name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): दुग्ध व्यवसायासाठी फायद्याचा मुरघास (Profitable cowpea for dairy farming)

दुग्ध व्यवसायासाठी फायद्याचा मुरघास (Profitable cowpea for dairy farming)

दुग्ध व्यवसायासाठी फायद्याचा मुरघास 

Profitable cowpea for dairy farming


Dugdh vyavadayasathi fayadyacha murghas

   जनावरांसाठी गहू भुसा, तूर भुसा आणि मुरघास हे तीनही महत्त्वाचे चारा आहेत. यापैकी, मुरघास हा जनावरांसाठी सर्वोत्तम चारा मानला जातो कारण त्यात पौष्टिक घटक जास्त असतात आणि ते वर्षभर उपलब्ध होऊ शकते. गहू आणि तूर भुसा हे जनावरांना खाण्यासाठी योग्य असले तरी ते मुरघासपेक्षा कमी पौष्टिक असतात आणि त्यांची उपलब्धता हंगामात असते.

  

 पावसाळ्यात जेव्हा भरपूर प्रमाणात हिरवे गवत उपलब्ध असते, तेच शास्त्रीय पद्धतीन साठविल्यास त्याचा उन्हाळ्यात हिरवा चारा म्हणून उपयोग करता येतो या चारा माठविण्याच्या पद्धतीस 'मूरघास' म्हणतात. दुभत्या जनावरांना उन्हाळ्यातही हिरवे गवत थोड्या कष्टात उपलब्ध करून देता येईल, अशा या मूरघासविषयी...

  
  मुरघास हा जनावरांसाठी सर्वोत्तम चारा आहे. कारण  हिरवा चारा योग्य प्रकारे साठवून त्यापासून मुरघास बनवला जातो. त्यामुळे त्यात पौष्टिक घटकांचे प्रमाण अधिक असते. मुरघास बनवण्यासाठी योग्य प्रक्रिया आणि जागा लागते. मुरघास हा जनावरांना वर्षभर दिला जाणारा एक पौष्टिक आणि सहज उपलब्ध होणारा चारा आहे. 


  मुरघास हा ज्वारी, बाजरी, मका तसेच लसूण गवत, बरसीम या द्विदल चारा पिकापासून तयार करता येतो. मुरघास कोरड्या चाऱ्याबरोबर एकत्र करून दिल्यास जनावरे आवडीने ती खातात. दुभत्या जनावरांना दररोज १० ते १५ किलो मुरघास खाऊ घालावा.

Dugdh vyavadayasathi fayadyacha murghas

 जर तुम्ही जनावरांसाठी चांगला आणि पौष्टिक चारा शोधत असाल, तर मुरघास हा एक चांगला पर्याय आहे. गहू आणि तूर भुसा हे देखील जनावरांसाठी उपयुक्त आहेत, परंतु ते मुरघासपेक्षा कमी पौष्टिक आणि हंगामात उपलब्ध होणारे असतात.

  सकस हिरव्या चाऱ्याच्या  निर्मितीकडे ज्या प्रमाणात लक्ष द्यायला हवे तेवढे लक्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून ते दिले जात नाही. त्याच्या बेताच्या अर्थिक परिस्थितीमुळे ते शक्यही होत नाही. त्यामुळे गाई, म्हशी व बकऱ्यांसाठी आवश्यक असलेला हिरवा चारा उपलब्ध होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन करण्यासाठी साधारणतः बऱ्यापैकी सुपीक जमीन आणि बारमाही पाण्याची उपलब्धतता या दोन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील शेती बहुतांशी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी वर्षभर शेतात दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा घेऊ शकत नाही.

     स्थानिक हिरवे गवत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे या कालावधीत चाराटंचाईचा प्रश्नच येत नाही. परंतु त्या पुढील कालावधीत हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळणे कठीण असते. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होते. हिरव्या चाऱ्याच्या अभावी जनावरांचे कुपोषण होऊन त्यांच्या आरोग्यावरही त्याचा अनिष्ट परिणाम होतो.

      डोंगराळ भाग व इतर पडीक जमिनीत बऱ्याच प्रमाणात स्थानिक हिरवे गवत उपलब्ध होऊ शकते. जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांत खरिपाची चाऱ्याची पिके उत्पादनक्षम असतात. पावसाळी हवा असल्याने नैसर्गिकपणे वैरण वाळवता येत नाही. अशा वेळी हिरव्या गवताचे मूरघासात रूपांतर करणे हा सर्वांत चांगला व शास्त्रीय मार्ग होय. ज्या ठिकाणी हवा आणि पाणी याचा शिरकाव होऊ शकणार नाही अशा ठिकाणी साठविलेल्या हिरव्या चाऱ्यास 'मूरघास' म्हणतात.

