name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): March 2024

नाशिकला उभे राहणार मल्टीमोडल हब (Multimodal hub to be built at Nashik)

नाशिकला उभे राहणार मल्टीमोडल हब
Multimodal hub to be built at Nashik

Nashikla ubhe rahnar multimodel hub

केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमातंर्गत निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेत 'मल्टीमोडल हब' होणार आहे. 

  • निफाड तालुक्यात ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय रस्ते वाहतूक व बंदरे विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. 
  • त्यानंतर ड्रायपोर्टबाबत केंद्र सरकारच्या धोरणात बदल झाल्यामुळे निफाड येथे ड्रायपोर्ट उभारता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. 

  • जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने कंटेनर डेपोबाबत  धोरणात्मक बदल करून या जागेवर मल्टीमोडल हब उभारण्याची तयारी दर्शवली. 
  • त्यानुसार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी संयुक्तपणे ५०० कोटींची गुंतवणूक असलेला मल्टीमोडल हब हा प्रकल्प राबविण्याची तयारी दर्शविली मल्टीमोडल हबचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. 

  • निफाड सहकारी साखर कारखान्याच्या या जागेपासून रेल्वे आणि महामार्ग अगदी दहा किलोमीटरच्या आत उपलब्ध आहेत. 
  • या प्रकल्पात कस्टम पॅकेजिंग, हँडलिंग अशा सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे जेएनपीटी  येथे होणाऱ्या या सुविधेकरीताचा वेळ वाचेल. या केंद्रामुळे कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्यासह औद्योगिक उत्पादनांची निर्यात सुलभ होईल.
  • जिल्ह्याच्या विशेषतः निफाड, दिंडोरी, नाशिक, सिन्नर, येवला या तालुक्यांच्या अर्थकारणाची दिशा बदलून विकासाला चालना मिळेल.


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

शेतकरी' ते 'निर्यातदार' वाटचाल (Farmers' to 'exporters' move!

 शेतकरी' ते 'निर्यातदार' वाटचाल! 

Farmers' to 'exporters' move!

"फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स" व "सह्याद्रि फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड", नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यातील "कृषिमाल निर्यात परिषद" (Agri Export Conclave) ला महाराष्ट्रातून तरुण शिबिरार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Farmers' to 'exporters' move!

           पुणे येथील 'फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स' ही संस्था गेली बारा वर्षांपासून 'शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास' हे एकमेव उद्दिष्ट घेऊन कार्यरत आहे. त्यामध्ये 80% काम हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर टीकात्मक असते. ज्याला आम्ही 'Constructive Criticism' म्हणतो. ज्यामुळे देश पातळीवर धोरणात्मक निर्णय/ बदल होऊ शकतात. 20% विधायक कामामध्ये महिला बचत गट सक्षमीकरण, शेतकरी उत्पादक कंपनी प्रशिक्षण, जल परिषद, कार्बन क्रेडिट, कृषी पर्यटन वगैरे विविध उपक्रम असतात.

        शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात तयार झाल्यात. पण त्यांना पुढे काय करायचे हे न समजल्यामुळे त्यापैकी बऱ्याच बंद पडल्या आहेत. इन ऍक्टिव्ह झाल्या आहेत. त्यांना समजत नाही की काय करावे. कृषीमाल निर्यातीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करण्यासाठीचे सध्या अनुकूल वातावरण आहे व भविष्यात त्याला भरपूर वाव (पोटेन्शिअल) आहे. त्यांच्यासाठी, तसेच ग्रामीण भागातील उच्चशिक्षित बेरोजगार, आय. टी, इंजिनिअर, कृषि पदवीधरांना निर्यात क्षेत्रात उद्योजक बनण्याची सुवर्ण संधी आहे. विशेष म्हणजे कमीत कमी भांडवलामध्ये आपण 170 देशांमध्ये निर्यात करू शकतो.

