name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): शिक्षण महर्षी- कर्मवीर भाऊराव पाटील (Shikshan Maharshi- Karmaveer Bhaurao Patil)

शिक्षण महर्षी- कर्मवीर भाऊराव पाटील (Shikshan Maharshi- Karmaveer Bhaurao Patil)


शिक्षण महर्षी- कर्मवीर भाऊराव पाटील
Shikshan Maharshi- Karmaveer Bhaurao Patil

Karmveer

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कै. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती दि. २२ सप्टेम्बर रोजी सर्वत्र साजरी करण्यात येईल त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा हा लेख. (पूर्व प्रसिध्दी: २२ सप्टेंबर १९९०, दैनिक रामभुमी )

      

 कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्हयातील कुंभोज गावी सप्टेम्बर १८८७ मध्ये झाला. कर्मवीर भाऊरावांच्या जीवनाचा आलेख मोठा मनोहारी व स्फूर्तीदायी आहे. खेडयातील रम्य परिसराचा व सत्प्रवण माता पित्यांच्या शिकवणुकीचा भाऊरावांच्या मनावर मोठा परिणाम झाला. सत्यनिष्ठा, समदृष्टी, सेवाभाव, ममत्व हे गुण त्या त्यांच्यात आढळून येत. त्यांच्या स्वतःच्या कार्यामागे स्पष्ट, वस्तुनिष्ठ विचारांची बैठक होती. आपल्या कार्याविषयी श्रद्धा होती. हे सर्व गुण बालपणीच त्यांच्या मनःपटलावर कायमचे ठसलेले होते.

  

 शंभर वर्षांपूर्वीही जनमानसात इंग्रजी शिक्षणावर विश्वास होता. त्यानुसार भाऊरावांना कोल्हापुरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी धाडण्यात आले. इंग्रजी सहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे शिक्षण थांबले. कोल्हापुरात शिकत असतांना भाऊरावांची राहण्याची व्यवस्था जैन वसतिगृहात होती. तेथील कर्मठ शिस्त त्यांना सहन होत नसे. अशातच एकदा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी घडलेल्या मिस क्लार्क होस्टेलच्या उद्घाटनप्रसंगी भाऊरावांनी काम केले. त्याबद्दल भाऊरावांना आंघोळ करून येण्यास सांगितले. आपल्यासारख्याच माणसाला स्पर्श केल्याने आपण अमंगल होतो हे भाऊरायांना पटत नव्हते. त्याचा एकूण परिणाम असा झाला की भाऊरायांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. पण त्याचा भाऊरावांना फायदाच झाला. ते छत्रपती शाहू महाराजाच्या सानिध्यात आले. त्यांच्यामुळे भाऊरावांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. समाजातील विषमता, दारिद्रय, अज्ञान, उच्चनिचपणा पाहुन भाऊरावांची समाजसेवेची ईच्छा बळावली. यासाठी शिक्षण हेच एकमेव प्रभावी साधन आहे हे त्यांनी ओळखले व आपले आयुष्य समाजास सुशिक्षित, ज्ञानी, सुसंस्कृत बनविण्यासाठी वेचले.

Karmveer

शैक्षणिक कार्यास प्रारंभ
भाऊरावांनी आपल्या वयाच्या ३२ व्या वर्षी शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला १९२९ साली ग्रामीण जनतेच्या, गरीब रयतेच्या कल्याणासाठी भाऊरायांनी सातारा येथे एक शिक्षण संस्था काढली. ती संस्था आज 'रयत शिक्षण संस्था या  नांवाने आजरामर झाली आहे.

"इवलेसे रोप लाविले व्दारी
तयाचा वेलू गेला गगनावरी"
  
  या पद्य पंक्तीप्रमाणे ह्या संस्थेचा विकास झाला आहे, होत आहे, होणार आहे. वयाच्या ३४व्या म्हणजेच १९२१ साली भाऊरावांच्या जीवनात एक क्रांतिक्षण आला. मुंबईला स्वदेशी चळवळीत भाऊरावांची म. गांधीशी भेट झाली. गांधीजीच्या व्यापक व्यक्तिमत्वाचा भाऊरावावर प्रभाव पडला. भाऊरावांनी विदेशी वस्त्रांचा त्याग केला व खादीची वस्त्रे वापरू लागले. टोपी व चप्पल वापरणेही सोडून दिले. अशा प्रकारे निः संगवृत्ती धारण केली.


