बैलपोळा
Bull Pola Festival
बैल आहे सखा सोबती
शेतकरी बंधूच्या जिवाभावाचा,
बैलांप्रती आपली कृतज्ञता
सण आहे हा बैलपोळ्याचा...
शेतीच्या कामासाठी आली यंत्र
बैलाच्या मेहनतीला नाही तोड,
पोळ्याच्या दिवशी सजवतात बैलांना
नैवेद्य पुरणपोळीचा गोड-धोड...
ज्यांच्याकडे बैल नाही असे शेतकरी
बैलाच्या पुतळ्याची पूजा करतात,
गावखेड्यात निघतात बैलांच्या मिरवणुका
संपूर्ण गावात नाचत बैल फिरवतात...
सण माझ्या सर्जा- राजाचा
ऋण त्याचं माझ्या भाळी,
तुझ्या घामानं फुलणाऱ्या शेतीला
सदा पिकू दे सर्व काळी...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
No comments:
Post a Comment