name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur)

रेशीम उद्योग: लाभदायक ग्रामीण व्यवसाय | Profitable Rural Silk Industry

 रेशीम उद्योग: लाभदायक ग्रामीण व्यवसाय | Profitable Rural Silk Industry

       

    आपली भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे.  रोजगार, चरितार्थासाठी भारतात अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात. शेती आधारीत अनेक व्यवसायही केले जातात. त्यात रेशीम उद्योगही गणला जातो. 


Reshim udyog : labhdayak gramin vyavasay


रेशीम शेतीचा विचार : काळाची गरज 

    अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो पण लॉकडाऊनमुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो. त्यामुळे शेतकरीबांधवांनी शेतीपूरक व्यवसायाकडे आज वळणे गरजेचे आहे. आजकाल पाऊस बेभरवशाचा झाला आहे. शेती व्यवसायात नुकसान झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केली. तेव्हा शेतीपूरक व्यवसाय करणे हे शेतकरीबंधूसाठी गरजेचे आहे.  

        

निसर्गाचा लहरीपणा व बेभरवशाची बाजारपेठ असे प्रश्न आहेत तेव्हा उत्पन्नाची शाश्वती असणारा आणि सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची क्षमता असणारा एकमेव उद्योग म्हणजे रेशीम उद्योग आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा विचार करणे ही काळाची गरज बनली आहे. रेशीम शेती हा कमी भांडवलावर सुरू करता येण्याजोगा कुटीर उद्योग आहे. म्हणून तर म्हटलं जातं.


सिल्क आणि मिल्क असे दोन्ही जोडधंदे शेतकऱ्यांनी केले तर त्यांची आर्थिक उन्नती निश्चितच आहे. रेशीम उद्योगात जागतिक पातळीवर चीनची आघाडी आहे. त्यांच्याकडून भारत रेशमी धागा आयात करतो. अशा परिस्थितीत आपल्या देशात याचे उत्पादन वाढवून आपली गरज भागवण्यासोबत अन्य देशांना देखील मागणीप्रमाणे रेशीमधागे पुरवण्याची संधी आपल्या हातात आहे.


रेशीम शेतीला प्रोत्साहन देणारे आपले राज्य

      

    कर्नाटक,तामिळनाडू या राज्यांमध्ये रेशीम उद्योग जास्त प्रमाणात विकसित झाला आहे. तेथे महिला आपल्या अंगणामध्ये तूतीची किती झाडे वाढवतात आणि घरातच एखाद्या कोपऱ्यात स्टॅन्ड ठेवून त्यावर आळ्याना वाढवतात व प्रत्येक महिन्याला अतिरिक्त उत्पन्न मिळवतात.


रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अग्रेसर असलेले पहिले राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र आहे.  महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास अत्यंत अनुकूल आहे. रेशीम शेती हा एक पूरक उद्योग म्हणून पुढील बाबी विचारात घेता शेतकऱ्यास एक वरदान ठरणार आहे.  महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात तुती लागवडीचे क्षेत्र वाढलेले आहे. रोजगाराची प्रचंड संधी या उद्योगामुळे ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. 


रेशीम शेती उद्योगच का ? 


  • पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीच्या प्रकारात तुती लागवड करून रेशीम उद्योगाची सुरुवात करता येते. मात्र चांगल्या जमीनीत उत्पादन जास्त येते. 

  • एकदा तुतीची लागवड केल्यानंतर तुतीपाल्याचे कीटक संगोपनात दहा ते पंधरा वर्षापर्यंत उपयोग होत असल्याने दरवर्षी याचा लागवड खर्च पुन्हा पुन्हा करावा लागत नाही.

  • अल्प भांडवलाची गुंतवणूक करून मासिक पगारासारखा उत्पन्न मिळून देणारा हा उद्योग आहे 

  • या उद्योगांमध्ये घरातील वृद्ध, लहान मुले, स्त्रिया, अपंग व्यक्ती देखील आपला सहभाग देऊ शकतात. त्यामुळे कीटक व संगोपनाचे काम घरच्या घरी करू शकतात. मजुरांची आवश्यकता नसते. 

  • इतर बागायती पिकापेक्षा तुतीबाग जोपासण्याकरीता१/३ पाणी लागते.

  • कच्चा मालाची उपलब्धता याची शाश्वती व तयार होणाऱ्या पक्का मालाच्या खरेदीची हमी असणारा हा एकमेव उद्योग आहे. 

  • एक एकर तुती लागवड वरती संगोपनाच्या वेळी कीटकांनी खाऊन शिल्लक राहिलेला पाला, फांद्या आणि विष्ठा यावर दोन दुभत्या जनावरांच्या दुधाचे वाढीस खाद्य म्हणून उपयोग होऊ शकतो. 

  • रेशीम किटकाच्या विष्ठेचा उपयोग बायोगॅससाठी केला जाऊ शकतो.

  • एक एकर रेशीम शेती उद्योगापासून वार्षिक रुपये चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळू शकतात.  

  • रेशीम शेती उद्योग ग्रामीण भागात प्रत्यक्ष व प्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध होत असल्याने शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यात आपोआपच मदत होते. 


तुतीकोष शासनामार्फत खरेदी


Reshim udyog : labhdayak gramin vavasaya

   रेशीम शेती उद्योगातील निर्मित कोषापासून रेशीम धागा व त्यापासून वस्त्र तयार करतात. महाराष्ट्रातील विदर्भामध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या चार जिल्ह्यात जंगलातील अर्जुन वृक्षावर "टसर" रेशीम उद्योगालाही प्रचंड भाव आहे.  रेशीम उद्योगच का?  खरच तो फायदेशीर आहे का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील त्याचे  कारणेही तशीच आहेत.


