name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): February 2024

मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी माझे विचार (My thoughts for the prosperity of Marathi language)

मराठी ज्ञानभाषा समृद्धी साठी माझे विचार
My thoughts for the prosperity of Marathi language

Marathi bhasha samrudhisathi maze vichar

मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी मोठमोठ्या समुदायाला व्यापक प्रमाणात  मराठी  भाषा  वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी अंगीकारावी वाटत नाही. तोपर्यंत ती ज्ञानभाषा होऊ शकत नाही. 

अभिजात भाषेचा दर्जा

   जगात दहा कोटीहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या वीस भाषांमध्ये मराठी बोलली जाते. तरीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नव्हता. आता तो मिळाला आहे. 

मराठीचा जास्तीत जास्त वापर

  एखाद्या भाषेत करियर करायचं झाल तर इंग्रजी भाषेत होऊ शकत तसं ते मराठी भाषेत होत नाही. म्हणून मराठी ज्ञानभाषा समृद्ध मराठीचा जास्तीत जास्त वापर जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात होणे गरजेचे वाटते. 

भाषेची आवश्यकता

 राज्यातल्या मोठमोठ्या शहरात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये रोजगारासाठी येणाऱ्या अनेक परप्रांतीयांना मराठी येत नाही. तरीही व्यवसाय करतात. कारण मराठी भाषा न शिकताही त्यांचे चालते. भाषेची अनिवार्यता आडवी येत नाही परंतु तामिळनाडू, बंगाल, कोलकत्ता या शहरात ही परिस्थिती नाही. तिथे तुम्हाला तामिळ भाषा न येता तुम्ही चेन्नईत राहूच शकत नाही. एवढी भाषेची आवश्यकता आपल्याकडे झाली पाहिजे तरच मराठी भाषा समृद्ध होईल.    

पाठ्यपुस्तके दर्जेदार व्हावी

 आज मराठी शाळेमधलं आकर्षण संपलं आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेत मराठीच स्थान शोधावं लागतं. मराठी शाळांचा दर्जा घसरला आहे. मराठी  ज्ञानभाषा समृद्धीसाठी,  मराठी भाषा टिकवण्यासाठी या शाळांचा दर्जा उंचावला पाहिजे असे माझे मत आहे. मराठी भाषेची पाठ्यपुस्तके दर्जेदार झाली पाहिजेत. 

वाचन संस्कृतीवर आघात

 पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक चुका, दोष आढळतात. त्यामुळे भाषेची वाट लागते. त्यामुळे मराठी भाषेच्या जाणकारांकडून पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रिया निरपेक्ष व्हावी. राजकीय लोकांचा हस्तक्षेप टाळावा. टी.व्ही. व मोबाईलमुळे वाचन संस्कृतीवर आघात झाला आहे. पूर्वी मराठी वाचनाची गोडी लागायची. दैनिके, साप्ताहिके, मासिके पूर्वी आवडीने वाचली जात. परंतु आज वाचन संस्कृती कमी झाली आहे. 

दर्जेदार साहित्यनिर्मिती

 मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी मराठी भाषेचे वाचन होणे गरजेचे आहे. मराठी भाषेत दर्जेदार साहित्यनिर्मिती झाली पाहिजे. मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी एकच एक मराठी भाषा संपूर्ण राज्याला जोडून ठेवू शकलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. दर दहा किलोमीटरवर  भाषा बदलते. स्थानिक बोलीभाषेतले अनेक शब्द शोधून ते प्रमाण मराठीतले आहे यासाठी प्रयत्न अभ्यासक, संशोधकांनी करणे गरजेचे वाटते. 

आधुनिक मराठी शब्दकोश व्हावा

 आज इंटरनेटवर म्हणजे आंतरजालावर शब्दशोध करायला गेले तर फारसे पर्याय नाहीत. त्यामुळे आंतरजालावर मराठी लेखन मोठ्या प्रमाणात व्हावे. आधुनिक मराठी शब्दकोश तयार केला पाहिजे. तरच आपण मराठी ज्ञानभाषा समृद्ध करू शकू. इंग्रजीतील प्रत्येक शब्दाला मराठी शब्द आहेत. तो वापरणे म्हणजे मराठी भाषेचे सौंदर्य टिकवण्यासारखे आहे. मराठी समजणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेचा वापर केला पाहिजे.

Marathi bhasha samrudhisathi maze vichar

 २७ फेब्रुवारी : मराठी भाषा दिन

 महाराष्ट्रातील प्रतिभावंत ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो. त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. मायभाषा ही ज्ञानभाषा  होण्यासाठी प्रयत्न केले आहे. 

मराठी भाषेची समृद्धी

 संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातल्या ओवीतून  बंधू  निवृत्तीनाथ यांना मातेच्या रुपात पाहून मराठी भाषेची समृद्धी व विपुलता व्यक्त केली आहे. अनेक संतवचनातून व वाणीतून मराठी भाषा समृद्ध झाली आहे. सातशे वर्ष परंपरा लाभलेल्या वारकरी सांप्रदायाने मराठी भाषेचा विकास केला. अनेक संतानी आपपल्या बोलीभाषेप्रमाणे तिला अभंगवाणीतून प्रकट केले. त्याचा अभ्यास प्रत्येक मराठी भाषिकांनी केला पाहिजे. तरच  मराठी  भाषा अधिकाधिक समृद्ध होईल. बोली भाषेतील गोडवा, भावुकता, रांगडेपणा, आदरतिथ्य दिसून येते. 

 कवी गझलकार सुरेश भट यांच्या गझलेत मराठीच्या सामर्थ्याचे दर्शन  घडते.

 पाहुणे जरी असंख्य पोसते  मराठी 
आपुल्या घरात हाल सोसते मराठी 
हे असते कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

व्यवहारामध्ये मराठी  भाषा व माणूस यांना प्राधान्य  

  मराठी ज्ञानभाषा समृद्धीसाठी समोरची व्यक्ती ओळखीची असो कि अनोळखी, बोलण्याची सुरुवात मराठीतून करावी. अमराठी प्रश्न आला तरी उत्तर मराठीत द्यावे. मराठीत सेवा मागाव्या. नसतील तर त्याबद्दल तक्रार करावी. व्यापार आणि व्यवहारामध्ये मराठी  भाषा  आणि मराठी माणूस यांनाच प्राधान्य द्यावे. तरुणांनी काय आणि वयस्कर माणसांनी काय, ज्यांना मराठी भाषा ही आपली भाषा वाटते त्यांनी ती स्वतः व्यवहारात आणावी आणि आपसात बोलायला सुरुवात करावी असे मला वाटते. 

 मराठीच्या संवर्धनासाठी   चतु:सुत्री 

 मराठी बोला! मराठी लिहा! मराठी वाचा! मराठीत व्यवहार करा! ही चतु:सुत्री मराठीच्या संवर्धनासाठी, समृद्धीसाठी वापरणे गरजेचे आहे.
    मराठी जागवायची असेल तर तिला ज्ञानभाषा बनवणे. तिच्यापासून पैसा मिळेल याची सोय करणे. मित्र मैत्रिणींचा वाढदिवस असेल तर मराठीतून शुभेच्छा देणे, सोशल मीडियातून मराठीतून संवाद साधावा. 

