संयतपणा
Moderation
प्रत्येक प्रश्नाला भिडणं
असतं नाही हे उत्तर सर्वोत्तम,
यशस्वी होण्यासाठी पर्याय
योग्य निर्णय शांतपणे घेणे उत्तम...
चार पावलं पुढे जाण्यासाठी
दोन पावलं मागे यावे लागतात,
मागे येण्याने पुढचे बेसावध
दरम्यान ताकदीचे पर्याय गवसतात...
चालता चालता दगड येईल आडवा
त्यामुळे वाट नका सोडू,
सरळ त्याच्यावर राहा उभा
स्वतःची उंची वाढून मार्ग काढू...
समस्येचा हेतू हाच
तुम्ही त्यात अडकावं,
सयंतपणा दाखवून
मार्ग शोधत राहावं...
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
