रेशीम उद्योगासाठी एकदा लागवड केल्यानंतर ते पंधरा वर्षे जगत असल्याकारणाने दरवर्षी लागवड करावी लागत नाही. त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत लागवड खर्च कमी येतो. जास्त उन्हाळ्याच्या काळात पाणी दिले नाहीत तरी तुती मरत नाही ज्याप्रमाणे आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणून संबोधतो त्याचप्रमाणे तुतीला देखील कल्पवृक्ष म्हणजे वावगे ठरणार नाही.


रेशमी आळ्याची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास याप्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. वाळलेला पाळा व विष्टेचा गोबर गॅसमध्ये उपयोग करून उत्तम गॅस मिळतो. संगोपनात वापरून राहिलेल्या पाल्याचा चोथा करून अळंबीची लागवड करता येते. त्यापासून गांडूळखत देखील तयार करता येते. सौंदर्यप्रसाधने व आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील तुतीच्या पाल्याचा वापर केला जातो. विदेशात तुतीच्या पानाचा चहा व वाईन तयार करतात.  तूतीच्या वाळलेल्या फांद्या इंधन म्हणून वापरता येतात. तुतीची दरवर्षी तळछाटणी करावी लागते. या छाटणीपासून मिळणारी तुतीकोष शासनामार्फत खरेदी केली जातात. 


रेशीम शेतीसाठी विविध योजना 

      

    रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या योजना कार्यरत आहेत त्याचा फायदा शेतकरीबंधूंनी करून घ्यावा. मनरेगा योजनेअंतर्गत प्रती एकर अनुदान दिले जाते. शासनामार्फत रेशीम उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, मेळावे, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. रेशीम धाग्याची मागणी दरवर्षी २० टक्क्यांनी वाढतच आहे. 

एका एकर बागेमधून वर्षाला कमीत कमी चार पिके तर जास्तीत जास्त सहा पिके घेता येतात. यावरून वर्षाला कमीत कमी एक लाख वीस हजार रुपये उत्पादन मिळते. कोषापासून धागा काढून कापड तयार करणे हा मुख्य भाग असला तरी कमी प्रतीच्या कोषापासून फुले, बुके, हार, तोरण, वालपीस या बाबी तयार करता येतात. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला व्यवसाय म्हणून रेशीम उद्योग व्यवसायाकडे बघितले जाते. रोजगार निर्मितीची प्रचंड ताकद रेशीम उद्योगात आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात तुती लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः महिलांचे योगदान ८० टक्के आहे घरातील दहा वर्षाच्या मुलापासून तर ८० वर्षाच्या आजीपर्यंत कोणीही या व्यवसायात हातभार लावू शकतो. महिलांना प्रशिक्षण देऊन कोषापासून हार, गुच्छ तयार करून रोजगार मिळवू शकतो.


रेशीम संगोपन 

      

    तुतीची लागवड करून पानांची निर्मिती करणारे मोठे शेतकरी तुतीच्या फांद्या कीटक संगोपनासाठी अथवा कीटक संगोपन केंद्रांना विक्री करून व त्याचे उत्पन्न दोघांनाही मिळू शकते.

    

    रेशीम संगोपनासाठी निरोगी अंडीपुंज तयार करून विक्री करणे, चॉकी कीटक संगोपन करणे, रेशीम कीटक संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची विक्री करणे, केवळ प्रौढावस्थेतील अळ्यांचे संगोपन करून कोश निर्मिती करणे, कोश खरेदी करून त्यापासून धागा गुंडाळण्याची प्रक्रिया करणे, रेशीम धाग्यापासून हातमाग व यंत्रमाग यावरून वस्त्र विणणे, रेशीम वस्त्रावर रंगाई व छपाई काम करणे, त्याच्या वस्तू तयार करणे व त्याची विक्री करणे, रेशीम निर्मितीसाठी लागणारी साधने निर्माण करणे जसे संगोपन साहित्य, प्रक्रिया साहित्याचे उत्पादन व दुरुस्ती करणे इत्यादी प्रकारचे विविध कामकाज करू शकतो. महिला बचत गट व विविध संस्थाद्वारे विविध उपक्रम यासाठी राबवण्यात येतात. 


कोषाचे उत्पादन


      रेशीम शेती उद्योगाची सुरुवात तुतीच्या कलमापासून किमान पाण्याची सोय असलेल्या लागवड क्षेत्रावर केली जाते. याकरिता शेतकऱ्यानी एकरी रुपये ५०० याप्रमाणे सभासद नोंदणी जिल्ह्यातील रेशीम कार्यालयात भरणा करणे गरजेचे आहे. मान्सूनच्या आगमनानंतर जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये तुतीच्या पेन्सिल आकाराच्या सहा महिने पूर्ण झालेल्या बेण्यापासून तुतीची लागवड करणे योग्य असते.

    तुती लागवड योग्य जोपासल्यानंतर किमान चार महिन्यापर्यंत तुतीबाग कीटक संगोपनासाठी तयार होते. पहिल्या वर्षी एकरी तुती बागेवर ४०० अंडीपुंजाचे संगोपन करून प्रति शंभर अंडीपुंज आज किमान ५० ते ६५ किलोग्रॅम प्रमाणे २०० ते २७० किलोग्रॅम कोषाचे उत्पादन मिळू शकते. दुसऱ्या वर्षापासून खरे उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते म्हणजेच १००० ते १२०० अंडीपुंज यापासून किमान ६०० ते ७०० किलोग्रॅम कोशाची उत्पादन होऊ शकते. चीन व इतर प्रगत राष्ट्रात एक एकर तुतीपासून वार्षिक १२०० किलोग्रॅमपर्यंत कोशाचे उत्पादन घेतले जाते. सध्या भरघोस कोश उत्पादन देणारे कीटकांचे विविध जाती विकसित झालेल्या आहेत.  