मराठीला प्राधान्य

 मराठी साहित्य वाचावे. मराठी चित्रपटाला, नाटकाला प्राधान्य द्यावे. याचा अर्थ इंग्रजी आणि हिंदी भाषांवर बहिष्कार टाकावा. ती भाषा बोलूच नये असा होत नाही. या भाषा नोकरी, व्यापार यासाठी जरूर शिकाव्यात. त्यांचा अभ्यास करावा पण मराठीला प्राधान्य द्यावे. अशा पद्धतीने  मराठी  भाषा समृद्धीसाठी प्रत्येकाने पेटून उठले पाहिजे. 

माझा खारीचा वाटा आणि निरंतर प्रयत्न 

 मराठीचा सार्वत्रिक वापर करून, मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करून संशोधन, साहित्यनिर्मितीसाठी प्रयत्नशील राहावे. मी स्वत: मराठी भाषेतील आशयपूर्ण दीड हजार कविता, ५ शेतीची पुस्तके, ५० मराठी उद्योजकांच्या मुलाखती तसेच लेख, बातम्या, साहित्य आदि लिखाण केले आहे. मराठी राजभाषा व्हावी म्हणून कवितेद्वारे पत्रप्रपंच केला आहे.  मराठी  भाषा समृद्धीसाठी माझा हा खारीचा वाटा आहे. आणि हाच निरंतर प्रयत्न करत राहणार यात शंका नाही.

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


नाशिकमध्ये अकरावे शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन (Eleventh Farmers Literary Conference organized in Nashik)

 नाशिकमध्ये अकरावे शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन (Eleventh Farmers Literary Conference organized in Nashik)

नाशिक : शेतकऱ्यांच्या व्यथा, शेती क्षेत्रातील स्थित्यंतरे व शेतीसंबंधी समग्र साहित्य जाणिवा मांडणाऱ्या नवसाहित्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन येत्या ४ व ५ मार्चला नाशिकमध्ये होणार आहे. 
संमेलन स्थळ: सह्याद्री फार्म्स 

       मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्ममध्ये युगात्मा शरद जोशी विद्यानगरी येथे होणाऱ्या अकराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे असतील, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उ‌द्घाटन होईल. 

    शेतकरी संघटनेतर्फे नाशिकमध्ये होणारे हे पहिले शेतकरी संमेलन आहे. याविषयी सह्याद्री  फार्म्सचे अध्यक्ष तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष विलास शिंदे, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी  पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

       आयोजन समितीच्या डॉ. मनीषा रिठे, प्रमोद राजेभोसले, ज्ञानेश उगले, शंकरराव ढिकले, सोपान संधान, निवृत्ती कर्डक, निर्मला जगझाप उपस्थित होते. संमेलनाला वन्हाडी कादंबरीकार तथा म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अॅड. वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील प्रमुख पाहुणे असतील. 

   साहित्य क्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत आहे. या प्रयत्नांचा एक भाग शेतकरी साहित्य संमेलन भरवले जाते. शेतकरी साहित्य चळवळीच्या प्रयत्नांना यश येऊन साहित्यिकांची नवीन पिढी अभ्यासपूर्ण, वास्तवचित्र, आक्रमक आणि सडेतोडपणे रेखाटायला लागली आहे, असे मत गंगाधर मुटे यांनी व्यक्त केले. 

    संमेलनात उदघाटन सत्र, शेतकरी कविसंमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविधांगी सत्र असणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इ.अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत.तरी सर्व शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

संमेलनाची  रूपरेषा 

४ मार्च रोजी  सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत उदघाटन सत्र. दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत 'शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोन या विषयावर ज्ञानदेव राऊत, विकास पांढरे, मधुसूदन हरणे, डॉ. सुरेश मोहितकर यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर शेतकरी कविसंमेलन होईल. सायंकाळी पाचला 'अॅग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण यांची प्रकट मुलाखत होणार आहे. सायंकाळी सात ते रात्री नऊपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

५ मार्च रोजी शेतकरी कविसंमेलनाने  प्रारंभ होईल, तर सकाळी साडेदहाला स्वानंद बेदरकर हे विलास शिंदे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत, त्यानंतर 'भारताकडून इंडियाकडे' याविषयावर चर्चासत्र, शेतकरी गझल मुशायरा व लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

स्वागताध्यक्ष विलास शिंदे

     यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सांगितले कि, "शेती व शेतकन्यांच्या समस्या वेगवेगळ्या व्यासपीठावरून मांडल्या  जातात. पण या साहित्य संमेलनातून शेतकऱ्यांना मार्ग दाखवण्यात येणार आहे. शेतकरी प्रचंड मेहनत घेतात. त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी है संमेलन उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं व्यवस्थापन तंत्र (Management techniques given by Chhatrapati Shivaji Maharaj)

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं व्यवस्थापन तंत्र 
(Management techniques given by Chhatrapati Shivaji Maharaj)   

आज साडेतीनशे वर्ष झाली. कित्येक राजे होऊन गेले परंतु आपल्या सर्वांच्या स्मरणात फक्त एकच राजा राहिला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...!

Chatrapati Shivaji Maharaj yanche vyavasthapan tantra

छत्रपती शिवाजी महाराज : मुरब्बी नेते

६ जून १६७४ रोजी बत्तीस मुळांच्या सोन्याच्या सिंहासनावर रूढ होऊन रायगडावर राज्याभिषेक होऊन आपले राजे छत्रपती राजे झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे मुरब्बी नेते होते. त्यांनी राजकारणात वापरलेल्या व्यवस्थापन तंत्राची अनेकांना माहिती नाही. अठराव्या शतकातही छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंटचे गुरू होते हे लक्षात येते. 

छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंटचे गुरू

     व्यवस्थापन तंत्रात नेतृत्व कसे असावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. स्वराज्याच्या सुरुवातीला अफजलखान महाराष्ट्रावर साठ हजार सैन्यासह चालून आला होता यावेळी स्वराज्याचा नाश होईल असे अनेकांना वाटत होते. अफजलखानाबरोबर तह करावा असे सल्ले दिले जात होते. पण  राजांनी या संकटावर असामान्य बुद्धीचातुर्य व अतुलनीय पराक्रमाने मात केली. नेतृत्व कसे करावे याचे उदाहरण आपल्यापुढे ठेवले. 

विजयोत्सव साजरा केला नाही

   छत्रपती शिवराय यांनी अफझलखानाला भेटण्याची वेळ १२ वाजून ३५ मिनिटांची ठरवली होती. कारण १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य डोक्यावर असतो. अफजलखान शिवरायांपेक्षा उंचीने खूप मोठे होते. त्यामुळे अफजलखान जेव्हा शिवरायांकडे बघेल तेव्हा त्यांच्या डोळ्यात सूर्याची किरणे जातील आणि त्याच वेळेचा फायदा घेऊन शिवाजी महाराज त्याच्यावर हल्ला करतील इतकी मोठी मॅनेजमेंट महाराजांनी त्यावेळी केली होती. त्यानंतर राजांनी विजयोत्सव साजरा केला नाही. आणि कोणतीही विश्रांती न घेता अवघ्या १८ दिवसात राजांनी थेट पन्हाळापर्यंतचा प्रदेश जिंकला. 