         *ह्या परिषदेची मध्यवर्ती कल्पना (Centralised Theme) 'शेतकरी' ते 'निर्यातदार' वाटचाल अशी आहे. हा काही इव्हेंट नाही तर तुमच्या पुढील खडतर वाटचालीची सुरुवात आहे. या परिषदेमध्ये सर्व प्रश्न सुटणार नाहीत. त्याला पुढचा अभ्यास, तज्ञांच्या भेटीगाठी, कृती तुम्हालाच करावी लागेल. या प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आहोतच.

       या बिझनेस मध्ये खूप Misconceptions, Misunderstandings, गैरसमज व काल्पनिक भीती आहेत. उदाहरणार्थ फक्त सेंद्रियच माल निर्यात करता येतो. किंवा माझ्याकडे कमी माल आहे मी कशी निर्यात करू शकतो. माझी आर्थिक फसवणूक होईल का? वगैरे. पण मित्रांनो, *दहा ग्रॅमच्या केशरपासून ते 40 फूट कंटेनर मध्ये 46 टनापर्यंत, तसेच कोथिंबिरीपासून जिवंत बोकडापर्यंत तुम्हाला निर्यात करता येते.

Farmers' to 'exporters' move!

        निर्यातदार होण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत त्याबद्दल तज्ञ मार्गदर्शन करतीलच. उदाहरणार्थ,

# कंपनी तयार करणे. (Registration of Firm)

#  कंपनीची व प्रॉडक्टची आकर्षक वेबसाईट व विविध व्हिडिओ तयार करणे.

# सरकारच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर नाव नोंदणी करून मेंबरशिप घेणे. ज्यामुळे तुम्ही जगाला दिसू शकता.

- APEDA (Agriculture & Processed Food Product Export Development Authority)

- DGFT (Directorate General of Foreign Trade)

- COO ( Common Digital platform for issuance of certificate of origin)

# प्रॉडक्ट निवडणे - तुमचा इंटरेस्ट, त्या भागातील उत्पादन, perishable / nonperishable वगैरे

# IEC- Importer - Exporter Code घेणे.

# EDC- जवळपासच्या Sea/Air port मध्ये रजिस्टर करणे.

# त्याचबरोबर तुमच्या शेतमाल /प्रोसेसड प्रॉडक्टसाठी

 - FSSAI Certificate

  - फायटोसॅनिटरी (कीड रोगमुक्त प्रमाणपत्र). हे देण्याची सोय बारा जिल्ह्यामध्ये आहे.

  - कीडनाशक उर्वरित अंश (Residue free) टेस्ट करावे लागतील.

#  त्यानंतर ग्राहक Buyer शोधणे व त्यांची विश्वासार्हता, Reliability चेक करणे.

# आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून Proper  Commercial Terms and Conditions चा अभ्यास करणे जरुरी आहे. उदाहरणार्थ 50% ऍडव्हान्स आणि 50% payment against LC लेटर ऑफ क्रेडिट वगैरे.

# सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या मालाची किंमत ठरवणे, निगोसिएशन्स व प्रॉफिट ठरवणे. आपली क्वालिटी, ब्रँड व्हॅल्यू व hidden, contingency चार्जेस गृहीत धरावे लागतील.

वेगवेगळ्या कंडिशन्स असतात.

FOB - Free on Board

CFR - Cost & Fright

CIR- Cost, Insurances & Fright

# Mode of Despatch ठरवणे

      उदाहरणार्थ,  नेपाळ आणि भुतानला बाय रोड निर्यात करू शकतो. नेपाळ जवळपास 65 टक्के आयात भारताकडून करतो. काही ठिकाणी बाय ट्रेन आहे (किसान रेल), विमानाने, जहाजाने किंवा फ्रोजन कंटेनर. त्या प्रमाणे sea worthy पॅकिंग,  प्रि- ट्रीटमेंट महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, माल पोहचण्यासाठी दहा दिवस लागणार असतील तर कांद्याला रेडिएशन ट्रीटमेंट करतात.

