name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद, निबंध, चित्रकला स्पर्धा ( Seminar, Essay, Painting Competition on World Tourism Day)

जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद, निबंध, चित्रकला स्पर्धा ( Seminar, Essay, Painting Competition on World Tourism Day)

जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद, निबंध, चित्रकला स्पर्धा
Seminar, Essay, Painting Competition on World Tourism Day

World Tourism day

     महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय, नाशिक विभागामार्फत २७ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या परिसंवाद, निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदिश चव्हाण यांनी केले आहे.

   दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रादेशिक कार्यालय, नाशिक मार्फत २७ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक पर्यटन दिन २०२४ साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी युनाटेड नेशन टुरिझम यांचे सन २०२४ करिता जागतिक पर्यटन दिनासाठी "पर्यटन आणि शांतता" हे  घोषित केले आहे. 

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवास, उपहारगृहे, बोटक्लब येथे २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पर्यटनदिनाचे औचित्य साधत पर्यटनाशी निगडित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 जागतिक पर्यटन दिनानिमित्त राबविले जाणारे विविध उपक्रम प्रादेशिक कार्यालय नाशिक मार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात अति महत्वाच्या माननीय व्यक्ती, नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ञ, पर्यटन व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स, सहल आयोजक, टूर्स असोसिएटस, हॉटेलियर्स, पर्यटन व हॉटेल व्यावसायिक, पर्यटन उद्योजक, विद्यार्थी, निवास व न्याहारी इ. यांना निमंत्रित करण्यात येणार असून या परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  पर्यटन दिनानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  यात सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आर्वजुन सहभाग घ्यावा. ही स्पर्धा महाविद्यालयांनी आपआपल्या महाविद्यालयात घ्यावयाची असून स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आलेले चित्रकला व निबंध महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन भवन, गडकरी चौक, प्रादेशिक कार्यालय, नाशिक कार्यालयाकडे २० सटेंबर २०२४ पर्यंत जमा करावेत.  दोन्ही स्पर्धेतून पात्र विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषीक बक्षीस व  प्रमाणपत्र वितरण सोहळा २७ सप्टेंबर २०२४ रोजी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येतील.

निबंध स्पर्धेचे विषय : पर्यटन शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता, महाराष्ट्राची पर्यटन स्थळे त्यांचा शांतता संदेश, माइया स्वप्नातले पर्यटन, भारत व पर्यटन शांततेचे दूत आणि प्रतिक असे विषय असतील. 

विजेत्यांना प्रथम पारितोषिक : नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यक्तींना २ रात्र ३ दिवस राहण्याची व्यवस्था, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल.  द्वितीय पारितोषिक नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यक्तींना १ रात्र २दिवस राहण्याची व्यवस्था, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. तर तृतीय पारितोषिक जवळच्या पर्यटन निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था, दुपारचे जेवण, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल.


चित्रकला स्पर्धेचे विषय :  जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधुन आपण पर्यटन आणि शांतता या घोषवाक्याशी अधीन राहून चित्रकलेचे विषय असतील.  विजेत्यांना प्रथम पारितोषिक नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यतींना २ रात्र ३ दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. द्वितीय पारितोषिक नाशिक विभागातील पर्यटन निवासात २ व्यतींना २ दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. तर तृतीय पारितोषिक जवळच्या पर्यटन निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था, दुपारचे जेवण, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल.


निबंध व चित्रकला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे निबंध व चित्र २० सटेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन भवन, गडकरी चौक, प्रादेशिक कार्यालय,नाशिक-४२२००२ 

दूरध्वनी क्रमांक : ०२५३-२९७००४९ येथे जमा करावीत. अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. तरी परिसंवाद, निबंध व चित्रकला स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा तसेच सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमार्फत काढण्यात आलेली चित्र व निबंध कार्यालयाकडे सादर करावीत असे आवाहन नाशिक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. चव्हाण यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...