रेशमाचे विविध प्रकार 

      

रेशमाचे विविध प्रकार आहेत. 


  • तुती रेशीम : तुतीचा पाला हे रेशीम अळीचे खाद्य असून या अंड्यांपासून जे रेशीम मिळते त्याला तुती रेशीम म्हणतात. जागतिक स्तरावर जवळपास ८० ते ८५ टक्के तुती रेशमाचे उत्पादन घेतले जाते. तुती रेशीम अत्यंत मुलायम असल्याने रेशमाच्या चारही प्रकारात उच्च दर्जाचे मानले जाते. 

  • टसर रेशीम : या प्रकारात अर्जुन वृक्षाचा पाला खाद्य म्हणून दिला जातो. यापासून जे रेशीम मिळते त्याला टसर रेशीम असे म्हणतात. 

  • मुगा रेशीम : यामध्ये सोलू झाडांचा पाला हे रेशीम अळीचे खाद्य असून या झाडांपासून जे रेशीम मिळते त्याला मुगा रेशीम असे म्हणतात. मुगा रेशीम धाग्याचा रंग निसर्गातच सोनेरी असतो. 

  • एरी रेशीम:  यामध्ये एरंडाच्या झाडाचा पाला रेशीम आळीचे खाद्य असते. 

 
फायद्याची तुती रेशीम शेती 

        

    रेशीम शेती शेतकऱ्यांनी का करावी, तसेच त्याचे काय फायदे आहेत हे आपण बघितले. हजारो वर्षापासून जगात रेशीमबद्दलचे आकर्षण असून जागतिक तसेच देशपातळीवर रेशीमला वाढती मागणी असून पुरवठा त्या प्रमाणामध्ये नाही. देशातील रेशीम उत्पादनात महाराष्ट्राचा फक्त एक टक्के वाटा असून उद्योगवाढीस मोठा वाव आहे.


    आज रेशीम शेती उद्योगाच्या प्रत्येक टप्प्यावर असणारा आर्थिक फायदा प्रचंड रोजगार निर्मिती क्षमता व सरकारचा या उद्योगवाढीसाठी असणारी अनुकूल व गतिमान धोरण या सर्व कारणांमुळे राज्यातील रेशीम शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.


शेतकऱ्यांनी तुती लागवड करून उत्पादित केलेले उत्पादन वाजवी दराने शास्त्रीय पद्धतीने खरेदी करते.ज्यामध्ये तोलाई, हमाली या प्रकारची कोणतीही आकारणी शेतकऱ्यांकडून केली जात नाही. म्हणजेच शेतकऱ्यास बाजारपेठ शोधायची गरज नाही. त्याच्या विक्रीतून पहिल्या वर्षी एकरी रुपये ४० हजार, दुसऱ्या वर्षापासून ६० हजार ते १.५ लाखापर्यंत उत्पन्न मिळते. त्यामध्ये केवळ २० टक्के खर्च होतो. व इतर राज्यात विकण्याची  शेतकऱ्यास मुभा मिळते. 


Reshim udyog : labhdayak gramin vyavasaya

शासनाकडून अनुदान

   

    शेतकरीस्तरावर शासनामार्फत प्रशिक्षण, शैक्षणिक सहली सुविधा व विनामूल्य तांत्रिक मार्गदर्शनाची सोय तसेच नाममात्र दराने अंडीपुंज पुरवठा केला जातो. याशिवाय कोषापासून धागानिर्मिती, धाग्यापासून कापड निर्मिती करण्यासाठी देखील शासनाकडून अनुदान दिले जाते.

देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत रेशीमला मोठी मागणी आहे.  तुतीची लागवड केल्यावर त्यापासून जवळपास पंधरा वर्षे उत्पन्न घेता येते.औषध फवारणीचा फारसा खर्च होत नाही. जमीन तयार करणे, पिकाच्या लागवडीचा वारंवार खर्च नाही. आधुनिक तुती लागवडीच्या पट्टा पद्धतीमुळे एका एकरामध्ये फक्त पंधरा गुंठे क्षेत्रात पाणी द्यावे लागते म्हणजेच पाण्याची बचत पर्यायाने मजुरांची, मजुरीची व विजेची बचत होते. तसेच आधुनिक फांदी पद्धत कीटक संगोपन यामुळे जवळपास ७० टक्के मजुरी कमी लागते.

    

    उन्हाळ्यात दोन-तीन महिने पाणी दिले नाही तरी झाडे जिवंत राहतात. आवश्यकतेनुसार इतर शेती सांभाळून हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यास केव्हाही तुतीचे पीक घेता येते.  आंतरमशागत बैलजोडी किंवा यंत्राने करून पैसा व वेळेची बचत होते. इतर पिकांच्या तुलनेत अत्यंत कमी भांडवल लागते. संपूर्ण वर्षात पाच ते सहा पीके ठराविक अंतराने घेता येतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्ण हंगाम व यशस्वी होण्याची भीती नाही.

पावसाळ्यात तुती बियाण्यांपासून उत्पन्नाची हमी असते. काही देशांमध्ये ग्रीन टी म्हणून उपयोग केला जात आहे तर पूप्यापासून बनवलेले तेल गुडघेदुखीवर उपयुक्त आहे. रेशीम धाग्याचा उपयोग विविध शस्त्रक्रियेत टाके घालण्यासाठी केला जातो. चीन, थायलंड या देशांमध्ये पूप्या हे अत्यंत आवडीचे खाद्य आहे. तुतीच्या फळापासून उच्च प्रतीची वाईननिर्मिती केली जाते. रेशीम कोषाच्या धाग्यांपासून कांजीवरम पैठणी, बनारसी शालू, पितांबर, मलमल अशी विविध वस्त्रे तयार केली जातात. 

