name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): August 2021

कधी वेळ मिळाला तर बघ... (See if you have time)

कधी वेळ मिळाला तर बघ...
See if you have time

See you if you have time

कधी वेळ मिळाला तर बघ,
आपल्या स्वतःच्या मनात डाेकवून,
कसं जीवन जगताे मारून मुटकून,
का घेताेय आपण हातचं राखून....

कधी वेळ मिळाला तर बघ,
दुसऱ्याच्या जीवनात ढवळाढवळ करून,
आपलेच म्हणणं खरं आहे म्हणून,
नेहमी संबंध घ्यायचे बघा ताणून....

कधी वेळ मिळाला तर बघ,
स्वतःबराेबर कर दुसऱ्याचा विचार,
करू नकाे स्वाथाॆसाठी भ्रष्ट आचार,
ताेंड दाबून करताे बुक्क्यांचा मार....

© दीपक अहिरे, नाशिक

साद घाली (Saad Ghali)

साद घाली...
Saad Ghali

Saad Ghali

साद घाली, 

      तुझी बासरी,       

मन माेहना, 

ही प्रेमवारी...


साद घाली, 

तुझा चेहरा,

तुझ्या मुरलीचा, 

कानात वारा...


साद घाली, 

तुझी भक्ती,

उजळले जीवन, 

तुझीच उक्ती...  


साद घाली, 

तू नटखट,

तुझ्यावर प्रेम, 

माझे विनाअट...


© दीपक अहिरे, 
नाशिक

शब्दांचे जाळे (A web of words)

शब्दांचे जाळे...
A web of words

A web of words


शब्दांचे जाळे
मी दररोज विणताे,
शब्दांसाठी माझा
नित्य श्वास असताे...

शब्दांचे जाळे
मन माझे माेहरते, 
शब्दांसाठी ते 
झुरतच बसते...

शब्दांचे जाळे
शब्दजाळात फेकताे,
एक एक शब्द
मी त्यात अटकवताे...

शब्दांचे जाळे
मला माेहवते,
शब्द मला आता 
शब्दा शब्दाने खुणावते...

© दीपक अहिरे, नाशिक

पंख स्वप्नाचे (Wings of dream)

पंख स्वप्नाचे... 
Wings of Dream

Wings of dream

पंख स्वप्नाचे
लावून घेत चला,
पंख अपेक्षेचे
शाश्वत ती माला...

पंख आशेचे
ध्येयाप्रत पाेहचावे, 
प्रेमाने व आनंदाने
जगावे नी जगवावे...

पंख कर्तव्याचे
फडकवा पताका,
चांगल्या कर्मासाठी
अवश्य ते वाका...

पंख आकांक्षेचे
व्हावे गगन ठेंगणे, 
भवसागर पार व्हावा
हेच माझे मागणे... 

© दीपक अहिरे, नाशिक

सौंदर्य निसर्गाचे (Beauty of nature)

सौंदर्य  निसर्गाचे
Beauty of nature


Beauty of nature
 

निसर्गाच्या साधेपणात सौंदर्य 

         पाहताेय आम्ही,       

निसर्ग सौंदर्याची दिव्य दृष्टी 

 बाळगावी तुम्ही...

     

निसर्गाच्या सौंदर्याची व्याख्या

ज्याच्या त्याच्या दृष्टीवर,

निसर्गाचे सौंदर्य आम्ही जाेखताे

   त्याच्या चांगुलपणावर...


सौंदर्य  निसर्गाचे 

नेसला शालू हिरवा,

निसर्गात देवपण 

  देताे ऋतू बरवा...  

      

निसर्ग सौंदर्य जाेखण्याच्या

आहेत अनेक कसाेट्या,

त्यासाठी हव्यात

मनाच्या कोऱ्या पाट्या...


© दीपक अहिरे, नाशिक


नशीब (Nasheeb)

नशीब 
Nasheeb 
Nasheeb

नशीब म्हणजे
असते तरी काय,
ताे तर असताे
एक प्रयत्नांचा पाय...

नशीब म्हणजे
प्रयत्नांती परमेश्वर, 
तुम्ही कसं घडवतात
हे पाहताे ईश्वर...

नशीब म्हणजे
नव्यान्नव टक्के प्रयत्न,
उचलावा मेहनतीचा
ताे एक यत्न...

नशीब म्हणजे
प्रयत्नांचा एक डाेंगर,
ठेवू नका हवाला
नका राहू बिनघाेर... 

© दीपक अहिरे, नाशिक

आठवण (Remember)

आठवण
Remember 


आठवण आली की
अश्रू दाटतात, 
मीच ठेवताे संयम
भावना वाचतात... 

आठवण आली की
मन जड पडतं,
भावनेचं काय ते
कुठल्या कुठे वाहतं...

आठवण आली की
आठवताे तुझा चेहरा,
निर्विकार तुला आठवताे 
साेबतीला तुझा सहारा...