मूरघासासाठी खड्डा
   
 शेतकऱ्याची अर्थिक परिस्थिती, हवामान व सोयीस्कर दृष्टिकोनातून मूरघास खड्ड्यांचा मूरघास तयार करण्यासाठी जमिनीमध्ये गोल विहिरीसारखे किवा चौकोनी खड्डे तयार करावे लागतात. मूरघासाचा खड्डा तयार झाल्यावर त्याच्या आतील सर्व बाजूंनी त्यास सिमेंटचे प्लॅस्टर करून घ्यावे. यामुळे जमिनीतून झिरपणारे पाणी खड्ड्यात येणार नाही. सिमेंट प्लॅस्टर करणे शक्य नसल्यास खड्डा शेणाने किंवा चिखलाने आतून सारवून घ्यावा. अशा प्रकारच्या खड्ड्यात प्लॅस्टिक कापड आच्छादून खड्डा भरता येतो. 

'मुरघास' कसे तयार करावे?

   महाराष्ट्रात साधारणपणे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत हिरवे गवत मुबलक प्रमाणात असते. मूरघास तयार करण्यासाठी चारा फुलोऱ्यावर असताना कापावा. कापल्यानंतर थोडा वेळ वाळू द्यावा. चिंब भिजलेला चारा खड्ड्यात भरू नये. चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास मूरघास खराब होतो. गवताची कापणी केल्यानंतर यंत्राने किंवा विळा अथवा कोयत्याच्या साह्याने त्याचे तुकडे करून घ्यावेत. ते थोडा वेळ वाळवावे.

   मूरघासाची चव सुधारण्यासाठी किंवा अन्नद्रव्यांचे मुख्यतः प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी अनुक्रमे २ टक्के गूळ (कमी प्रतीचा) अथवा उसाची मळी, १ टक्का मीठ खडे (जाड मीठ) ०.५ टक्के यूरिया घ्यावा. त्याचे एका टाकीत मिश्रण करावे. साधारणपणे १०० किलो हिरव्या गवताकरिता ३५ ते ४० लि. पाणी पुरेसे होते. हे प्रमाण गवताच्या आर्द्रतेवर अवलंबून असते. खड्डा भरताना खड्ड्यामध्ये आच्छादलेल्या प्लॅस्टिक कापडावर बारीक तुकडे केलेल्या सुमारे १०० किलो गवताचा किंवा त्या पटीत थर पसरून घ्यावा व त्यावर वरीलप्रमाणे तयार केलेले मिश्रण (गूळ, मीठ व यूरियाचे) झारीने किवा हाताने शिंपडावे. अशा प्रकारे गवताचे थरावर थर रचून व्यवस्थितरीत्या पायाने घट्ट दाबावे, जेणेकरून आत हवा राहू शकणार नाही. १ घनफूट खड्ड्यामध्ये साधारणपणे १२ ते १५ किलो हिरवे गवत मावू शकते. चारा पायाने दाबताना खड्ड्याच्या भिंतीलगत विशेष काळजीपूर्वक दाबावा, कारण दोन थरांमधील हवा संपूर्णपणे निघून जाणे आवश्यक असते. या पद्धतीने खड्डा पूर्ण भरावा

      खड्डा भरल्यानंतर हिरव्या गवताचे थर जमिनीच्या पृष्ठभागापासून ६० ते १० से. मी. (२ ते ३ फूट) उंचीपर्यंत रचावेत. त्यानंतर सर्वात वरच्या थरावर वाळलेले गवत, भाराचा पेंढा टाकावा. शक्य असल्यास त्यावर जाड प्लॅस्टिकचे आवरण घालावे. अशा प्रकारे खड्डा सर्व बाजूनी झाकून घ्यावा. यावर साधारणतः १५ ते २२.५ से. मी. जाडीचा चिखलाचा थर देऊन खड्डा चोहोबाजूंनी चांगला लिंपूनव शेणाने सारवून घ्यावा. खड्डा लिंपताना त्यास गोलघुमटासारखा आकार द्यावा. असे केल्याने पावसाचे पाणी त्यावर पडल्यास चटकन खाली ओघळून जाईल. लिंपलेल्या खड्ड्याकडे सतत लक्ष द्यावे. कारण लिंपलेल्या चिखलाच्या थरामध्ये भेगा पडतात. अशा भेगांमधून हवा व पाणी खड्ड्यात जाण्याचा संभव असतो. त्यामुळे आतील मूरघास खराब होतो. अशा भेगा दिसल्यास त्या ताबडतोब लिंपून व शेणाने सारवून घ्याव्यात.