    

    शेतकरी बांधवांनो एखादा व्यावसायिक आपला व्यवसाय आपल्या मुलाकडे सोपवताना तो जास्तीत जास्त सुविधायुक्त प्रगतशील करण्याचा प्रयत्न करतो मग आपल्यापुढे देखील हे आव्हानच आहे ना ? आपल्यापुढेदेखील आपली पुढची पिढी आहे तिच्याकडे आपण शेती सुपूर्द करणार आहोत आणि तिला आजच्या स्पर्धेच्या युगात टिकवायचे असेल तर आपण देखील एक पाऊल पुढे जाणे गरजेचे आहे.


    म्हणूनच रेशीम उद्योग ही फक्त आत्ताच्या काळाची गरज नाही तर ती तुमच्या मुलांच्या भविष्याची सोय देखील आहे म्हणून म्हणावेसे वाटते "हे रेशमाचे धागे त्यांना त्यांचे आयुष्याचे नवीन वस्त्र सुबकरीत्या विणायला मदत करतील".


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया निर्मिती उद्योग | Dairy processing Industry

सर्वांसाठी गृह उद्योग : दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया निर्मिती उद्योग

Dairy Processing Industry | Dugdhjanya Nirmiti Udyog

Dugdhjanya nirmiti udyog

    भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला सर्वाधिक चालना देणाऱ्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे दुग्ध व्यवसाय. महाराष्ट्रात तर हा उद्योग ग्रामीण महिलांसाठी सर्वात मोठा गृह-उद्योग बनला आहे. पहाटे उठून दूध काढणे, दुधाचे घराघरात वितरण करणे, घरच्या घरी दही-ताक-लोणी-तूप तयार करून विकणे, तसेच बचत गटामार्फत मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया व्यवसाय चालवणे—या सर्व कार्यांत आज लाखो पुरुष आणि महिला कार्यरत आहेत.

    आजचा हा ब्लॉग गाई-म्हशी पालनापासून ते दूध प्रक्रिया उद्योगापर्यंतचा संपूर्ण मार्गदर्शक म्हणून तयार केला आहे. अगदी ५–१० लिटर दूध असले तरी त्यापासून उत्पादन करून मोठा नफा कमावता येतो. योग्य नियोजन, स्वच्छता, तंत्रज्ञान, पॅकेजिंग आणि मार्केटिंगचा वापर केला तर हा व्यवसाय घरबसल्या मोठा बनू शकतो.


१. दूध उत्पादनाचा पाया – गाई व म्हशी पालनाचा अभ्यास

Dugdhjanya nirmiti udyog

    भारतातील दुग्धउत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा अधिक आहे. म्हशीचे दूध घट्ट, उच्च-फॅटचे आणि दाट सायीचे असते म्हणूनच ग्राहक त्याला प्राधान्य देतात. गाईचे दूध तुलनेने हलके असले तरी A1 आणि A2 दुधाबाबतची जागरूकता वाढल्याने देशी गाईच्या दुधाची मागणी मोठ्या शहरांमध्ये झपाट्याने वाढली आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • निकृष्ट चाऱ्याचे उच्च गुणवत्तेच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींत जास्त

  • देशी गाईच्या दूधाला A2 प्रकारामुळे प्रीमियम दर मिळतो

  • लहान शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा राष्ट्रीय पातळीवरील दुग्ध उत्पादनात मोठा वाटा

दुधाचे दर, चारा खर्च, मजूर खर्च वाढत असल्याने केवळ दूध विक्री किफायतशीर राहिलेली नाही. त्यामुळे दूध प्रक्रिया उद्योग हा भविष्यातला सर्वात टिकाऊ व्यवसाय आहे.


२. घरच्या घरी दुग्ध प्रक्रिया – लहान गुंतवणुकीत मोठा व्यवसाय

Dugdhjanya nirmiti udyog

    दूध प्रक्रिया सुरू करण्यासाठी खूप मोठे युनिट उभारण्याची गरज नाही. सुरुवातीला घरच्या घरी खालील प्रक्रिया सुरू करता येतात:

  • दही, ताक

  • पनीर, खवा

  • लोणी, तूप

  • साय (क्रीम)

  • श्रीखंड, बासुंदी

  • फ्लेवर्ड दूध

  • उपवासासाठी दही, श्रीखंड

  • पारंपरिक दुग्ध उत्पादने

फक्त १०–२० लिटर दूध असले तरी दिवसाला ५०० ते १००० रुपयांपर्यंत उत्पन्न शक्य आहे.


३. सण व उत्सवांनुसार दुग्ध उत्पादनाचे नियोजन – हमखास विक्री मॉडेल

Dugdhjanya nirmiti udyog

भारतामध्ये सणांचा सततचा उत्साह असतो. आणि बहुतेक सण दुग्धपदार्थाशिवाय पूर्णच होत नाहीत.
त्यामुळे सणानुसार उत्पादन नियोजन करणे हा सर्वोत्तम विक्रीचा मार्ग आहे.

उपवासाचे दिवस – दही, श्रीखंड, बासुंदी

  • एकादशी

  • चतुर्थी

  • नवरात्र

  • श्रावण महिना
    या दिवशी दह्याची मागणी ३–१० पट वाढते.

समारंभ – खवा, पनीर

  • विवाह समारंभ

  • वाढदिवस

  • कॅटरिंग इवेंट

  • हॉटेल्स आणि ढाबे

विशेष मागणी असलेले पदार्थ

  • श्रीखंड

  • बासुंदी

  • खीर

  • पेढे

  • आईस्क्रीमसाठी क्रीम

आगाऊ ऑर्डर नोंदवून घरपोच सेवा दिल्यास ग्राहकवर्ग जलद वाढतो.


