैली

👉 स्वच्छता आणि शिस्त यांचा आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो.


7️⃣ ओकिनावा – दीर्घायुष्याचे बेट

जपानमधील Okinawa भागाला “Longevity Island” म्हटले जाते.
येथील लोक:

  • कमी कॅलरी पण पौष्टिक आहार

  • सक्रिय जीवनशैली

  • सकारात्मक विचार

यामुळे येथे शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक मोठ्या संख्येने आढळतात.


आपण जपानी लोकांकडून काय शिकू शकतो?

✔ संतुलित आहार घ्या
✔ जास्त खाणे टाळा
✔ रोज चालण्याची सवय लावा
✔ ताण कमी ठेवा
✔ आयुष्याला उद्देश द्या
✔ निसर्गाशी जोडलेले राहा


निष्कर्ष

निरोगी जपानी लोक हे केवळ जनुकीय कारणांमुळे नाहीत, तर त्यांच्या साध्या, शिस्तबद्ध आणि संतुलित जीवनशैलीमुळे ते आजारमुक्त व दीर्घायुष्य जगतात. आपणही त्यांच्या सवयी आत्मसात केल्यास आरोग्यपूर्ण जीवन नक्कीच जगू शकतो.


निरोगी जपानी लोक
Healthy Japanese People

nirogi japani lok

जपानी लोक जगतात
निरोगी जीवनशैली,
न चुकता व्यायाम
सवय प्रत्येक घरातली...


जपानचा निसर्ग
विलोभनीय खूप सुंदर,
सात्विक घरच्या भोजनावर
त्यांचा नेहमी असतो भर...


जपानी लोकांना
कशाची नसते हाव,
गरजेपुरती वस्तू नी वापर
म्हणून मिळतो वाव...


वेळ मिळाला की हे लोक
निसर्गाच्या सान्निध्यात जातात,
फोन, टेक्नॉलॉजीपासून दूर
ताजेतवाने, रिफ्रेश होतात...


जपानमध्ये "इकिगाई"
संकल्पनेला महत्व फार,
शोधतात जीवनाचा उद्देश
पूर्तता करतात अपरंपार...


इकिगाई जीवनात
देते अर्थ आणि दिशा,
जीवनात नेमका उद्देश
झटकतो कंटाळा नी निराशा...


सातत्याने शिक्षण
नी सुधारणा करणे,
नवीन शिकण्याची जिद्द
हा दृष्टिकोन अवलंबणे...


योग्य प्रमाणात आहार
जपानी हे तत्त्व पाळतात,
पचनक्रियेवर येत नाही ताण
शरीराला निरोगी ठेवतात...


जपानी तत्त्वज्ञान "काइझेन"
म्हणजे सतत सुधारणा,
मन स्थिरपणे कार्यरत
शरीर सुदृढतेचा बाणा...


"सेपुकु" हे जपानी
आत्मानुशासन, 
शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी
हे महत्वाचे कारण...

nirogi japani lok

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

पितृपक्ष (PitruPaksha)

 पितृपक्ष
   PitruPaksha


Pitrupaksha


आजपासून पितृपक्षाची

होत आहे सुरूवात, 

पूर्वजांप्रति आपले

कर्तव्य श्राद्धाची रुजवात...


पूर्वज आणि पितरांची 

काढा श्रद्धापूर्वक आठवण,

पिंडदान करून करा

अपत्य धर्माचे पालन...


श्राद्धावेळी द्यावे

पाच जणांना भोजन,

गाय, श्वान, कावळा, पाहुणा 

आणि मुंगीसाठी अन्नदान... 


श्राद्ध पितरांना तात्काळ 

सूर्य व वायूच्या रूपाने मिळतो,

पृथ्वीलोक व पितृलोकाचा थेट संपर्क

पितृगण अन्नदानाने संतुष्ट होतो...


© दीपक केदू अहिरे, नाशिक 

Pitrupaksha



करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...