प्रतिक्रिया...
Reaction
जगाच्या कृतीवर तुमचे
काही अवलंबून नसते,
तुमच्या कृतीवरच जगाची कृती
क्रियेची प्रतिक्रिया उमटवते...
आपलं आयुष्य म्हणजे
आपल्याच कृतीचा आरसा,
आपलं आयुष्य आपलाच प्रतिध्वनी
जपावा मिळालेला वारसा...
इतर लोकाचं वागणं
ही आपल्या वागण्याची प्रतिक्रिया,
तुम्ही सकारात्मक असलात
तर तशीच उमटेल क्रिया...
आपल्या कष्टाचं झाड
कधीही नसतं कृतघ्न,
दुसऱ्यासाठी चांगलं काम करा
त्याला फळ येतात निर्विघ्न...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment