name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): "अर्थसाक्षर व्हा" पुस्तक परिचय (Become Financially Literate)

"अर्थसाक्षर व्हा" पुस्तक परिचय (Become Financially Literate)

पुस्तक परिचय
Book Introduction

"अर्थसाक्षर व्हा"

"Become Financially Literate"

Arthsakshar vha

  "अर्थसाक्षर व्हा" हे पुस्तक विविध वित्त विषयांचे अभ्यासक सी.ए. अभिजित कोळपकर यांनी लिहिले असून अर्थविषयक संकल्पनांचे सुलभ आकलन व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील व या प्रयत्नांचा महत्वाचा टप्पा म्हणजे "अर्थसाक्षर व्हा' हे पुस्तक आहे. 

  
  "अर्थसाक्षर व्हा" हे केवळ आर्थिक नियोजनावर आधारित पुस्तकांपैकी एक पुस्तक नाही या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे अगदी सर्वसामान्य वाचक, युवा, प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिक या साऱ्यांचा वैयक्तिक व कौटुंबिक दृष्टिकोनाचा विचार करून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.
   
  "अर्थसाक्षर व्हा" हे पुस्तक एकूण सहा भागांमध्ये विभागण्यात आले आहे. ओळख अर्थसाक्षरतेची, आर्थिक नियोजन, विमा व कर्ज व्यवस्थापन, गुंतवणूक नियोजन, शेअर्स व म्युच्युअल फंड आर्थिक फसवणुकीपासून सावधान हे ते सहा विभाग आहेत.
      
  पुस्तकाच्या प्रत्येक भागात संबंधित विषय विस्तृतपणे सोप्या शब्दात मांडलेला आहे. लेखन,वाचन आणि आचरण या तिन्ही गोष्टीचा विचार करून विषय सोपा करण्यासाठी वेगवेगळी उदाहरणे, तक्ते, सूत्रे, चित्रे व फ्लो-चार्ट्स  यांचा वापर करण्यात आला आहे.  स्मार्ट वर्कशीट किंवा चेकलिस्टमुळे वैयक्तिक किंवा कौटुंबिक आर्थिक नियोजन करताना वाचकांना या पुस्तकामुळे मोलाची मदत मिळणार आहे.
     
  आपण अगोदरपासूनच आर्थिक नियोजन करीत असाल तर या पुस्तकातील गुंतवणूक, कर, कर्ज व जोखीम व्यवस्थापनाचा आधार घेऊन ते यशस्वी करू शकता. हे पुस्तक वाचून मनापासून निश्चय करा की माझ्या आर्थिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे.  
   
 हे पुस्तक वाचल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारा की मी याचा वापर कसा करेन. तुम्हाला ज्या ओळी आवडतील त्या पेनाने, पेन्सिलने किंवा हायलायटरने अधोरेखित करा म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यांची उजळणी करणे नंतर सोपे होईल. या पुस्तकापासून खरा फायदा मिळवायचा असेल तर दर तीन महिन्यातून एकदा तरी तुमच्या आर्थिक नियोजनाचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. 
     
  या पुस्तकातील माहिती जास्तीत जास्त बिनचूक देण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. सदर पुस्तकाचा उद्देश हा अर्थ साक्षरतेचा प्रसार करणे असून यामधून कुठलाही सल्ला देण्यात आला नाही. कायद्याचे तसेच नियमाचे बदलणारे स्वरूप लक्षात घेता कोणताही अर्थविषयक निर्णय घेताना आधी स्वतः अभ्यास व संशोधन करावे. आपल्या नेहमीच्या सल्लागाराचा जरूर सल्ला घ्या हे या पुस्तकात नमूद केले आहे.
  
 "अर्थसाक्षर व्हा" या पुस्तकाला अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त, थिंक पॉझिटिव्ह मासिकाचे मुख्य संपादक तसेच सकाळ वृत्तपत्र समूहाचे माजी संपादक श्री. यमाजी मालकर यांची प्रस्तावना मिळाली आहे.
       