आपल्या या अभ्यासाचा फायदा दोन्हीकडे होऊ शकतो. डोमेस्टिक एक्सपोर्ट (भारतातील 141 कोटी ग्राहक) व इंटरनॅशनल एक्सपोर्ट.

आमचा हा पण प्रयत्न असणार आहे की जे यशस्वी निर्यातदार आहेत ते इतर शेतकऱ्यांकडून माल घेतील व निर्यात करतील. म्हणजे त्यांची पण bulk quanitity वाढेल व इतर शेतकऱ्यांना पण फायदा होईल.

Farmers' to 'exporters' move!
*निर्यातीसंदर्भात तुमच्या काही मागण्या / अडचणी* असतील तर आम्हाला कळवा. आम्ही सरकारकडे त्याचा पाठपुरावा करू. उदाहरणार्थ, जसे एनजीओ साठी ऑडिट करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट असतो. किंवा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी कंपनी सेक्रेटरी असतो. तसे एक्सपोर्टचे सर्व रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंटेशन, प्रोसेस करण्यासाठी सिंगल विंडो ऑथॉरिटी ची जरुरी आहे. प्रत्येकाला या सगळ्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही.

शेवटचा मुद्दा असा आहे की आपले सरकार जसे वेगवेगळ्या देशांबरोबर दीर्घकालीन आयात करार करतात. उदा. मलेशिया बरोबर पाम तेल. तसेच त्यांनी निर्यात करार करावे. व शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेण्याची यंत्रणा विकसित करावी, अशी आपली मागणी आहे.

आमचा असा प्रयत्न राहील की तुमच्यापैकी काही लोकांना आम्ही Hand holding करून तज्ञामार्फत मार्गदर्शन करू. तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद!

सतीश देशमुख, B.E. (Mech.),                          अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स, पुणे  

Blogger deshmukhsk29.blogspot.com

 


माझ्या मनातील कविता...(Poems in my mind)

माझ्या मनातील कविता...
Poems in my mind 
Mazya manatil Kavita

माझ्या मनातील कविता 
हृदयातून शब्दात पाझरते, 
कविता दिनीच नव्हे तर 
रोजच ती लिहिली जाते...

माझ्या मनातील कविता 
कल्पनेची खाण जणू, 
काय तिची महती 
कसे मी काय वर्णू... 

माझ्या मनातील कविता 
कागदावरच जन्म घेते, 
मग डिजीटल स्वरुपात 
सादरीकरण केले जाते...

माझ्या मनातील कविता 
टिपते मनातील भावभावना, 
तुटून पडते अन्यायावर 
साधना राहो अशीच कामना...


© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

जागतिक मूत्रपिंड दिन (World Kidney Day)

जागतिक मूत्रपिंड दिन
World Kidney Day

Jagtik mutrapind din


   आंतरराष्ट्रीय मूत्रपिंड संस्था व आंतरराष्ट्रीय मूत्रपिंड पायाभूत परीषद या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मूत्रपिंड दिन हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक पातळीवर साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस १४ मार्च रोजी, गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे.

  हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश जनसामान्यांमध्ये मूत्रपिंडाच्या कार्य व त्याचे रोग याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. जनसामान्यांबरोबरच आरोग्य क्षेत्रातील सर्व व्यक्ति यांना ही मूत्रपिंडाच्या विविध रोगांबद्दल सतर्क राहून त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये योग्य त्या चाचण्या करून मूत्र‌पिंडाच्या रोगाचे त्वरीत निदान करण्याबद्दल जागृत करणे हा  दिवस साजरा करण्यामागचा एक उद्देश आहे.

Jagtik mutrapind din

हा दिवस २००६ पासून दरवर्षी साजरा केला जातो. त्या दिवशासाठी एक ब्रिदवाक्य घोषित केले जाते आणि त्या दिवशी आणि त्या वर्षीच्या घोषवाक्यानुसार मूत्रपिंडाच्या रोगाबद्दल जनजागृतीचे कार्य केले जाते. त्यात जनसामान्यांसाठी आरोग्य विषयक भाषणांचे आयोजन, काही मूत्रपिंडाच्या चाचण्या आणि तपासणीसाठी शिबिरे, मूत्रपिंड अकार्यक्षम झालेल्या रुग्णांना उपचारासंबंधी मार्गदर्शन आणि  जनसामान्यांचे मूत्रपिंडाचे संरक्षण करण्यासंबंधीचे मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.

