name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): पतंजलीचे 'फूड अॅण्ड हब पार्क' (Patanjali's 'Food and Hub Park')

पतंजलीचे 'फूड अॅण्ड हब पार्क' (Patanjali's 'Food and Hub Park')

आशियातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प 
Asia's largest orange processing plant

पतंजलीचे 'फूड अॅण्ड हब पार्क'
Patanjali's 'Food and Hub Park'

Patanjali's food and hub park

 नागपुरातील मिहान (मल्टिमॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि नागपूर विमानतळ) येथील पतंजली मेगा फूड अॅण्ड हर्बल पार्कचा नुकताच प्रारंभ झाला आहे. 

      नागपुरात स्थापन करण्यात येणारा हा पतंजलीचा फळे आणि भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प आहे. यात लिंबूवर्गीय आणि उष्णकटिबंधीय फळे आणि भाज्यांवर प्रक्रिया केली जाणार आहे. ज्यूस, ज्यूस कॉन्सन्ट्रेट, लगदा, पेस्ट आणि प्युरी इ. उत्पादन केले जाणार आहे. 

दररोज ८०० टन फळांवर प्रक्रिया
Processing 800 tons of fruits daily

        नागपूर ऑरेंज सिटी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. हे लक्षात घेऊन पतंजलीने लिंबूवर्गीय प्रक्रिया प्रकल्प स्थापन केला आहे. यात दररोज ८०० टन फळांवर प्रक्रिया केली जाणार असून १०० टक्के नैसर्गिक, गोठवलेला रस व कॉन्सन्ट्रेट बनवता येणार आहे. 

विविध फळांवर प्रक्रिया 
Processing of various fruits

    उष्णकटिबंधीय फळांवरही प्रक्रिया केली जाणार असून यात आवळा, आंबा, पेरू, पपई, स्ट्रॉबेरी इ. फळांचा समावेश आहे. कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा साखर न वापरता उत्पादने टेट्रा पॅक अॅसेप्टिक पॅकेजिंगमध्ये प्रीमियम विभागात उपलब्ध करून दिली जाणार आहे.  या प्लांटचे वैशिष्ट्य म्हणजे उपउत्पादन वाया जाऊ दिले जात नाही. आतापर्यंत एक हजार टन हंगामी फळांवर प्रक्रिया करण्यात आली आहे.

पाठिंब्याची आणि सहकार्याची आवश्यकता
Need for support and cooperation

 विदर्भाचे नाव घेताच शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि छळलेल्या दुःखी शेतकऱ्यांचे चित्र आपल्या समोर येते. नागपूरच्या मिहान येथे उभारण्यात आलेला 'पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क' आशियातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प आहे. शेतकरी आणि कृषी क्षेत्राची परिस्थिती बदलण्याचे काम मिहानच्या या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाद्वारे केले जाईल. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची आणि सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांनी केले.

Patanjalis food and hub park

शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे दरवाजे 
Doors to prosperity for farmers

     नागपूरच्या भूमीला वंदन करताना आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, नागपूरची ही भूमी अध्यात्म आणि क्रांतीची भूमी आहे. ही भूमी देशाला आणि संविधानाला ठोस स्वरूप देणार आहे. आता या भूमीतून, पतंजलीच्या नवीन कृषी क्रांतीद्वारे देशातील शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे दरवाजे उघडतील. संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात अनेक अडथळे आले. विदर्भातील प्रत्येक शेतकरी आमच्या संपर्कात आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणे पहिले प्राधान्य असल्याचे आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले. 

असा आहे प्रकल्प  
This is the project

   मिहानमधील या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता दररोज ८०० टन आहे. यामध्ये 'अ' दर्जा व्यतिरिक्त 'ब' आणि 'क' दर्जाचे संत्री, अकाली परिपक्व देखील झालेले उत्पादन आणि वादळामुळे गळून पडलेल्या संत्र्यांवर देखील प्रक्रिया करता येणार आहे. 

संपूर्ण प्रणालीवर संशोधन
Research on the entire system

   प्रकल्प शून्य कचरा प्रणालीवर काम करतो. संत्र्याच्या सालीपासून बाष्पशील आणि सुगंधी तेल काढले जाते. यासाठी विदेशातील तंत्रज्ञान आणि संपूर्ण प्रणालीवर संशोधन केले आहे. कारण एवढा मोठा प्रकल्प केवळ रसाच्या आधारावर चालवता येणार नाही.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...