शिक्षण महर्षी- कर्मवीर भाऊराव पाटीलShikshan Maharshi- Karmaveer Bhaurao Patil
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कै. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती दि. २२ सप्टेम्बर रोजी सर्वत्र साजरी करण्यात येईल त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा हा लेख. (पूर्व प्रसिध्दी: २२ सप्टेंबर १९९०, दैनिक रामभुमी )
कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्हयातील कुंभोज गावी सप्टेम्बर १८८७ मध्ये झाला. कर्मवीर भाऊरावांच्या जीवनाचा आलेख मोठा मनोहारी व स्फूर्तीदायी आहे. खेडयातील रम्य परिसराचा व सत्प्रवण माता पित्यांच्या शिकवणुकीचा भाऊरावांच्या मनावर मोठा परिणाम झाला. सत्यनिष्ठा, समदृष्टी, सेवाभाव, ममत्व हे गुण त्या त्यांच्यात आढळून येत. त्यांच्या स्वतःच्या कार्यामागे स्पष्ट, वस्तुनिष्ठ विचारांची बैठक होती. आपल्या कार्याविषयी श्रद्धा होती. हे सर्व गुण बालपणीच त्यांच्या मनःपटलावर कायमचे ठसलेले होते.
शंभर वर्षांपूर्वीही जनमानसात इंग्रजी शिक्षणावर विश्वास होता. त्यानुसार भाऊरावांना कोल्हापुरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी धाडण्यात आले. इंग्रजी सहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे शिक्षण थांबले. कोल्हापुरात शिकत असतांना भाऊरावांची राहण्याची व्यवस्था जैन वसतिगृहात होती. तेथील कर्मठ शिस्त त्यांना सहन होत नसे. अशातच एकदा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी घडलेल्या मिस क्लार्क होस्टेलच्या उद्घाटनप्रसंगी भाऊरावांनी काम केले. त्याबद्दल भाऊरावांना आंघोळ करून येण्यास सांगितले. आपल्यासारख्याच माणसाला स्पर्श केल्याने आपण अमंगल होतो हे भाऊरायांना पटत नव्हते. त्याचा एकूण परिणाम असा झाला की भाऊरायांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. पण त्याचा भाऊरावांना फायदाच झाला. ते छत्रपती शाहू महाराजाच्या सानिध्यात आले. त्यांच्यामुळे भाऊरावांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. समाजातील विषमता, दारिद्रय, अज्ञान, उच्चनिचपणा पाहुन भाऊरावांची समाजसेवेची ईच्छा बळावली. यासाठी शिक्षण हेच एकमेव प्रभावी साधन आहे हे त्यांनी ओळखले व आपले आयुष्य समाजास सुशिक्षित, ज्ञानी, सुसंस्कृत बनविण्यासाठी वेचले.
deepakahire1973@gmail.com