 या माध्यमातून जनतेमध्ये मूत्रपिंडाचे संवर्धन कसे करायला हवे व अकार्यक्षम मूत्रपिंड या रोगापासून स्वतः चा बचाव कसा करावा यांची लोकजागृती होते. गेल्या जवळपास १७-१८ वर्षात अनेक घोषवाक्य देण्यात आली. या वर्षी निरोगी "मूत्रपिंड सर्वांसाठी" (Kidney Health for All)  या घोषवाक्याअंतर्गत सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना मूत्रपिंडरोगाच्या आजारांवरील उपचारासाठी समान संधी उपलब्ध करून देण्याविषयी प्रयत्न केले जाणार आहेत. 

Jagtik mutrapind din

  मोठ्या शहरांत व जिल्हयांमध्ये जशा सोयी उपलब्ध असतात तशाच सोयी छोट्या गावांमध्येही उपलब्ध केल्या जाण्याच्या योजना मूत्रपिंड संस्था, मूत्रपिंडरोग तज्ञ आणि शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे मूत्रपिंडाच्या रोगाचे लवकर निदान होऊन योग्य ते - उपचार दिल्यामुळे जनसामान्यांना अकार्यक्षम मूत्रपिंड टाळता येईल.

डॉ. देवदत्त चाफेकर, 

कन्सल्टंट, नेफरोलाँजिस्ट अँड ट्रान्सप्लांट फिजिशियन, 

सुप्रिम किडनी केअर, नाशिक

संकलन

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

परफेक्ट कृषी मार्केटयार्डचा दशकपूर्ती सोहळा संपन्न (Ten year complete celebration of Perfect Agriculture Marketyard )

परफेक्ट कृषी मार्केट यार्डचा 

दशकपूर्ती सोहळा संपन्न 

Ten year complete celebration of Perfect Agriculture Marketyard 

नाशिक : कृषी पणन सुधारणा कायद्यान्वये २०१२ मध्ये जिल्ह्यात परफेक्ट नावाने पहिले खासगी मार्केट यार्ड सुरू झाले होते. 

Ten year complete celebration of Perfect Agriculture Marketyard

परफेक्ट कृषी मार्केट यार्ड प्रायव्हेट लिमिटेड ही एक गैर-सरकारी कंपनी असून याची स्थापना १९ जानेवारी २०१२ रोजी झाली. सध्या या मार्केट यार्डचे  कामकाज सक्रिय असून  या मार्केट यार्डच्या संचालक मंडळात श्री. बापू पिंगळे, दीपक पिंगळे, देविदास निमसे आणि सोमनाथ निमसे यांचा समावेश आहे.

परफेक्ट मार्केट यार्डचा दशकपूर्ती सोहळा ७ मार्च (गुरुवारी) रोजी पार पडला त्यानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ्य शेतकऱ्यांचा सन्मान तसेच कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ‘सह्याद्री फार्मर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनीही या मेळाव्याला मार्गदर्शन केले.

छत्रपती संभाजीनगर रोडवरील नांदूर शिवारातील मार्केट यार्डात  संपन्न  झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती लाभली. ते या मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले, शेतीत शास्त्रोक्त पद्धतीने कामकाज केलेच पाहिजे. शेतीविषयक वाचन शेतकऱ्यांनी केले पाहिजे. कृषी विभागात जाऊन योजनांची माहिती घेतली पाहिजे. जर महिलांच्या नावावर शेती असेल तर ८० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकार शेतीत मोठी गुंतवणूक करत आहे. त्यामुळे शेतीविषयक योजनांची माहिती करून घ्यावी . 