ग्रामीण जनतेसाठी धडपड
   भाऊरावांची धडपड ग्रामीण गरीब जनतेसाठी होती. भारत हा खेड्यापाड्यांचा देश आहे. म्हणून प्रथम खेड्यात सुधारणा होणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. तांत्रिक, वैज्ञानिक, वैद्यकीय ज्ञान खेड्यापर्यन्त पोहोचले पाहिजे असे त्यांचे मत होते. गरीब जनतेस, सुलभतेचे शिक्षण मिळावे ही आजची राष्ट्रीय गरज आहे व खेडी आपल्या पायावर उभी राहिली म्हणजे राष्ट्र सामर्थ्यशाली बनेल हे भाऊरावांचे महत्वाचे विचार होते. महाग शिक्षणाबरोबरच गुणवत्तेवर निकालातील प्रवेशपध्दतीच्याही हे विरोधात होते. आपल्या गावापुरते एखादे कॉलेज, एक दोन शाळा काढणे हा मर्यादित दृष्टीकोन भाऊरावांचा नव्हता. त्यांनी शिक्षणप्रसाराची चळवळच हाती घेतली होती. प्रत्येक खेड्यात शाळा अशा शेकडो शाळा, बालकमंदिरे स्थापन करून प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षणाची भाऊरावांची विशाल दृष्टी होती. या सर्वांमागे श्रम व श्रधेबरोबरच भाऊरावांच्या साथीला जनतेचे सहकार्य होते.
७५ टक्के स्त्रियांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते आहे. या सर्व परिस्थितीत निपटण्यासाठी प्रचंड निर्धार व आर्थिक सहाय्याची गरज आहे. आज शिक्षण महाग बनत चालले आहे. पिळवणूक केली जात आहे आणि अभ्यासक्रम अवघड व सदोष बनत आहे. बाहे. खाजगी क्लासेस व गाईड बुकांना महत्व दिले जात आहे.  शिस्त व चारित्र्य संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. बुध्दिमत्ता आळसावत चालली आहे. शिक्षण हे स्पर्धात्मक बनत आहे.  वयाच्या वीस- पंचविस वर्षानंतरच्या अध्ययनानंतरही नोकरी वा रोजगारांची निश्चिती नसल्याने तरुण पिढीत उदासिनतेचे सावट पसरलेले आहे. या सर्व परिस्थितीवर मात केली पाहिजे व ते शक्य आहे. केवळ कर्मवीरांच्या ध्येयदृष्टीची व निर्धाराची कास धरावी.

गरजा ओळखल्या
  भाऊरावांनी समाजाचे दुःख जाणले. त्यांच्या गरजा ओळखल्या. अशा असाहाय्य समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. ह्या भावनेतून भाऊरावांनी जे शैक्षणिक कार्य केले ते प्रचंड आहे. चैतन्यमय आहे. यांच्या विशुद्ध भूमिकेने व दिशेने गेल्यास संपूर्ण देशात सामाजिक स्थित्यंतर घडून आल्यास नवल नाही. कर्मवीरांच्या बाबतीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की, कर्मविर भाऊरावांनी महाराष्ट्राच्या कड्या-कपाऱ्यांना लिहिता वाचता केलं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे तेराव्या शतकात महाराष्ट्रावर जेवढे उपकार आहेत तेवढेच या ज्ञानवंत कर्मवीर भाऊरायांचे विसाव्या शतकात महाराष्ट्रावर उपकार आहेत.
  अशा प्रकारे महाराष्ट्रातील दलित, गरीब समाजास जागृत करणारे कर्मवीर ९ मे १९५९ या दिवशी अनंतात विलीन झाले. परंतु हजारो ज्ञानदीप पेटवून गेला.
दीपक के. अहिरे,  
आनंदपूर (बागलाण)

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

Telegram :

Facebook :

Instagram :

YouTube

Linkedin :
https://www.linkedin.com/in/deepak-ahire-2550a8248?utm_source=share&utm_campaign=share_via&utm_content=profile&utm_medium=android_app

Koo :
कू ऐप पर@दीपक1N673के दिलचस्प विचार सुनें https://www.kooapp.com/profile/दीपक1N673

Share chat :

Twitter :
@DeepakA86854129

Website :


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...