पारदर्शक कारभार

      छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल राजे आणि प्रशासक होते. त्यांनी त्यांच्या काळात सर्वप्रथम अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. प्रत्येक मंडळाची जबाबदारी त्या त्या प्रशासनावर सोपवली. या अष्टप्रधान मंडळामुळेच राजे पारदर्शक कारभार करू शकले. तसेच त्यांनी त्यावेळी परराष्ट्र व्यवहार आणि गुप्तहेर खातेही मंत्रीमंडळात सुरू केले होते. 

नेतृत्व सिद्ध केले

  पुण्याला वेढा घालून बसलेल्या शाहीस्तेखानाला अतिशय नियोजनबद्धरीतीने महाराजांनी पराभूत केले. अवघे ४०० माणसांनिशी, कमी वेळात, कमीत कमी नुकसानीत, लाखाहून अधिक फौजबंद शाहिस्तेखान व मुघल फौजेचा पराभव केला. अशा पद्धतीने नेतृत्व करणाऱ्याने स्वतः करून दाखवले तरच त्याचे नेतृत्व स्वीकारले जाते. त्यानंतरच आपल्या अनुयायांकडून  अपेक्षा करता येते. 

योजनेचे यश

कोणत्याही योजनेचे यश हे त्याचे नियोजन, सूक्ष्म व तपशीलवार माहिती यावर अवलंबून असते. सुरतेवरील हल्ल्याचे नियोजन करताना शिवाजीराजांनी दोन उद्दिष्टे समोर ठेवली होती. एक म्हणजे जास्तीत जास्त लुट कमीत कमी वेळात करणे आणि दुसरे म्हणजे ती लूट सुरक्षितपणे स्वराज्यात आणणे हा होता. 

 वय व अनुभवाशी नसतो संबंध

शिवाजी महाराजांनी कधीच कमतरतेवर लक्ष दिले नाही तर सुरुवात करण्यावर भर दिला. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बाल शिवबांसोबत फक्त ८ ते १० मावळे होते. त्यांनी लहान वयात दृढनिश्चय केला होता आणि सुरुवात केली. कार्यक्षम मावळे तयार करून पुढील वाटचाल केली. महाराजांनी  तोरणागड वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते. यावरून यशाचा वय व अनुभवाशी काहीही संबंध नसतो हे अधोरेखीत झाले आहे. 

स्वराज्याची ज्योत प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित

     शिवाजी महाराजांविरुद्ध कधीही बंड झाले नाही. त्यांचे व्यवस्थापन असे होते की स्वराज्याची ज्योत प्रत्येकाच्या मनात अशा प्रकारे प्रज्वलीत केली होती की ते आग्र्याच्या नजरकैदेत असतानासुद्धा स्वराज्यातील एकही सरदार फितूर झाला नाही. पाच पन्नास मावळेविरुद्ध मुघलांचे लाखोंनी असलेले सैन्य, मुघलांकडे घोडदळ, मोठा तोफखाना असे असताना त्यांच्यासमोर आपला निभाव लागणार नाही हे महाराज चांगले जाणून होते म्हणून महाराजानी युद्धाचे नवनवे डावपेच आणले. 


Chatrapati Shivaji Maharaj yanche vyavasthapan tantra


आरमाराची उभारणी

गनिमी कावा वापरून शत्रूला नामोहरम करणे किंवा दूरदृष्टीने नौदलाची स्थापना करणे व महाराजांनी वापरलेली काही युद्धकौशल्य आपल्याला त्यांचा महानतेचा दाखला देतात.    आमचा राजा साडेतीनशे वर्षापूर्वी आरमाराची उभारणी करून सांगतो की, महाराष्ट्राला फक्त जमिनीवरूनच नव्हे तर पाण्यातून देखील धोका आहे पण आज आम्ही ते विसरलो.कारण आमच्यापैकी कित्येक जणांनी शिवचरित्र वाचलेच नाही जर आज आपल्या सरकारसोबत आपल्या सर्वांना शिवचरित्र समजले असते तर २६-११ झालाच नसता. 

रयतेच्या भल्यासाठीच पैसा

  छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी मुघल आणि इतर शाही रयतेकडून दामदुपटीने कर गोळा करायचे. छत्रपतींनी आपल्या प्रशासनात ही पद्धत बंद करून आपल्या प्रजेवर अगदी नगण्य कर लावला. त्या कर महसुलातून मिळणारा पैसा ते रयतेच्या भल्यासाठीच वापरीत असत. अशा तऱ्हेने त्यांनी जनता व राज्य कारभारातील पारदर्शीपणा दाखवला याचमुळे ते पुढे रयतेचे राजे म्हणून ओळखले जाऊ लागले. 

व्यवस्थापनाचं मोठे गमक

    स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं हे त्यांच्या व्यवस्थापनाचं मोठे गमक होते. मुघल,निझाम,आदिलशाह असे कसलेले विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापले होते. यासाठी चांगले सहकारी निवडले होते. आधी लगीन कोंढाण्याचं...मग रायबाचं असे म्हणत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची ताकद होती. 

न डगमगता रणनीती

   पन्हाळ्याच्या वेढ्यात सगळीकडून अपयश येत असतानाही महाराजानी न डगमगता रणनीती आखली आणि वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले. अशावेळी संकटात धीर सोडला नाही. शांतपणे निर्णय घेत राहिले. सगळं संपलय असं ज्यावेळी वाटेल तेव्हा जास्त खंबीर होणे हे महाराजांच्या व्यवस्थापनाचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य होतं याचे उदाहरण म्हणजे पुरंदरच्या तहात २३ किल्ले मुघलांना दिल्यामुळे स्वराज्य संपलं असंच सगळ्यांना वाटलं होतं पण महाराजांना नाही. 

युद्धनितीत सातत्याने बदल

    छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या युद्धनितीत बदल केला. तो सातत्याने बदलत ठेवला. एका युक्तीचा वापर त्यांनी दुसऱ्यांदा केला नाही. प्रत्येक वेळी ते नवे बदल करत राहिले. व्यवस्थापन तंत्रात वेळोवेळी बदल करत राहिले. सबब शिवरायांच्या वाट्याला विजय तर शत्रूच्या वाट्याला पराजय येत राहिले. 

स्वाभिमानी राहून आत्मसन्मान आवश्यक

   आग्र्यात औरंगजेबासमोर त्यांच्याच दरबारात आपल्या अपमानाविरोधात बोलण्याची हिम्मत महाराजांनी दाखवली होती. या प्रसंगातून स्वाभिमानी राहण्याचे आपला आत्मसन्मान आवश्यक असल्याचे महाराजांनी दाखवून दिले. ते नेहमी नैतिकतेने, नियमाने वागले तसेच आपल्या सहकाऱ्यांनाही तीच शिस्त लावली. महाराजांचे नियम स्वतः महाराजसुद्धा मोडत नसत. अगदी जवळच्या सहकाऱ्यांनासुध्दा नियमभंगाच्या शिक्षेत  माफी नसे.