ड्रोन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकरी आता खते देण्यासह फवारण्या करू शकतो. तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणले कि, शेतकऱ्यांनी आपली मते मांडली पाहिजेत, ती मते लोकप्रतिनिधींसमोर येतात. शेतकऱ्याला माल पिकवता येतो. मात्र विकता येत नाही. त्यामुळे दर आणि बाजारपेठांचा आढावा घेऊनच मालाची विक्री करायला हवी. त्यामुळे शेतीत शिकलेला माणूस आला तरच शेती क्षेत्राची प्रगती होईल, बिना शिकलेल्या माणसाची शेती राहिली नाही, अर्थसंकल्पात शेतीविषयी कोणत्या सुविधा दिल्या आहेत त्या शेतकन्यांना समजून सांगण्यासाठी अशा मार्केट यार्डच्या माध्यमातून प्रदर्शन भरविले गेले पाहिजे असेही ते म्हणाले. 

केंद्र सरकारतर्फे दहा हजार फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढण्यास परवानग्या देण्यास तयार आहे. पण या कंपन्या काय आहेत. हेच अजून कळले नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनाच  फायदा होत आहे. अशा कंपन्या शेतकऱ्यांनी  काढल्यास ज्या  शेतमालाला हमीभाव आहे, तो शेतमाल खरेदी करता येणार आहे. सरकारकडून प्रत्येक गावाला ड्रोन दिला जाणार आहे. त्याचे महिलांना प्रशिक्षण दिले आजार आहे. विम्याच्या माध्यमातून सरकारने शेतीत गुंतवणूक केली आहे. केवळ एक रुपयात पीक विमा काढण्यात येत आहे.फार्मर प्रोडयुसर कंपन्या व शेती अवजारांवर सबसिडी आहे. शेतीसाठीच्या योजना शेतकऱ्यांना माहीत करून दिल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले. 

Ten year complete celebration of Perfect Agriculture Marketyard

या शेतकरी मेळाव्याला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, परफेक्ट कृषी मार्केट यार्डचे संचालक बापू पिंगळे, राधाकिसन पठाडे, दामोदर मानकर, नाना करपे आदी उपस्थित होते.

डांगी गायीच्या संवर्धनासाठी डांगी गोपालन संघटन Dangi Gopalan Sanghatan for the conservation of Dangi cow

 डांगी गायीच्या संवर्धनासाठी
डांगी गोपालन संघटन
Dangi Gopalan Sanghatan for the conservation of Dangi cow

  नाशिक जिल्हा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथे श्री. योगेश ज्ञानेश्वर महाले यांनी डांगी गोपालन संघटन उभे केले आहे. 


Dangi gopalan sanghtan


डांगी गोवंशावर काम

सुरवातीला त्यांनी आपल्या भागातीलच स्थानिक असलेल्या डांगी गोवंशावर काम करण्याचे ठरविले. लुप्त होत चाललेल्या देशी डांगी गोमातेचे संवर्धन त्यांनी केले असून सोबत काही उत्पादनेही निर्मित केले आहेत. गोमूत्र, शेण, घन जीवामृत, द्रव जीवामृत ते तयार करतात. अगदी माफक दरात ही उत्पादने विकत असल्याचे त्यांनी सांगितले. 


उत्पादनांची निर्मिती

जमिनीस उपयुक्त जिवाणूंचा भंडार म्हणजे डांगी घनजीवामृत, द्रव जीवामृत हे आहेत. देशी डांगी गाईचे शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून घन जीवामृत आणि द्रव जीवामृत बनवले जाते. कमी दुधाचे प्रमाण त्यामुळे डांगीच्या गोमुत्र आणि शेणामध्ये असंख्य उपयुक्त जिवाणू असतात जे जमिनीला सुपीक बनवतात आणि झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत असल्याचे श्री.महाले यांनी सांगितले. द्रव जीवामृत आणि घन जीवामृत याचा वापर परसबाग, कुंडीतील रोपे आणि सर्व प्रकारची शेती यासाठी केला जातो.  घन जीवामृत वापरण्याचे प्रमाण एका रोपासाठी ८० ते १०० ग्रॅम असून  द्रव जीवामृतचे प्रमाण एका रोपासाठी ५० ते ८० मी.ली.असून त्यात आवश्यक तितके पाणी मिसळून सोडावे असे श्री. महाले म्हणाले. 