मूरघास खड्डा केव्हा उघडावा? 
    
  साधारणपणे खड्डा भरल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी मूरघास तयार होतो. उन्हाळ्यात किंवा हिरव्या चाऱ्याची टंचाई असेल तेव्हा खड्डा उघडावा मूरघास काढताना एक थर पूर्ण काढून झाल्यावर दूसरा थर काढावा. खड्डा उघडल्यावर पाऊस आल्यास त्यावर ताबडतोब जाड प्लास्टिकचे आवरण घालावे. मुरघासचा रंग पिवळसर हिरवा असावा. जर खड्डा भरण्यापूर्वी चाऱ्यात पाण्याचा अंश जास्त असेल तर गडद हिरवा किंवा काळसर रंग आढळून येईल तसेच जर चाऱ्यात पाण्याचा अंश अपेक्षेपेक्षा जास्त असेल तर गडद हिरवा किंवा काळसर रंग आढळून येईल. तसेच जर चाऱ्यात पाण्याचा अंश अपेक्षेपेक्षा कमी असेल किंवा मूरघासाच्या खड्‌याचे तोंड चांगल्याप्रकारे बंद केले नसेल तर तांबूस, करपलेला, काळसर असा मुरघास तयार होईल. यास हलक्या प्रतीचा मूरघास म्हणतात. उत्तम प्रतीच्या घासास आंबटगोड वास येतो. चांगल्या मूरघासात बुरशी वाढलेली नसते. बुरशीजन्य मूरघासाचा थर आढळल्यास तो पूर्णपणे काढून टाकावा व खालील चांगला थर खाद्यासाठी वापरावा. साधारणपणे तयार केलेल्या मूरघासासाठी जास्तीत जास्त ५ ते ७ टक्के वाया जाऊन उरलेले उत्तम प्रतीचे मूरघास उपलब्ध होऊ शकते.

Dugdh vyavadayasathi fayadyacha murghas

मूरघास खाऊ घालण्याचे प्रमाण 
 मूरघास सर्व प्रकारच्या जनावरांना खाऊ घालता येतो. दररोज १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या गायींना १५ किलो मूरघास खाऊ घालावे व सर्वसाधारणपणे इतर जनावरास प्रत्येकी ८ ते १० किलो मूरघास द्यावे. दुभत्या जनावरांना धारा काढण्यापूर्वी मूरघास खाऊ घालू नये. त्यामुळे दुधास वास येण्याची शक्यता असते. मूरघास केल्यामुळे हिरव्या चाऱ्यातील जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची साठवण होते. दुग्ध व्यवसायांमध्ये मूरघासाचा हिरवा चारा म्हणून उपयोग केल्यास दुभत्या जनावरांना उन्हाळ्यात पौष्टिक हिरवा चारा खाऊ घालता येतो.

       कमी पावसाच्या भागात अथवा जेथे विहिरींना कमी पाणी असते अशा भागातील शेतकऱ्यांनी व दुग्ध व्यावसायिकांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या हिरव्या चाऱ्यापासून 'मूरघास' तयार केल्यास त्यांचा दुग्ध व्यवसाय निश्चितच फायद्याचा होईल. दूध उत्पादन व्यवसायाच्या विकासासाठी सकस हिरव्या चाऱ्याची मुबलक उपलब्धतता आवश्यक असते. 'मूरघास' तयार करून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय अधिकाधिक वाढवावा. 

 गहू भुसा (Wheat husk)

Dugdha vyavadayasathi fayadyacha murghas

  गहू पिकाच्या काढणीनंतर उरलेला भाग म्हणजे गहू भुसा होय. हा चारा सहज उपलब्ध होतो आणि जनावरांना आवडतो. गहू भुसा हा इतर चाऱ्यासोबत किंवा वैरण म्हणून वापरला जातो. गहू भुसा हा तसा पोषक नसतो. त्यात प्रथिने आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जनावरांना फक्त गहू भुसा खाऊ घातल्यास त्यांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून हा चारा इतर चाऱ्यासोबत खाऊ घालावा. 

 तूर भुसा (Tur husk)

Dugdha vyavadayasathi fayadyacha murghas

  तूर भुसा हा गहू भुसापेक्षा थोडा अधिक पौष्टिक असतो. त्यात प्रथिने आणि फायबरचे प्रमाण थोडे जास्त असते. तूर भुसा देखील मुरघासपेक्षा तुलनेने कमी पौष्टिक असतो आणि तो हंगामातच उपलब्ध होतो. तूर भुसा हा गहू भुसाप्रमाणे इतर चाऱ्यासोबत किंवा वैरण म्हणून वापरला जातो. 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

*****************************************

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...