जबाबदारीचे यथायोग्य वाटप

   महाराज कोणत्याही मोहिमेवर जाताना तसेच इतरवेळी जबाबदारीचे वाटप करून ठेवत असत त्यामुळे कामात सुसूत्रता राहायची. कोणताही निर्णय घेताना महाराज घाई गडबड करत नसत. शांत राहून, पूर्ण विचार करून मगच योग्य निर्णयाप्रत येत. स्वराज्य हितासाठी महाराजांनी अनेक कठोर आणि कटू निर्णय घेतले. वेळप्रसंगी आपल्या आप्तेष्टांविरोधात सुध्दा निर्णय घेतांना डगमगले नाहीत. 

विरोधकसुद्धा सहकारी

         लोकांशी फटकून वागुन तुम्ही प्रगती करू शकत नाही महाराज जनतेसोबत वागताना कोणतेही अंतर न ठेवता अगदी त्यांच्यातले होऊन जात अगदी घरातील सदस्य असल्यासारखे वागत असत. इतके सूक्ष्म व्यवस्थापन तंत्र त्यांनी अवलंबले होते. महाराज जितके कठोर होते तेवढे दयाळू आणि क्षमाशीलही होते. महाराजांच्या या स्वभावामुळे कित्येक विरोधकसुद्धा त्यांचे सहकारी बनले होते. महाराजांनी प्रत्येक वेळी फक्त लढाई जिंकण्यालाच महत्व दिले नाही तर तहात जिंकणे महाराजांसाठी महत्वाचे होते. युद्धाचा अंतिम परिणाम तहच असतो. महाराजांचे हे व्यवस्थापन तंत्र कोणत्याही क्षेत्रात अंगीकारले तरी आपण जीवनात नक्कीच यशस्वी होऊ असा मला विश्वास आहे.

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

डोळ्यांचा कोरडेपणा (Dry Eye Disease)

 डोळ्यांचा कोरडेपणा 
(Dry Eye Disease)

 डोळे,अश्रू किंवा डोळ्यातील पाणी  हे नेहमीच सुंदरता किंवा कवि कल्पना व शायरीचे विषय समजले जातात. व त्यामुळेच डोळ्यांचा कोरडेपणा ही समस्या किंवा त्याचे निदानही फारसे कोणी करून घेत नाही तर डोळे, अश्रू व डोळ्यांचा ओलावा या नेहमीच रोमँटिक गोष्टी नसून ६० ते ७० टक्के लोकसंख्येत कोरड्या डोळ्यांची समस्या आता वेगवेगळ्या प्रमाणात आढळते. कोरडे डोळे तुमच्या रोजच्या आयुष्याच्या गुणवत्तेवर किंवा आनंदावर परिणाम करू शकते व हा त्रास दिर्घकाळ राहू शकतो. 


Dolyancha kordepana
अश्रू तयार करण्यास सहभागी संरचना 


 माझ्या ओपीडीत येणाऱ्या रुग्णात ३० ते ४० टक्के रुग्ण हे डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, डोळ्यात कचरा गेल्यासारखे वाटणे, खाज येणे, लालसरपणा, थकवा, अचानक खूप पाणी येणे, दृष्टी कमी जास्त होणे ज्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो तर काही जण काम थांबवतात. डोळ्यांवर गार पाण्याचा शिपका मारतात किंवा चक्क डोळे बंद करून बसतात. बऱ्याच वेळा हे त्रास दुर्लक्षिले जातात. किंवा काही जण सहज मिळतील असे औषधाचे थेंब टाकतात. 

  डोळयांचा कोरडेपणा हा अनेक गोष्टीमुळे होऊ शकतो. डोळ्यांच्या नैसर्गिक अवस्थेतील बदल किंवा काही डोळ्यांच्या आजारामुळे ४०-५० वर्षावरील व्यक्ती, सहसा मेनोपॉजड स्रिया, कोरडे किंवा उष्ण वातावरण, वारा, ऊन, प्रदूषण या पर्यावरणीय गोष्टी  तसेच एअर कंडिशनची थंड व कोरडी हवा, स्क्रीन टाइम, काही शारीरिक आजार जसे संधिवात, थायोरॉईड ग्रंथीचा आजार, मधुमेह किंवा हार्मोनल बदल किंवा आजार, ऑटो इम्यून आजार, व काही प्रकारच्या औषधांचा साईड इफेक्ट या सर्वसामान्य गोष्टीमुळे कोरडेपणा ही समस्या उद्भवते. 
 
   कोरड्या डोळ्यांचा आजार हा डोळ्यांच्या बाह्य किंवा पृष्ठभागाचा रोग आहे. ज्यामुळे डोळ्यांचे अश्रू कमी तयार होतात. किंवा ते बाष्पीभवनाने लवकर सुकतात. यामुळे अश्रूंचा ओलावा कमी होऊन डोळ्याचा नैसर्गिक तोल बिघडतो. व डोळ्यांना चुरचुरते. डोळ्यांचा कोरडेपणा समजून घेण्यासाठी अश्रूंची माहिती घेणे किंवा डोळ्यांचा ओलावा जाणून घेणे आवश्यक आहे. डोळ्यातील पाण्याचा किंवा अश्रूंचा थर हा डोळ्यावर कायम समतल ओलावा ठेवतो. अश्रूच्या ओलाव्याचे तीन थर असतात. सर्वात वर तैलकट थर, मधला जलीय किंवा पाण्याचा थर जो ओलाव्याचा ९५ टक्के भाग असतो. व सर्वात तळाशी असतो तो म्युसिन किंवा निसरडा थर. 

   दोन मुख्य प्रकारचा डोळ्यांचा कोरडेपणा असतो. एकात कमी अश्रू तयार होतात व  दुसऱ्या प्रकारात अश्रुंचे बाष्पीभवन लवकर होते ह्यामुळे हा दुसऱ्या प्रकारचा कोरडेपणा जो अश्रुंचे लवकर बाष्पीभवन झाल्यामुळे ज्यात सर्वात वरचा तेलकट लिपिड द्रव्याचा थर कमी झाल्या कारणामुळे अश्रुंचे बाष्पीभवन लवकर होते व कोरडेपणाचे ठिपके बुब्बुळावर तयार होतात. एकंदरीत हा तेलकट थर अश्रूंचा सरंक्षित थरच असतो. डोळ्यांच्या कोरडेपणात डोळ्यातील अश्रूंचा थर व पृष्टभागावर बदल होतो. व त्यामुळे डोळ्यांची जळजळ व दृष्टी अस्पष्ट होते. 