४. खवा आणि पनीर निर्मिती – कमी खर्चात जास्त नफा

Dugdhjanya nirmiti udyog

हा सर्वात मोठा आणि सोपा गृह-उद्योग आहे.

खवा निर्मितीचे फायदे

  • तयार करायला सोपा

  • विवाहसमारंभ, कॅटरर्स, स्वीट मार्टमध्ये सतत मागणी

  • १ लिटर दुधापासून २००–२५० ग्रॅम खवा तयार होतो

  • नफा मार्जिन ३०–४०%

पनीर निर्मिती

  • १ लिटर दुधापासून १५०–२०० ग्रॅम पनीर

  • हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाब्यांची दैनंदिन मोठी मागणी

  • शेळीच्या दुधापासून पनीर—उच्च गुणवत्ता

पनीर प्रेस मशीन १०–१२ हजारांत मिळते. घरबसल्या पनीर बनवता येते.


५. क्रीम, बटर आणि तूप उत्पादन – प्रीमियम मार्केटसाठी उत्तम पर्याय

Dugdhjanya nirmiti udyog

दुधाची उपलब्धता जास्त असेल तर क्रीम सेपरेटर मशीन वापरून साय वेगळी काढता येते.
मिळालेली साय वापरून :

  • लोणी

  • बटर

  • देशी तूप

तयार करता येते.

शुद्ध, निर्भेळ तुपाला बाजारात अत्यंत जास्त किंमत मिळते. जर गुणवत्ता सिद्ध करता आली तर तूप हा सर्वात फायदेशीर उत्पादन व्यवसाय ठरू शकतो.


६. कमी फॅटचे दुग्धपदार्थ – वाढत्या हॉटेल आणि फिटनेस मार्केटसाठी

Dugdhjanya nirmiti udyog

साय काढल्यानंतर उरलेले दूध (Skimmed milk) खूप कमी दराने मिळते. पण याच दुधापासून:

  • लो-फॅट दही

  • लो-फॅट श्रीखंड

  • लो-फॅट बासुंदी

  • लो-फॅट पनीर

तयार करून आरोग्य-जागरूक ग्राहकांना विक्री करता येते.

फिटनेस ट्रेनर्स, जिम हॉल्स, कॅफे यांच्याकडे याची मोठी मागणी निर्माण होऊ शकते.


७. पारंपरिक दुग्धपदार्थ – स्थानिक बाजारासाठी उत्तम मॉडेल

Dugdhjanya padartha nirmiti udyog

भारताच्या प्रत्येक राज्यात एकतरी प्रसिद्ध पारंपरिक दुग्धपदार्थ आहे. त्यांची मागणी नेहमीच जास्त असते.

प्रसिद्ध भारतीय दुग्धपदार्थ

  • बेळगावचा कुंदा

  • बंगालचा संदेश, मिष्टी दही

  • पंजाबी फिरनी

  • मथुरेचा पेढा

  • दक्षिण भारतातील पायसम

हे पदार्थ आपल्या भागात तयार करून विकले तर स्थानिक बाजारपेठेत जोरदार प्रतिसाद मिळू शकतो.


८. उपउत्पादनांचा (By-product) कमाल वापर – दुधाचा १००% उपयोग

Dugdhajanya nirmiti prakriya udyog

दुधाच्या प्रत्येक प्रक्रियेत काहीतरी उपउत्पादन मिळते:

निवळी (Whey) पासून

  • पेय

  • तूपयुक्त सूप

  • कुल्फी

  • कॉफी ड्रिंक

ताकापासून

  • मसाला ताक

  • कोकम ताक

  • फ्लेवर्ड बटरमिल्क

उन्हाळ्याच्या काळात हे पेय खूप विकले जातात.


९. आवश्यक मशिनरी – कमी बजेटमध्ये उपलब्ध

dugdhjanya nirmiti udyog

लहान स्तरावरील प्रक्रिया युनिटसाठी खालील मशिनरी परवडणाऱ्या किमतीत मिळते:

  • पनीर प्रेस मशीन – १०,०००–१२,००० रुपये

  • खवा मशीन – ४०,०००–४५,००० रुपये

  • क्रीम सेपरेटर – ८,०००–१५,००० रुपये

  • मिनी पॅकेजिंग मशीन – २,५००–१०,००० रुपये


१०. दूध भेसळ तपासणी – आवश्यक गुणवत्ता नियंत्रण

दूध भेसळ ही मोठी समस्या आहे. ग्राहक विश्वास मिळवण्यासाठी शुद्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

उपलब्ध किट्स :

  • नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) – ₹3,000 ते ₹10,000

  • नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नाल (NDRI) – भेसळ चाचणी किट

या किटच्या मदतीने दूध व उत्पादने शुद्ध असल्याचे सिद्ध करता येते.


११. पॅकेजिंग आणि ब्रॅंडिंग – व्यवसाय वाढविण्याचे गुपित

Dugdhjanya nirmiti udyog

    दूध प्रक्रिया उद्योगात योग्य पॅकेजिंग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पॅकेजिंग आकर्षक असल्यास उत्पादनाचा दरही वाढतो.