  या पुस्तकात पहिल्या भागामध्ये अर्थसाक्षरतेची ओळख या विभागात तुमची आर्थिक मानसिकता तपासा, आर्थिक आरोग्याचा फ्लो-चार्ट !, आत्मविश्वासाचा भ्रम आणि आपले आर्थिक जीवन, नेहमीचे आर्थिक गैरसमज,अर्थसाक्षरता म्हणजे काय ?, अर्थसाक्षरता आणि शालेय शिक्षण,पैसा म्हणजे काय?, तुम्ही 'रॅट रेस'मध्ये सहभागी तर नाहीत ना ?, आयुष्यात खरंच पैसा हाच देव आहे का ?, तुमचे ध्येय खूप श्रीमंत होणे असावे की नसावे ? कुणीतरी तुमच्या पुढे सदैव असणार आहेच, हे स्वीकारा ! पैसे कमविण्याचे विविध मार्ग, जागतिक प्रश्न : मी काय करू ? नोकरी की व्यवसाय ह्या मुद्द्यावर आधारित वास्तवदर्शी माहिती देण्यात आली आहे.
      
   पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आर्थिक नियोजन या विभागात सर्वांचा अनुभव असा आहे की, याचा उहापोह केलेला आहे. अर्थ निरक्षर लोक आयुष्य कसे घालवतात ?, वयोपरत्वे होणाऱ्या आर्थिक चुका, यशस्वी आर्थिक नियोजनासाठीची चेकलिस्ट, आर्थिक नियोजनाचा फ्लोचार्ट !,ध्येयनिश्चिती- तुम्हाला आयुष्यात नेमके काय हवे आहे ?, गरजा विरुद्ध इच्छा यातील फरक समजून घ्या !, आर्थिक ध्येयनिश्चिती कशी कराल वयानुसार आर्थिक ध्येये, सर्व उद्दिष्टे स्मार्ट पद्धतीने निश्चित करा, तुमचे कष्टाचे पैसे कोठे जातात ?, बचत करणे लोकांना का आवडत नाही याची कारणे, बचत छोटी - शक्ती मोठी !, आणीबाणी निधी : तुमचा खरा दोस्त !, स्व-निधी (नेट वर्थ) म्हणजे काय?, वैयक्तिक बजेट म्हणजे काय रे भाऊ ?, वैयक्तिक बजेटचे विविध प्रकार, पैशावरून तुमची जोडीदाराबरोबर भांडणे होतात का ?, रेकॉर्ड कीपिंग, आर्थिक सल्लागाराचे महत्व, मृत्युपत्र आणि नामांकन या घटकावर माहिती आहे.
   
   पुस्तकाच्या तिसऱ्या विभागात विमा व कर्ज व्यवस्थापन यांची माहिती देण्यात आली असून यात विमा म्हणजे काय?,आयुर्विमा पॉलिसी म्हणजे काय?,विमा पॉलिसी आणि करबचत, जीवन विमा खरेदी करताना होणाऱ्या नेहमीच्या चुका कशा टाळाल ?, सर्वसाधारण विमा योजना (जनरल इन्शुरन्स), विमा आणि गुंतवणूक यातील फरक, पारंपरिक विमा योजना व मुदतीचा विमा : तुम्ही काय करावे ?, आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स), आरोग्य विमा खरेदी करताना होणाऱ्या नेहमीच्या चुका कशा टाळाल ?, कर्ज व्यवहार कसा चालतो ?, ईएमआय म्हणजे काय ?, चांगले कर्ज विरुद्ध वाईट कर्ज, क्रेडिट कार्ड संकल्पना, क्रेडिट कार्डचा वापर योग्य पध्दतीने कसे वापराल?, कर्जबाजारीपणाची लक्षणे, तुम्ही कर्जबाजारी तर नाही ना?, लवकर कर्ज मुक्त का व्हावे?,कर्जमुक्त कसे व्हावे?, २५ वर्षांचे कर्ज १० वर्षांत कसे फेडावे ?, गृहकर्ज - लवकर परतफेड की गुंतवणूक? या घटकाच्या आधारे माहिती देण्यात आली आहे.
  