   आजच्या युगात असे आढळून येते कि मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप खुप लोक वापरतात. व जी एक जीवनावश्यक गोष्ट आपल्याला स्वीकारावीच लागेल. बऱ्याच वेळा कामाचा भाग किंवा सोशल मीडियावरच्या टाईमपासमुळे स्क्रिनचा वापर खूपच वाढला आहे. स्क्रीन वापरतांना आपण त्यात इतके एकाग्र होतो कि डोळ्यांची उघडझाप कमी व्हायला लागते. किंवा अर्धवट होते. खूप वेळ डोळे उघडे राहिल्यामुळे अश्रूंचा सरंक्षित तेलकट थर अस्थिर होतो. या प्रकारच्या कोरड्या डोळ्यांवर सर्वसामान्य  टीअर सप्लिमेंट्स किंवा डोळ्यांचा ओलावा वाढवणारे ड्रॉप्स वापरून त्रास कमी करता येतो. 

२०-२०-२० चा नियम-

दिवसभर स्क्रिन वापरणाऱ्या लोकांसाठी हा नियम कोरडेपणा टाळण्यासाठी खूप उपयोगाचा आहे. यात दर २० मिनिट स्क्रिनवर काम केल्यावर २० सेकंदासाठी २० फूट दूरवर दृष्टी फिरवायची ज्यामुळे डोळ्यांचा ताण पण कमी होतो. काम करताना डोळ्यांची पूर्ण उघडझाप ही मिनिटात ३०-४० वेळा जाणीवपूर्वक करावी. स्क्रिन हा डोळ्यांच्या लेव्हलच्या खाली असावा. ज्यामुळे डोळे पूर्ण उघडावे लागत नाहीत. स्क्रिन उंचावर असल्यास डोळे पूर्ण उघडावे लागतात. त्यामुळे ते लवकर कोरडे पडतात. एअरकंडीशनर किंवा पंख्याचा झोत चेहऱ्यावर येऊ नये याची काळजीपण घेणे आवश्यक असते. 


  डोळ्यांच्या वरच्या व खालच्या पापण्यात जवळपास एकूण ८० ते १०० मेबोमियन ग्रंथी असतात. ज्या तेलकट सरंक्षित स्त्राव पापण्यांच्या कडेवर सोडतात या डोळे ओले ठेवण्याचे खूप महत्त्वाचे कार्य करतात. या ग्रंथीवर डोळ्यांचा ताण पडल्याने किंवा ग्रंथीवर सूज येऊन त्यांचे कार्य बिघडू शकते. त्यासाठी डोळ्यांना गरम शेक,  मसाज, काही एन्टीबायोटीक्स वापरून या ग्रंथीचे कार्य नियमित करता येऊ शकते. 

   कोरड्या डोळ्यांचा उपचार हा वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतो. उपचार हे कोरडेपणा कधीपासून आहे त्याची तीव्रता व कोणत्या कारणामुळे कोरडेपणा आला, वय, शारीरिक आजार, जीवनशैली, आहार इ. यासारख्या अनेक बदलांवर अवलंबून असतात. आता प्रगत तंत्रज्ञानाने कोरडेपणचे निदान, अश्रूंच्या तीन थरांचा कॉम्पुटर तपशील किंवा एनालिसिस व उपचार हे शक्य झाल्यामुळे  या त्रासांपासून सुटका होणे शक्य झालेय. 

  फक्त मोजक्या नेत्र रुग्णालयात किंवा फक्त काही नेत्र रोग तज्ज्ञ हे उपचार करतात कारण ही कॉम्पुटर टेकनॉलॉजी खर्चिक असल्यामुळे I R P L ( intense requalated pulsed light) या नवीन उपचार पद्धतीत विशिष्ट लाईट लहरींनी डोळ्याच्या पापण्यातील मेबोबियन  ग्रंथीचा आजार नाहीसा करून त्यांची कार्यक्षमता वाढवता येते. ज्यामुळे बाष्पीभवन जास्त झाल्याने (अश्रूंचा सर्वात वरचा संरक्षित तेलकट थर) कमी झाल्याने होणारा कोरडेपणा काही तासातच कमी करता येतो. 
   या उपचारात काही मिनिटातच कोणताही त्रास न होता रुग्णास डोळ्यांचा कोरडेपणा नियंत्रीत करता येतो. (पारंपरिक पद्धतीत खूप महिने डोळ्यांना शेक, औषध, मसाज खूप काळ किंवा महिने करावा लागतो) 

डोळ्यांच्या कोरडेपणा घालविण्याचे  घरगुती उपाय 

१) उन्हात व वाऱ्यात जातांना डोळा साईडने झाकणारे गॉगल्स वापरावे. 
२) डोळ्यांचा ओलावा वाढविणारे आर्टीफिसिएल टियर ड्रॉप्स वापरावे. 
३) डोळ्यांची उघडझाप आठवणीने करावी. 
४) २० मिनिटांनी स्क्रिन वरून २० सेकंद लांबवर/दूरवर बघा.
५) भरपूर पाणी प्या 
६) ओमेगा ३ फॅटी ऍसिड- अक्रोड, जवस जेवणात घ्या. 
७) डोळ्यांना सकाळ, संध्याकाळी गरम शेक द्या व पापण्यांचा मसाज करा. 
८) व्हिटॅमिन ए, बी व डी चे सेवन करा. 
९) नियमित योगासनांनी डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो. 
१०) स्क्रिनचा अतिवापर टाळा.

डॉ. शरद पाटील (मेडिकल डायरेक्टर)
सुशील आय केअर, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे केंद्र, नाशिक

शेतमाल विक्रीचा सखोल अभ्यास करावा : आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील (Agricultural produce sale should be studied in depth: Adarsh ​​Sarpanch Bharaskarrao Pere Patil)

शेतमाल विक्रीचा सखोल अभ्यास करावा : आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील

Agricultural produce sale should be studied in depth: Adarsh ​​Sarpanch Bharaskarrao Pere Patil


Agricultural produce sale should be studied in depth: Adarsh ​​Sarpanch Bharaskarrao Pere Patil
भास्करराव पेरे पाटील 

नाशिक : शेतकरी शेतात उत्तम दर्जाचे पीके घेतात. पण बाजारात गेल्यावर त्याला योग्य मोबदला मिळत नाही. याविषयी शेतकऱ्यांनी संघटित होऊन बाजाराचा अभ्यास करायला हवा, योग्य दर्जाच्या पीक उत्पादनाप्रमाणेच शेतमाल विक्रीचा सखोल अभ्यास करायला हवा असे प्रतिपादन आदर्श सरपंच भारस्करराव पेरे पाटील यांनी केले. देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय व रोटरी क्लब देवळाली कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मेळाव्याचे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे होते. 

    ते पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनेत सहभाग नोंदवायला हवा. त्याला पैसे लागत नाही. पण योजनेत यश मिळाले तर बक्षीस म्हणून मिळणाऱ्या रकमेत गावाचा विकास करण्याची संधी मिळते. बक्षीस मिळाले नाही तरी आपले नुकसान काहीच होत नाही. याकडे भास्कर पेरे पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. भास्कर पेरे-पाटील यांनी त्यांच्या गावात राबविलेले विविध उपक्रम व शासकीय योजनांची माहिती दिली. वेळेत कर भरणाऱ्या शेतकरी वर्गाला ग्रामपंचायत  स्तरावर तीस टक्के सवलत दिल्याची माहिती भास्कर पेरे पाटील यांनी दिली. 