पॅकेजिंगचे प्रकार

  • पाउच

  • बॉक्स

  • प्लास्टिक कंटेनर्स

  • ग्लास बॉटल्स

  • व्हॅक्यूम पॅक

ब्रँडिंग टिप्स

  • स्वतःचा लोगो

  • स्वच्छ आणि आधुनिक लेबल्स

  • शुद्धतेचे प्रमाणपत्र दाखवणारा स्टिकर

  • उत्पादनाची तारीख आणि एक्सपायरी

  • सोशल मीडिया मार्केटिंग

  • “होम डिलिव्हरी” सेवा


१२. डेअरी उद्योगाचे भविष्यातील संधी

  • शहरी भागात A2 दुधाची मागणी वाढत आहे

  • कमी फॅट व फिटनेस उत्पादनेची मागणी वाढत आहे

  • मिठाई उद्योगाला रोज कच्चा माल हवा

  • कॅफे, बेकरी, हॉटेल्स यांची पनीर/क्रीम मागणी वाढत आहे

  • पारंपरिक भारतीय पदार्थांच्या ई-कॉमर्स ब्रँड्स मोठ्या होत आहेत

लहान शेतकऱ्यांसाठी हा उद्योग भविष्यात सर्वात सुरक्षित, सतत चालणारा आणि प्रचंड नफा देणारा सिद्ध होणार आहे.


निष्कर्ष

    दूध प्रक्रिया उद्योग हा प्रत्येक घराला चालवता येणारा, लहान गुंतवणूक, मोठा नफा आणि सततची मागणी असलेला व्यवसाय आहे.
गुणवत्ता, स्वच्छता, सातत्य आणि योग्य मार्केटिंग असेल तर हा व्यवसाय काही महिन्यांतच स्थिर आणि फायदेशीर बनतो.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

अल्पावधीत भरघोस उत्पन्न देणारा 'शेवगा' | Shevga Farming Complete Guide

अल्पावधीत भरघोस उत्पन्न देणारा 'शेवगा' |

 Shevga Farming Complete Guide 


Alpavadhit bharghos uttpana denara shevaga


 शेतीमालाचे अनिश्चित उत्पादन आणि बाजारभावातील चढउतार यामुळे पारंपरिक पिकांना पर्यायी पीकपद्धती विकसित करणे आवश्यक असल्याने शेवग्यासारख्या अपारंपरिक पिकांची लागवड त्याला पर्याय होऊ शकेल. शेवगा हे कमीत कमी पाण्यावर येणारे, कोरडवाहू पीक असून, जास्त पावसाच्या प्रदेशातदेखील उत्तम प्रकारे येते, हे सिद्ध झाले आहे. अशा या शेवगा पिकाविषयी...


      दिवसेंदिवस शेतकरी आता अपारंपरिक शेतीकडे वळू लागला आहे. नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या प्रकारच्या शेतीमधून अधिक उत्पन्न काढले आहे. कॉफी, शतावरी, शेवगा किंवा अशाच अपारंपरिक पिकाच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल दिसू लागला आहे. 
       पारंपरिक शेतीमध्ये द्राक्ष, कांदा, ऊस, कापूस आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत असताना वाढता उत्पादन खर्च आणि पडता बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग वैतागला. यातून अल्पावधीत भरघोस उत्पादन देणाऱ्या 'शेवगा' पिकाकडे तो वळू लागला आहे.

फळबागेत शेवगा आंतरपीक 
Shevga intercropping in orchards


  महाराष्ट्रात फळबागाखालील क्षेत्र वाढत आहे. फळबागेत शेवगा हे आंतरपीक घेण्यास भरपूर वाव आहे. नाशिक येथील अॅग्रोफॉरेस्ट्री फेडरेशन आणि मुक्त विद्यापीठाच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांतून नाशिक जिल्ह्यातील शेवगा पिकाखालील क्षेत्र २०० एकराच्या वर गेले असून, दरवर्षी या क्षेत्रात पन्नास एकरांनी वाढ होत आहे. फळबागेत शेवगा हे आंतरपीक म्हणून घेण्यास भरपूर वाव आहे. 


शेवग्याचे अनेक औषधी उपयोग
 
Many medicinal uses of Drumstick 


  शेवग्याची भाजी आहाराच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक असते. शेवग्याच्या शेंगामध्ये 'अ', 'ब' आणि 'क' जीवनसत्त्वे व लोह आणि चुना हो खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. शेंगांचा भाजी म्हणून प्रामुख्याने उपयोग होतो, तसेच पानांची भाजी व फुलांची कोशिंबीरही करतात. शेवग्याच्या बियांपासून तेल काढता येते, त्याला 'बेन ऑईल' म्हणतात. हे घड्याळातील 'गिअर वंगण' म्हणून वापरतात. शेवग्याचे अनेक औषधी उपयोगही आहेत म्हणून शेवगा लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.


Alpavadhit bharghos uttpana denara shevaga


शेवग्याच्या वाणाची निवड
Selection of the final variety

   आपल्याकडे रूढ असलेल्या जातींची लागवड करून उत्पादन मिळते. परंतु वर्षातून एकदाच उत्पादन मिळत असल्यामुळे बाजारामध्ये सर्व शेंगा एकाच वेळी येतात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगाना पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन अल्पमुदतीत उत्पादन देणाऱ्या, तसेच पारंपरिक शेवग्याच्या जातींचा प्रसार व्हावा, अशी इच्छा शेतकऱ्यांनी प्रगट केल्यामुळे वरील संस्थांनी कोइमतूर येथील व्ही. के. एम - २ या शेवग्याच्या वाणाची निवड करून लागवड करण्याचे ठरविले.