  "अर्थसाक्षर व्हा" या पुस्तकाच्या चौथ्या भागात गुंतवणूक या विभागात गुंतवणुकीचा श्रीगणेशा !, आर्थिक स्वातंत्र्याच्या सहा पायऱ्या, बचत व गुंतवणूक यातील फरक, महागाई - गुंतवणुकीला कशी कुरतडते ?, जगातले आठवे आश्चर्य चक्रवाढ व्याज, गुंतवणुकीचे मुलभूत नियम, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुंतवणूक कशी कराल?, गुंतवणूक कधी, कुठे, कशी?, सोने गुंतवणूक, रिअल इस्टेटः रिअल संपत्ती, घरः विकत घ्यावे की भाड्याने राहावे?, लवकर गुंतवणूक का सुरू करावी?, केवळ करबचतीसाठी गुंतवणूक नको ! या घटकाचा समावेश आहे.
      
   पुस्तकाच्या पाचव्या भागात शेअरबाजार या विभागात शेअर बाजार: सर्वश्रेष्ठ गुंतवणूक पर्याय आहे का?, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी, सेन्सेक्सचा रोमहर्षक प्रवास, सेन्सेक्सच्या प्रवासातील महत्वाचे टप्पे, शेअर बाजाराचा इतिहास, शेअर्स म्हणजे काय? - प्राथमिक माहिती, सर आयझेंक न्यूटन यांना मिळालेला शेअर मार्केटचा धडा, शेअर बाजाराबद्दलचे गैरसमज, शेअर बाजारातील यशासाठी सुवर्णनियम, शेअर ट्रेडिंग आणि शेअर गुंतवणूक यात काय फरक आहे ?, इंट्रा-डे ट्रेडिंग म्हणजे जुगार आहे का?, भारतीय शेअर बाजाराचे भवितव्य काय असू शकते?, म्युच्युअल फंड म्हणजे काय?, म्युच्युअल फंडाचा इतिहास, म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे तोटे, म्युच्युअल फंड वि. थेट शेअर्समधील गुंतवणूक, म्युच्युअल फंड वि. बँक ठेवींतील गुंतवणूक, म्युच्युअल फंड वि. पीपीएफधील गुंतवणूक, म्युच्युअल फंडाचे प्रकार, एनएफओ मध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना ही माहिती नक्की तपासा, एसआयपी (सिस्टीमॅटिक इंवेस्टमेंट प्लॅन), शेअर बाजाराला बीटकॉईनची स्पर्धा? या घटकाचा समावेश आहे. पुस्तकात ठीक ठिकाणी अनुरूप अशी चित्रे, चार्ट यांचा समावेश केल्यामुळे हा विषय समजण्यास सोपा झाला आहे.
   
  या पुस्तकाच्या सहाव्या विभागात फसव्या योजनांपासूनच सावधान ! या अंतर्गत पॉन्झी स्कीम्स फसवणूक करणाऱ्या योजना!, पॉन्झी योजनांची ठळक वैशिष्ट्ये, पॉन्झी योजनांपासून वाचण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल?, पिरॅमिड योजनांची वैशिष्ट्ये, शेअर बाजाराच्या नावाने होणारी फसवणूक, फ्रॉड फोन कॉल, नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक, सोशल मीडिया फसवणूक याची माहिती दिली आहे. पुस्तकाच्या शेवटी आर्थिक संकल्प दिलेला आहे. तुमचे अनेक संकल्प असतील या संकल्पनांमध्ये अजून एक संकल्प करा तो म्हणजे आर्थिक नियोजनाचा, आर्थिक नियोजन कसं करायचं या संदर्भात काही महत्त्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे पुस्तक वाचकाला अर्थसाक्षर करते हे निश्चित...!


Arthsakshar vha

"अर्थसाक्षर व्हा"
लेखक : सीए अभिजित कोळपकर
मूल्य : ४००/- , पाने : ३८९
artha.abhik@gmail.com
अर्थसाक्षर. कॉम

मधुश्री पब्लिकेशन
प्रकाशक : शरद अष्टेकर
७०३, भगवंत कृपा बिल्डिंग, पहिला मजला, दै. सकाळ कार्यालयासमोर, बुधवार पेठ, पुणे : ४११००२


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...