   यावेळी एस.व्ही.के.टी. व  महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ तसेच रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शेतकरी व आदर्श सरपंच पुरस्कार देऊन शेतकऱ्यांना गौरविले. यामध्ये आदित्य विलास धुर्जड, सुभाष मुरलीधर पाळदे, शिवराम बापूराव मुठाळ, गोकुळ प्रकाश जाधव, निरवूत्ती बाळू वाकचौरे, हिरामण दशरथ आडके, मीना गायकवाड यांना आदर्श शेतकरी म्हणून तर पंढरीनाथ ढोकणे यांना आदर्श सरपंच पुरस्कार यांचा गौरव झाला.  

ऍड.नितीन ठाकरे

मविप्रचे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे म्हणाले कि, मविप्रचे बहुतांश सभासद हे शेतकरी आहे. शेती व्यवसायात निर्माण होणाऱ्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी तसेच कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळविता येईल, हा प्रमुख उद्देश समोर ठेवून संस्थेच्या विविध शाखेत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले जाते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शेतीचे मार्गदर्शक तत्वे शेतकऱ्यांना समजावे. यासाठी शेतकरी मेळाव्यासारख्या उपक्रमांची आवश्यकता आहे.

मविप्रचे संचालक रमेश पिंगळे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. ते यावेळी म्हणाले कि, सतत बदलणारे वातावरण, हवामान, शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरले आहे. शासनाने तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांनी याविषयी शेतकरी वर्गाला मार्गादर्शन करायला हवे. महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

****************************************

नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी व नवतेजस्विता महोत्सव ( A five-day Agricultural and Navtejasvita Mahotsav in Nashik)

 नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी व नवतेजस्विता महोत्सव
A five-day Agricultural and Navtejasvita Mahotsav in Nashik

A five-day Agricultural and Navtejasvita Mahotsav in Nashik
शेतकरी सन्मान सोहळा

३५ शेतकऱ्यांसह, महिला उद्योजकांचा होणार सन्मान

नाशिक : जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये  कृषी व नवतेजस्विता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाचदिवसीय महोत्सवामध्ये प्रयोगशील शेतकरी, महिला बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या महोत्सवात यशस्वी प्रयोग राबविणाऱ्या ३५ शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला उद्योजकांना सन्मानित केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी पत्रकार परिषद घेत महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. 


  गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर दि. १० ते १४ फेब्रुवारी याकाळात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडणार असल्याचे निकम यांनी सांगितले. महोत्सवामध्ये कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराचे क प्रात्यक्षिक सादर केले जाईल. सेंद्रिय शेतीसंदर्भातही शेतकऱ्यांना ली मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, तसेच महिलांचे बचतगट यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टॉल्सदेखील असतील. या व्यतिरिक्त खवय्यांना येथे महाराष्ट्रातील विविध भागांमधील खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे.


  महोत्सवामध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात विविध यशस्वी प्रयोग राबविणाऱ्या ३५ शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला उद्योजकांना सन्मानित केले जाणार आहे. तसेच, यंदाच्या वर्षांपासून कृषिपूरक उद्योजक या विभागातही पारितोषिक देण्यात येणार असल्याचे निकम यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कृषी विभागाचे जगदीश पाटील व महिला आर्थिक विकास महामंडळाचे संजय गायकवाड उपस्थित होते.


कृषी महोत्सवामध्ये सहा डोममध्ये तब्बल २५० स्टॉल्स असणार आहेत. त्यामध्ये सरकारी दालन, महिला बचतगट, कृषीनिविष्ठा व सिंचन विभाग, कृषी अवजारे, गृहोपयोगी वस्तू, तसेच खाऊगल्लीचा समावेश असेल. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपन्यांची वाटचाल, कृषी पर्यटन संघी व फायदे, खरेदीदार-विक्रेता संमेलन, महिला परिसंवाद यांसह विविध विषयांवर तज्ज्ञांचे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.


महापालिकेतर्फे 'पुष्पोत्सव' प्रदर्शनाचे आयोजन ('Pushpotsav' exhibition Organized by Municipal Corporation)

महापालिकेतर्फे 'पुष्पोत्सव' प्रदर्शनाचे आयोजन ('Pushpotsav' exhibition Organized by Municipal Corporation)

Pushpotsav exhibition Organized by Municipal Corporation
अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर

नाशिक :  महापालिकेकडून ९ ते ११ फेब्रुवारी या तीन दिवसाच्या दरम्यान पुष्पोत्सव (Pushpotsav)प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुष्पोत्सव प्रदर्शनात  नाशिककरांना फुलांचे विविध प्रकार पाहायला मिळणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी माहिती दिली.

पुष्पोत्सव प्रदर्शनाच्या निमित्ताने  विविध गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. त्यासाठी १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.  या पुष्पोत्सव प्रदर्शनात  ४२ नर्सरीचे स्टॉल व वीस फूड स्टॉल आहेत. महापालिका मुख्यालय आवारात पुष्पोत्सव प्रदर्शन होईल. प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात आली आहे. प्रांगणात सेल्फी पॉइंट, तर मिनोचर लैंडस्केपिंग तसेच महापालिका मुख्यालयाच्या तीनहीं मजल्यावर विविध प्रकारची गुलाबपुष्ये, मौसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या ठेवल्या जाणार आहेत.

Pushpotsav' exhibition Organized by Municipal Corporation

हे  पुष्पोत्सव  प्रदर्शन सर्वांसाठी मोफत राहील. सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल, या पुष्पोत्सवाचे उ‌द्घाटन अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर यांच्या हस्ते होईल. १० फेब्रुवारीला सकाळ सत्रात निसर्ग व फुलांवर आधारित कविता सत्र व सायंकाळी संगीतसंध्या होईल. ११ फेब्रुवारीला संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी विजेत्यांना ट्रॉफीचे वितरण अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते होईल. 

पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ९ फेब्रुवारीला सकाळी साडेसहा वाजता गणेशवाडी फूल बाजार येथून सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. पुष्पोत्सव प्रदर्शनात स्पर्धेव्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटिंग फुलांची माहिती देणारे छायाचित्र तमेच शिल्पकला व काव्यात्मक रचनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आयुष्यातीत सामाजिक व भावनिक विषय मांडणारी कलाकृती ठेवली जाणार आहे. ग्रामीण संस्कृती व मधमाशी यांचे महत्त्व दर्शविणारा देखावा पुष्पोत्सवात आहे.

या पुष्पोत्सव प्रदर्शनात  १७९७ प्रवेशिका आल्या असून गुलाब पुष्पे (खुला गट) या प्रकारात ४४६ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. त्याचबरोबर कृत्रिम आच्छादनाखालील गुलाबपुष्पे गटात २३०, तर गुलाबपुष्पे खुल्या गटात ८३ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. 

Pushpotsav' exhibition Organized by Municipal Corporation

मोसमी बहुवर्षीय फुलांच्या गटात ५२१, तर कुंडीतील शोभा व वनस्पती गटात  २६२ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. ११४ पुष्परचना व ४३ प्रवेशिका फळे व भाजीपाला गटात, तर ९८ प्रवेशिका कुंड्यांची सजावट व परिसर प्रतिकृती प्रकारात प्राप्त झाल्या आहेत. अशा एकूण १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. 