Alpavadhit bharghos uttpana denara shevaga

शेवगा : बारमाही उत्पन्न देणारे पीक
Shevga: A perennial crop

   शेवगा हे बारमाही उत्पन्न देणारे पीक असून, ते कमी पावसाच्या भागात उत्तम वाढते. कोरड्या व उष्ण हवामानात शेवग्याला भरपूर फुले आणि शेंगा लागतात. शेवग्याची लागवड करताना प्रामुख्याने पी. के. एम-१ या जातीची लागवड करावी. ही जात तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोइमतूर येथून प्रसारित केली आहे. ही जात १० ते १२ फूट उंच वाढते. एका झाडाला सरासरी ७० ग्रॅम वजनाच्या एक इंच जाडीच्या १.५ ते २ फूट लांबीच्या शेंगा लागतात. या जातीच्या शेंगा लागवडीपासून सहा महिन्यांमध्ये काढणीस तयार होतात. बागाईत शेतातील एका झाडाला २५० ते ३०० शेंगा आणि कोरड्या शेतातील झाडाला १०० ते १५० शेंगा येतात. अशा प्रकारे एका झाडापासून वर्षाला सरासरी १० ते १५ किलो शेंगा मिळतात. एका किलोमागे सरासरी १५ शेंगा बसतात. याशिवाय कोकण रुचिरा, कोइमतूर-२, जी. के. व्ही. के. १, जी. के. व्ही. के. २ आदी सुधारित जाती आहेत.


Alpavadhit bharghos uttpana denara shevaga


शेवग्याची लागवड
Cultivation of the shevaga

  

   शेवग्याची लागवड बियांपासून रोपे तयार करून किवा फाटे कलमे लावून करता येते. एका किलोमागे सरासरी ३००० बिया असतात. या बिया पॉलिबॅगमध्ये टोकल्यास सरासरी २५०० लागवडीयोग्य रोपे मिळतात. फाटे कलमासाठी १ ते १.२५ मोटर लांब व ५ ते ६ सें. मी. जाडीची फांदा वापरावी. फाटे कलमे पावसाळ्यापूर्वी मुख्य शेतात लावली तरी चालते. रोपे पावसाळ्यापूर्वी तयार करावीत, २ ते ३ महिन्यांचे रोपे लागवडीस तयार होते. 

    बागाईत शेवग्याची लागवड १२ बाय ८ फूट अंतरावर केल्यास एकरी ४५० झाडे बसतात, तर जिराईत शेवग्याची लागवड १२ बाय ६ फूट अंतरावर केल्यास एकरी ६०० झाडे बसतात. आणखी लागवड फाटे कलमे वापरून करावयाची असल्यास छाट कलमे पावसाळ्यापूर्वी शेतात लावावीत त्यासाठी ४ बाय ४ मीटर किंवा ५ बाय ५ मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदून त्यात एक घमेले चांगले कुजलेले शेणखत २५० ग्रॅम क्लोरोडेन पावडर टाकून खड्डे भरून घ्यावेत. लागवडीपूर्वी छाटकलमाच्या खालच्या टोकास तिरका काप घ्यावा. प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी योग्य आकाराचे छाट कलम लावावे. कलमाच्या चोहोबाजूंची माती घट्ट दाबून घ्यावी. कलमाच्या वरच्या भागावर शेणमातीचा गोळा किंवा मेण लावावे. यामुळे जगण्याचे प्रमाण वाढते.


शेवग्यासाठी पाणी व खत व्यवस्थापन 
Water and fertilizer management for the final harvest


    सुरवातीला पाऊस नसेल, तर पाणी देण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. जमीन खोल आणि भुसभुशीत असल्यास शेवग्याची लागवड खड्डा न घेताही करता येते.शेवग्याच्या झाडाला प्रतिवर्षी प्रत्येकी १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ७५ ग्रॅम स्फुरद (४५५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) व ७५ ग्रॅम पालांश (१२० ग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश) द्यावे. शेवग्याचे झाड मोठे झाल्यावर पाणी नाही दिले तरी चालते. परंतु पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळते. जास्तीत जास्त सेंद्रिय खते वापरावीत. गरजेनुसार अल्पप्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा. 

    जिरायत भागामध्ये शेवग्याचे पीक घेताना जास्तीत जास्त शेणखत, तसेच इतर सेंद्रिय पदार्थांचा वापर करून रासायनिक खतांचा वापर टाळल्यास पीकाच्या हवामान व वाणी परिस्थितीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो. शेवगा पिकाला अत्यंत कमी पाणी लागते. पाण्याची जास्तच कमतरता असेल, तर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा, तसेच शक्य असेल, तर मडका पद्धतीने पाणी देता येते; तसेच पाण्याची उपलब्धता कमी असल्यास झाडांच्या खोडाजवळ सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.


Alpavadhit bharghos uttpana denara shevaga


शेवग्याची काढणी 
Harvesting of shevga


    शेवग्याच्या लागवडीनंतर सरासरी ६ महिन्यात फुले येतात. ८ महिन्यांत शेंगा येतात आणि पुढील ४ महिन्यात जशा शेंगा पक्व होतील, तशी काढणी चालू राहते. शेवग्याच्या शेंगावरील रेखांकित पीळ पूर्ण सुटल्यास आणि शेंगेची जाडी एक इंच झाल्यास शेंगा काढणीस योग्य झाल्या असे समजावे. शेंगा कोवळ्या अवस्थेत काढल्यास उत्पादनात घट येते, तर शेंगा अतिपक्व झाल्यावर काढल्यास बाजारभावात घट येते. म्हणून पक्वता लक्षणे ओळखून शेंगाची काढणी करावी. 

    रोपे लागवडीनंतर ७५ ते १०० सें.मी. उंचीची झाल्यावर वरचा शेंडा खोडावा. त्यामुळे फांद्या येण्यास मदत होते. बहुवर्षीय जातीच्या झाडांची छाटणी वर्षाआड किंवा दोन वर्षांनी करावी छाटणी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. छाटणी करतांना मुख्य फांद्या छाटाव्यात, यामुळे नवीन फूट येऊन फांद्याचे प्रमाण वाढते. बुटक्या जातींची काढणी सहा महिन्यात करता येते.

