मैत्री
Friendship
आपल्याबद्दल सगळे जाणूनही
जो प्रेम करतो तोच मित्र,
मैत्री म्हणजे चुकीची कानउघाडणी
संकटकाळी मदतीचे सत्र...
मैत्रीच्या आरशाने
गुणदोष दाखवावे,
स्तुती करणारे मित्र पावलोपावली
आसवं पुसणारे हात असावे...
विश्वास,भरवसा,बांधिलकी,त्याग
मैत्री या ठिकाणी वसते,
जिथे चांगुलपणाची देवाणघेवाण
अशा मित्रांवर मैत्री बसते...
व्यक्तीला स्वतःचा प्रभाव
पैसा येत नाही कामी,
आपला स्वभाव आणि मित्रच
उपयोगी येतात नामी...
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
#friendship quote
#Kavita
#Marathi Kavita
#Marathi Poem
#marathikavita
#marathi Kavita
#Kavi
#marathi Kavi
No comments:
Post a Comment