पुष्पोत्सवात पहिल्या मजल्यावर गुलाब पुष्परचना व शुष्क काष्ठ तर दुसऱ्या मजल्यावर मोसमी बहवर्षीय, बोन्साय, कॅक्टस फुले ठेवली जाणार आहे. तिसऱ्या मजल्यावर फळे व भाजीपाला तबक उद्यान व पुष्प रांगोळी असे प्रकार पाहायला मिळतील.

नाशिकमध्ये ८ ते १० मार्च दरम्यान ‘ऑटोथॉन’(AUTOTHON EXHIBITION)

नाशिकमध्ये ८ ते १० मार्च दरम्यान ‘ऑटोथॉन’(AUTOTHON EXHIBITION)

दुसरी आवृत्तीच्या वाहन प्रदर्शनाचे आयोजन; 
नामवंत ऑटोमोबाईल कंपन्यांचा सहभाग

नाशिक - कृषी आणि पर्यटन क्षेत्रात अग्रसेर असलेल्या नाशिक जिल्ह्यात तितकेच पूरक वातावरण ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रालाही लाभले आहे. हाच धागा पकडून नाशिकमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राला अधिकाधिक वाव मिळावा तसेच ऑटोमोबाईल हब म्हणून लौकिक मिळावा या उद्देशाने मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि.कडून नाशिकमध्ये 'ऑटोथॉन' या राज्यातील सर्वात मोठ्या वाहन प्रदर्शनाचे ८ ते १० मार्च २०२४ दरम्यान  दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक श्री. साहिल संजय न्याहारकर यांनी दिली.  

पर्यटनाच्या दृष्टिने महत्त्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये वाहन सुरक्षितता आणि गतिमानशीलता आणणे आवश्यक आहे. नाशिकमधील ऑटोमोबाईल क्षेत्र २० हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करून देत असून यावर शेकडो लघुउद्योग अवलंबून आहेत. नाशिककरांनी ऑटो स्पोर्ट्समध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. मोटोक्रॉस असो अथवा रॅलीज असो ऑटो स्पोर्टससाठी नाशिकची नेहमीच निवड केली जाते. वाहन निर्मितीमधील नवीन अपडेट्स, लहान-मोठ्या वाहनांची ओळख करून देण्यासाठी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. बी टू बी वाहन कंपन्या एकाच व्यासपीठावर एकत्रित आल्यास त्यांच्या व्यवसायवृद्धीलाही मदत मिळेल. 'ऑटोथॉन' च्या माध्यमातून या गोष्टी साध्य करता येतील, असा विश्वास श्री. न्याहारकर यांनी व्यक्त केला. 

नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत नामवंत अटोमोबाईल्स उत्पादक आणि त्यांच्याशी संलग्न मूळ उपकरणे निर्माता आहेत. नाशिकमध्ये ई-बाइक्सची निर्मिती होऊ लागली आहे. या ठिकाणी व्यवसायाच्या संधी, नवीन उत्पादनाची माहिती आणि सोबतच आकर्षक डिल्ससाठी सर्वसामावेशक व्यासपीठ निर्माण व्हावे, म्हणून ऑटोथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजक श्री. साहिल न्याहारकर यांनी सांगितले. 

ऑटोथॉन प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रमुख ऑटोमोबाईल ब्रँड्सना आमंत्रित करण्यात आले आहे. वाहन निर्माता कंपन्या नवीन मॉडेल आणि उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. वाहन क्षेत्रातील नवीन संकल्पना, संबंधित ब्रँडसचे नवे मॉडेल तसेच नाशिकमध्ये उपलब्ध नसलेले मॉडेल्स पाहण्याची सुवर्णसंधी वाहनप्रेमींना मिळणार आहे. नवीन उत्पादन लाँच करण्यासाठी आणि संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे एक व्यासपीठ असेल. वाहन चाहत्यांना व्हिंटेज कार पाहण्याची संधीही मिळणार आहे. तसेच एडव्हेंचर गेम्सचेही आयोजन करण्यात आले आहे. 

मागील वर्षीच्या ऑटोथॉन प्रदर्शनात ४० हुन अधिक कंपन्या स्टॉलधारक, ३०,००० हजाराहून अधिक व्हिजिटर्सनी ऑटोथॉनला भेट दिली होती. ३०० हुन  अधिक टेस्ट ड्राईव्ह झाल्या असून यशस्वीपणे दोन वर्कशॉपचे आयोजन केले होते. यावर्षी ऑटोथॉनमध्ये पहिल्या दिवशी ८ मार्च रोजी वॉव ग्रुपची २००० महिलांची रॅली निघणार असून महिला दिन साजरा होणार आहे. एमआरएफ मॉगग्रीप सुपर क्रॉस चॅम्पियनशीप आयोजित होणार असून १०० हुन अधिक प्रोफेशनल रायडर्स सहभागी होणार आहे. यात इंटरनॅशनल रायडर्स स्टंट करणार आहेत. ऑटोथॉनमध्ये विविध खाद्यपदार्थांची रेलचेल,मनोरंजनासाठी लाइव्ह संगीताचे आयोजन आणि ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडित ऍक्टिव्हिटीज होणार आहेत. ऑटोथॉनमध्ये सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक श्री. साहिल न्याहारकर यांनी केले आहे.

देशात दुसरी धवलक्रांती घडवण्यासाठी राष्ट्रिय गोकुळ मिशन' (National Gokul Mission' to create a second light revolution in the country)

देशात दुसरी धवलक्रांती घडवण्यासाठी 'राष्ट्रिय गोकुळ  मिशन'

National Gokul Mission' to create a second light revolution in the country

     दुग्ध व्यवसाय विकासावर सरकार भर देत असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम तयार केला जाईल. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेचा उल्लेख केला आहे.

Dairy yojna

     भारत हा सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. परंतु दुभत्या जनावरांची उत्पादकता कमी आहे. राष्ट्रिय गोकुळ मिशन, राष्ट्रिय पशुधन अभियान यासारख्या विद्यमान योजनांचे यश पाहता या धर्तीवर हा कार्यक्रम तयार केला जाईल.
      राष्ट्रिय गोकुळ मिशनसाठी केंद्र सरकारच्या एनआयइडीसीओ महामंडळ व नॅशनल डेअरी डेव्हलपेंट बोर्ड- एनडीडीबी संस्था केंद्रस्थानी आहे.  केंद्र सरकारची ही योजना असून देशात दुसरी धवल क्रांती घडवण्यासाठी केंद्रातील सरकारने २८ जुलै २०१४ रोजी राष्ट्रीय गोकुळ मिशन या योजनेची सुरुवात केली होती.

राष्ट्रीय गोकुळ मिशनचा उद्देश :
  • दुभत्या जनावरांच्या स्वदेशी जातींचा विकास

  • स्वदेशी पशुंसाठी वाण सुधार कार्यक्रम यामुळे अनुवांशिक सुधार व पशुसंख्येमध्ये वृद्धी
  • दूध उत्पादन व उत्पादकता वाढवणे
  •  साहिवाल, राठी, देवणी, थारपारकर, रेड सिंधी आणि जातिवंत स्वदेशी वाणांच्या माध्यमातून अन्य वाणाना उन्नत बनवणे.
  • योजनेमार्फत उच्च अनुवांशिक योग्यतेच्या सांडचे वितरण.