    लागवडीनंतर ८ ते १० महिन्यांची शेवग्याच्या शेंगा तयार होतात. शेंगाची काढणी काठीला किंवा बांबूला आकडी बांधून करावी. हंगामात आठ-दहा दिवसांच्या अंतराने ३० ते ४० किलो शेंगा मिळतात. झाडांची व्यवस्थित देखभाल केल्यास झाडाच्या वाढीनुसार उत्पादनात वाढ होते.


किडी व रोग नियत्रंण 
Pest and disease control

  
  शेवग्यावर किडी व रोगांचा फारसा उपद्रव होत नाही. मात्र, पीक फुलावर असताना फुले व कोवळ्या शेंगा खाणाऱ्या अळीचा उपद्रव होतो. या किडीच्या नियंत्रणाखाली १० लिटर पाण्यात १५ मिलि. या प्रमाणात मोनोक्रोटोमॉस हे कीटकनाशक मिसळून फवारणी करावी. या किडीचा उपद्रव विशेषतः मोठ्या व जुन्या झालेल्या झाडांना होतो. 
    अळी खोड पोखरून आत शिरते. त्यामुळे झाड कमकुवत होऊन उत्पादन कमी मिळते. प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या बुंध्याजवळ अळीने पोखरून बाहेर पाडलेला भुसा दिसून येतो. अशा छिद्रात डायमेथोएट किंवा अल्ड्रीन कीटनाशकात कापसाचा बोळा बुडवून तोंड बंद करून घ्यावे. म्हणजे आत असलेली अळी मरते. काही ठिकाणी खोडावर देवी (कॅन्कर) या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. यावर १ टक्का बोर्डोमिश्रण किंवा कार्बेन्डॅझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. या पिकावर रोगाचा फारसा उपद्रव दिसून येत नाही. ज्या जमिनीमध्ये पाणी साठून राहते तेथे शेवग्याच्या झाडाला मूळकुंज काही प्रमाणात येतो. त्यासाठी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून या जिवाणू बुरशीनाशकाचा वापर करावा.


शेवगा शेंगाचे उत्पादन
Production of legume

    
  एका झाडाला सरासरी ९० ते १०० शेंगा मिळतात. म्हणजेच ५ ते ७ किलो उत्पादन एका झाडापासून मिळते. एकरी एका हंगामामध्ये ५०० ते २००० किलो शेंगाचे उत्पादन मिळते. वर्षातून दोनदा उत्पादन मिळत असल्यामुळे ३००० ते ४००० किलोपर्यंत उत्पादन मिळते. मोसमी बहाराच्या वेळी सर्वसाधारणपणे १० ते १२ रुपये किलोपर्यंत भाव मिळतो, तर बिगरमोसमी बहाराच्या वेळी २० ते २५ रु. पर्यंत भाव मिळू शकतो. कमीतकमी १० रु. किलो या भावाने कमीत कमी ३००० किलो शेंगा वर्षातून विकल्या तरीही एकरी ३० हजार रुपयांपर्यंत उत्पादन मिळते. 
    शेवग्याची लागवड पावसाच्या पाण्यावर अथवा बांधावर केली, तरी शेंगाच्या आकारमानात कोणताही फरक पडत नाही. शेंगाचा घोस वर्षभर येत असला, तरी एप्रिल आणि सप्टेंबर या काळात सर्वांत अधिक शेंगा मिळतात.

   शेवगा लागवड केल्यानंतर सहा महिन्यांत उत्पादन सुरू होते व सर्वसाधारणपणे ३ ते ४ वर्षे झाडाचे आयुष्य असते. म्हणजेच एकूण ७ ते ८ वेळा शेवग्याचे उत्पादन घेता येते. शेवगा पिकाच्या व्यापारी उत्पादन पद्धतीविषयी; तसेच रोपांच्या उपलब्धतेविषयी सविस्तर महितीसाठी श्री. सुरेश दाते, मु. पो, गोंडेगाव, ता. निफाड, जि. नाशिक; तसेच संचालक, कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. 'शेवगा' पिकाच्या शेतीकडे शेतकरीबंधूनी वळावे. यासाठी हा लेखप्रपंच !

Alpavadhit bhargosh utpanna denara shevaga

शेवग्याची यशस्वी लागवड

Successful planting of the shevga

  नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोंडेगाव येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश दाते यांनी शेवग्याची ७ एकरावर पडीक जमिनीत यशस्वी लागवड केली. एकरी २०,००० पेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याचा दावा दाते यांनी केला आहे. 
    यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रक्षेत्रातही शेवगा पिकाची लागवड यशस्वी झाली आहे. उत्तमराम पाटील (मॉडर्न नर्सरी, जयहिंद कॉलनी, देवपूर, धुळे) यांनीही पाच एकर क्षेत्रावर लागवड केली असून, अश्वगंधा पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. १४ महिन्यांत दोन बहार धरले. एका झाडापासून १० ते १२ किलो शेंगा उत्पादन धरल्यास एकरी ५ ते १० शेंगा आल्या. एका किलोस ५ ते १० रुपये किलो स्थानिक बाजारभाव मिळाला असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. झाडांना वर्षातून प्रत्येकी ६ ते १० रुपयांचे खत,  आंतरमशागत एवढाच खर्च असल्याचेही त्यांनी सांगितले. येवल्याचे (जि. नाशिक) नाशिक जिल्हा बँकेचे संचालक अॅड. माणिकराव शिंदे यांनीही ७एकरांपेक्षा अधिक शेवगा पिकाची व्यापारी तत्त्वावर लागवड केली असून, शेवग्याचे पीक अल्पावधीत भरघोस पैसे मिळवून देणारे पीक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...