आठवण आली की
मनाचा ताबा घेते
निरपेक्षतेने आठवून 
आठवणीने ती जगते...    

© दीपक अहिरे, नाशिक

कुणाचं अडतं... (Kunach Adat)

कुणाचं अडतं...
Kunach Adat 

Kunach Adat

कुणाचं अडतं... कशासाठी
रडत बसतं काेण... कुणासाठी

कुणाचं अडतं... कामासाठी
सडवत राहायचं... स्वार्थासाठी 

कुणाचं अडतं काम ... वेळेवर
कुणाचं काम हाेतं... अडवल्यावर

कुणाचं अडतं... नाक दाबल्यावर
ताेंड उघडतं... बुक्का मारल्यावर

© दीपक अहिरे, नाशिक

क्षणिक पण हवं हवसं...(I want to want even momentarily)

क्षणिक पण हवं हवसं...
I want to want even momentarily


Kshanik pan havn havans

क्षणिक पण हवहवसं
आईचं प्रेम मला मिळालं, 
मिळाली  स्वर्गसुखाची अनुभूती
अंती जीवन धन्य झालं... 

क्षणिक पण हवहवसं
प्रत्येकाच्या नशीबी नसते हे प्रेम, 
जाणून घ्या हे आहे अजरामर
सहवास घ्यावा ताे सप्रेम... 

क्षणिक पण हवहवसं
मिळावे ते मायेचं पांघरूण, 
वाटेल तसं मिळवा आईचे प्रेम
हेच जीवनाचे सार्थकी अंथरूण... 

क्षणिक पण हवहवसं
निसटून जातं ते खूपदा, 
या प्रेमाच्या वियाेगाने 
वैफल्य येतंय अनेकदा... 


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

रक्षाबंधन (Raksha Bandhan)

रक्षाबंधन..
RakshaBandhan


Raksha Bandhan

भाऊ बहिण एक 

अतूट ऋणानुबंध,

त्यांचे असतात कायम 

जन्माेजन्मीचे संबंध...


भाऊ बहिणीचा असताे

मधाळ ताे जिव्हाळा,

बहिणीच्या प्रेमाने

आकंठ लागताे ताे लळा..


भाऊ बहिण असतात 

एका फांदीवरचे पक्षी,

प्रेमळ सहवासाची 

हे आप्त साक्षी. ..


भाऊ बहिणीचा सण

आपल्या संस्कृतीत वेगळा,

हे अलाैकिक प्रेम पाहून

फुलताे रक्षाबंधनाचा मळा..


© दीपक अहिरे, नाशिक

संयम (Sanyam)

संयम 
Sanyam

Sanyam

संयम असता मनी

खंत का बाळगावी,

संयम हा माेठा गुण

अवश्य दखल घ्यावी...


संयम प्रत्येक गोष्टींचा

निगुतीने जाेडावा,

संयमाने व्यवहार

आपला आपण खाेडावा...


संयमी आयुष्य

हेच शांतीचे निदर्शक,

संयम हाच माेठा 

सर्व गुणांचा वाहक... 


संयमीत असावे मन

जाेड त्याला हिंमतीची,

या दाेघांच्या एकत्रिकरणाने

आपण हाेताे सव्यसाची...


© दीपक अहिरे, नाशिक


आयुष्याची पायरी ( steps of life)

आयुष्याची पायरी 
Steps of life

Steps of life

आयुष्याची पायरी
चढता येताे अनुभव,
काळाच्या कसोटीवर
     बसतात विविध घाव...         
आयुष्याची पायरी
करू नये चालढकल, 
निसटून जाताे आता
कामाचा एक एक पल..

आयुष्याची पायरी
व्यवस्थीत बसवावी घडी,
ऐनवेळी कामाने
न मारावी ही दडी...

आयुष्याची पायरी
क्रमाक्रमाने चढावी, 
नेहमी मूल्यमापनाच्या
फुटपट्टीने ती माेजावी... 

© दीपक अहिरे, नाशिक

जाणीव (Janiv)

जाणीव...
Janiv 

Janiv

जाणीव ठेवा परिस्थितीची बदल आता घडेल, 
तपासणी करा मनाची काटा आता ढळेल.... 

जाणीव असता सदा परिस्थितीनुरूप वागा, 
ठेवून आवश्यक संयम सुमार्गाने जीवन जगा.... 

जाणीव बाळगताे ताे हाेताे  सर्वकालीन सुखी, 
नित्यक्रमात असताे व्यस्त हरीनाम असते मुखी.... 

जाणीव ठेवा आपली सातत्याने विकासाची, 
साेडवा काही समस्या राखेतून फिनिक्स हाेण्याची... 