       केंद्र सरकारने या योजनेसाठी २०१४-१५ मध्ये १५० कोटी वितरीत केले होते. बाराव्या पंचवार्षिक योजनेत ५०० कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे.

खालील कामासाठी पुरवला जातो निधी :

१) गोकुळ मिशन अंतर्गत एकीकृत स्वदेशी पशु केंद्र म्हणजे गोकुळ ग्राम बनवणे. 

२) उच्च अनुवंशिक क्षमतेच्या स्वदेशी वाणाच्या संरक्षणासाठी मदर्स फॉर्म्स मजबूत करणे.

३) प्रजनन तंत्रात क्षेत्र प्रदर्शन रेकॉर्डिंग (एफपीआर)स्थापना.

४) जर्म प्लाजम संरक्षण संस्था/संघटनांना मदत देणे.

५) स्वदेशी वाणांच्या जातिवंत जनावरांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्याना अर्थिक मदत

६) शेतकऱ्यांना पुरस्कार (गोपाल रत्न) आणि ब्रिटन सोसायटी (कामधेनू) बनवणे.

७) स्वदेशी वाणांसाठी वेळोवेळी दुग्ध उत्पादन स्पर्धा.

८) स्वदेशी पशु विकास कार्यक्रम संचालित करणाऱ्या संस्थांमध्ये काम करणारे तांत्रिक व अतांत्रिक लोकांना प्रशिक्षण कार्यक्रम.

गोकुळ ग्राम बनवणे :

१) गोकुळ ग्राम देशी पशु केंद्र आणि स्वदेशी वाणांच्या विकासासाठी केंद्रस्थानी काम करणे. या प्रोजेक्टचा मुख्य हेतू हा आहे की नवनवीन ब्रीड तयार करणे आणि दुग्ध व्यवसाय उत्पादन वाढविणे.(आयव्हीएफ तंत्रज्ञान किंवा बुल वापरून)

२) गोकुळ ग्राम मूळ प्रजनन भाग व शहरी आवाससाठी जनावरांसाठी मोठ्या शहरात बनवण्यात आले आहे.

३) शेतकऱ्याना उच्च आनुवंशिक प्रजनन स्टॉकचा पुरवठा करण्यासाठी एक विश्वासू स्त्रोत आहे.

४) गोकुळ ग्राम शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रात आधुनिक सुविधा प्रदान करते.

५) एक हजार जनावरांच्या क्षमता असणाऱ्या या गोकुळ ग्राममध्ये दुग्ध उत्पादक आणि अनुत्पादक जनावरांचे प्रमाण ६०:४० असे असते. गोकुळ ग्राम पशूंच्या पोषणसंबंधी आवश्यकता पुर्ण करण्यासाठी घरात चारा उत्पादन करण्यासाठी बनवण्यात आले आहे.

Dairy yojna

६) राष्ट्रिय गोकुळ मिशन प्रोजेक्टसाठी २०० देशी, एचएफ, साहिवाल, देवणी, गीर गाई  किंवा २०० म्हशी (मुरा किंवा जाफराबादी) दोन्ही पैकी एक, २०० अनिवार्य किंवा दोन्ही मिळून १०० गाई आणि १०० म्हशी असे २०० करू शकता).

प्रोजेक्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी:

१) सिबिल स्कोर ७००+ आवश्यक आहे (सेटलमेंट, NPA किंवा राईट ऑफ केलेले नसावे). आणि चालू महिन्यामध्ये ट्रान्स युनियन मधून काढलेला सिबील रिपोर्ट आवश्यक आहे.

२) पाच एकर जमीन असणे आवश्यक आहे स्वतःच्या नावे किंवा लिझने म्हणजे रीतसर शासकीय रजिस्ट्रेशन करुन १० वर्षासाठी घेणे आवश्यक आणि त्या जमिनीची मार्केट व्हॅल्यू (२कोटी) होणे आवश्यक आहे,
       जर जमीन लिझने भाडे तत्वावर घेणार असाल तर ज्यांची जमीन घेणार आहात त्यांचा पण सिबील स्कोअर ७००+ लागेल आणि जमीन मॉर्गेज करण्यासाठी त्यांचे समत्ती पत्र घेणे गरजेचे आहे.

३) टोटल प्रोजेक्ट हा ४.५ कोटीचा आहे, ज्यामध्ये २ कोटी लोन उपलब्ध होईल, २ कोटी सबसिडी असेल आणि टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या १०% टक्के म्हणजे ४५-५० लाख स्वतःची गुंतवणुक आवश्यक आहे असा टोटल ४.५ कोटी चा प्रोजेक्ट आहे.

४) नॅशनल बँकेकडून १००% सेक्युर कर्ज २ कोटी उपलब्ध करून देण्यात येते, त्याच्या बदल्यात बँकेला २कोटीचे मोर्गेज(तारण) करून देणे आवश्यक आहे, आणि ज्या जमिनीवर प्रोजेक्ट उभारणार आहात तीच जमीन मॉर्गेज(तारण) करुन देणे आवश्यक आहे, आणि त्या जमिनीची मार्केट व्हॅल्यू २कोटी होणे गरजेचे आहे जर जमिनीची किंमत मार्केट व्हॅल्यू नुसार २कोटी होत नसेल तर पर्याय म्हणून घर, मोकळी जागा,एन ए प्लॉट हेही मोर्गेज करु शकता.

५) रेट ऑफ इंटरेस्ट ७.५ ते ११.५ टक्केपर्यंत असेल आणि कर्ज परतफेड (३ / ५ /  ७) वर्ष अशी असेल, (कर्जाचा हप्ता २.४० लाखपर्यंत लोन रकमेनुसार असेल आणि हप्ता हा - महिन्याला, ३ महिन्याला किंवा ६ महिन्याला करु शकता)
      लोन हे रीडूसिंग पद्धतीचे असेल आणि सबसिडीही लोन सोबत समतोल स्वरूपात किंवा थोड्या कालांतराने येईल. जी ८ टप्यामध्ये जमा होत जाईल. सरकारी नियमानुसार सबसिडी जमा होण्याच्या नियमामधे बदल होऊ शकतो. २०० गाईंच्या १० टक्के नवीन पिल्ले(कालवडी स्वरुपात)जन्माला आली की सबसिडीचा शेवटचा हप्ता वर्ग होईल. 

६) गाई किंवा म्हैस खरेदी करणे आणि दूध विक्री करणे ह्यावर कोणतेही सरकारी बंधन नसेल, उपब्धतेनुसार गाई खरेदी आणि दूध विक्री करता येईल.

७) लोन आणि सबसिडीची रक्कम ही कॅश स्वरूपात हाताळता येणार नाही, ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या खात्यातून समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा करावी लागेल. कोटेशन किंवा किमतीनुसार ती वळती होईल.

© दीपक केदू अहिरे, 
नाशिक

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...