© दीपक अहिरे, नाशिक

पाऊस मला आठवण करून देतो (The rain reminds me)

पाऊस मला आठवण करून देतो
The rain reminds me


The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देताे शेतीची,

उन्ह्याळयात हाेते मशागत 

लगबग ती पेरणीची...

The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देतोआंतरमशागतीची,

वेळेवर निंदणी करून 

आशा उत्पन्न वाढवण्याची...

The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देताे खताची,

शिफारशीनुसार खते देवून 

वाट पाहतो उत्पादनाची...

The rain reminds me

पाऊस मला आठवण 

करून देताे कापणीची,

वेळेवर काढणी करून
वेळ साधावी साठवणुकीची


©दीपक अहिरे, नाशिक


धडपड...(Dhadpad)

धडपड...
DhadPad

धडपड जगण्याची

अखंड अशी चालते,

त्यामागे मेहनत

आपल्याला ताेलते...


धडपड जगण्याची

शाश्वत असे नाही,

का चालढकलीने

वाट तुडवीत राही...


धडपड जगण्याची

प्रयत्न करीत राहावे,

नशीबाने ठेवलं पुढ्यात 

हवाल्यावर तग धरावे...


धडपड जगण्याची

स्पर्धा अडचणीची,

पळावे उर फुटुस्तेवर

वाट पहावी निस्तरण्याची..


© दीपक अहिरे, नाशिक

हा देश माझा.. (Ha desh maza)

हा देश माझा...
Ha Desh maza

Ha Desh maza

हा देश माझा

मोठी लाेकशाही,

धार्मिक विविधता

एकसंघ राही...


हा देश माझा

समस्यांनी वेढलेला,

स्वकीयांशी लढणं

घाेटाळ्यांनी गांजलेला...


हा देश माझा

कात्मता जपतो,

विविध क्षेत्रात प्रगती 

    महासत्ता दिशेने जाताे...   


हा देश माझा

तिरंगा डाैलाने फडकताे,

शांतता, सामर्थ्य,सुबत्ता

समाधान यात शाेधताे...


© दीपक अहिरे, नाशिक

आईचे काळीज...(Mothers Heart)

आईचे काळीज...
     Mother's Heart 


Mother's Heart


 
     

आईचे काळीज           
काळजी करतं,           
सदैव आपलेच            
जग ते स्मरतं...          

आईचे काळीज    
     आपल्यासाठी धडधडतं, 
आठवणीने आपल्या
अंतरंगात ते गढतं... 

आईचे काळीज           
विश्वासाचे प्रतीक,        
आई नेहमी देते          
प्रेमाचेच ते पीक...       

आईचे काळीज    
   आणा डाेळ्यासमाेर, 
देऊ नका दुःख
  करा तिची कदर... 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************



कुणी ठरवावं...(Someone decided)

कुणी ठरवावं...
Someone decided 

Someone decided

कुणी ठरवावं
कुणासाठी झुरावं,
आता आपल्याला
कुणीतरी पहावं...

कुणी ठरवावं
का अडकावं,
सावध हाेवूनी
ध्यानस्थ गावं...

कुणी ठरवावं
आपलं वागणं,    
स्वार्थासाठी जाे ताे
मुळावर उठणं...

कुणी ठरवावं
का फिरावं,
आपल्याच मनाला
का मारावं...

© दीपक अहिरे, नाशिक

.



वेदना ही अंतरी..( pain in Heart)

वेदना ही अंतरी... 
Pain in Heart

Pain in Heart

वेदना ही अंतरी 
मनात अशी सलते,
पाहून कधीतरी
डिचवून बघा जाते...

वेदना हाेते कधी मूक
आपल्याशी बाेलते, 
सल्लामसलत करता
आपल्याला शिकवते...

वेदनेला फुटतात पंख
मनात ती तडफडते,
घेते ती कानाेसा
आतल्या आत जाळते...    

वेदना हा अनुभव
आपल्यापाशी थांबते, 
किती झटकावे तिला
पुन्हा पुन्हा रेंगाळते... 

© दीपक अहिरे, नाशिक


..


श्रावणमास...(Shravan mass)

श्रावणमास...
Shravan Mass


Shravan mass



सुरू झाला श्रावणमास
संस्कृती आहे आमची खास,
बेलाचे पान वाहताे महादेवास
सदा सुखी ठेव प्रियजनास....

सुरू झाला श्रावणमास
शिवशंकर भक्तीचा बहार,
तिच शक्ति हाेते तारणहार
त्यामुळे हाेईल भवसागर पार...

सुरू झाला श्रावणमास
घ्यावा शिवशक्तीचा ध्यास,
धरावी सद्गविचारांची कास
पसरावा आराधनेचा सुवास...

सुरू झाला श्रावणमास
ओळखावा हा सोमनाथ,
भक्तिशक्तीचा एकमेव काथ
देईल तुम्हा आम्हा ताे साथ...

© दीपक केदू अहिरे 

नाशिक

Shravan mass

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...