डांगी गोपालनाची सुरुवात

श्री. महाले पुढे म्हणाले की, जर्सी ही गाय नसून गाई सदृश्य विदेशी प्राणी आहे. या विदेशी प्राण्याचे विषारी दूध विकून अनेक जण आज पैसा कमवित आहे. जर्सी दुधाच्या अर्थव्यवस्थेने प्रादेशिक गौवंश बाटविला, घटविला जात आहे म्हणून आम्ही डांगी गोपालन करत असल्याचे ते म्हणाले. आम्ही डांगी गोपालक संघटन वाढोली येथे सुरू केले असून  आमच्यासारखे थोडे गौपालक दुधाची अपेक्षा न करता शुद्ध स्वरूपात प्रादेशिक गौवंश सांभाळीत आहेत. गीर, सहेवाल सारख्या भारतीय गौवंशाच्या जास्त दूध देण्याच्या क्षमतेमुळे त्यांना जगण्याचा संघर्ष नाही. पण कमी व दूध न देणाऱ्या भारतीय प्रादेशिक गौवंशाला जगण्याचा अधिकार नाही का? असा सवालही त्यांनी व्यक्त केला आहे. 


प्रादेशिक गौवंश उपयुक्त 

कमी व दूध न देणारा भारतीय प्रादेशिक गौवंशच खरेतर या देशाच्या मातीसाठी व पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण कमी दूध देणाऱ्या गाईंची सर्व ऊर्जा तीच्या शेण, गौमूत्रात एकवटली जाते. कमी दूध देणाऱ्या भारतीय प्रादेशिक गौवंशाच्या एक ग्राम शेणात २०० ते ४०० कोटी अत्यंत उपयुक्त जीवाणू असतात व आमच्या डांगी गौपालक, वाढोली संघटनेच्या शुद्ध स्वरूपात जतन केलेल्या ३०० पेक्षा जास्त डांगी गाई डोंगरावरील वनस्पती खाऊन मोकळ्या सूर्यप्रकाशात फिरतात यामुळे या गाईचे शेण व गौमूत्र म्हणजे या धरतीसाठी अमृतरुपी औषधच असल्याचे श्री. महाले यांनी स्पष्ट केले. 


श्री.योगेश महाले 


गोमूत्रापासून बनविलेले जीवामृत

शेणखतापेक्षा अधिक परिणामकारक डांगी गाईच्या शेण गोमूत्रापासून बनविलेले घनजीवामृत, जीवामृत आपल्या जमिनीत, परसबागेत मातीतील जीवांची संख्या वाढवून ह्यूमसची निर्मिती करण्यास मदत करतात व कुठलेही खत न वापरता विषमुक्त, रसायनमुक्त भरघोस पिक घेता येते हे सिद्ध झालेले आहे. दोन दिवसांच्या दुधाचे पैसे शुद्ध स्वरूपात प्रादेशिक गौवंश जतन करणाऱ्या गोपालकांच्या मातीसाठी अत्यंत उपयुक्त उत्पादने विकत घेऊन सहकार्य केल्यास प्रादेशिक गौवंश जगेल व आपली जमीनही जगवेल.


संकरीत गायीपेक्षा सरस

श्री. महाले यांनी सुरवातीला डांगी जातीचा अभ्यास केला. यावेळी त्यांना असे दिसले की डांगी गायीवर मुळातच शास्त्रोक्त पध्दतीने संशोधन कमी झालेले आहे.  मार्केटसुध्दा स्थानिक असल्याने व ही गाय देशी व संकरीत गायीपेक्षा सरस वाटल्याने त्यांनी या गायीची निवड केली. कारण जास्त पावसाच्या आणि डोंगराळ भागातील जास्त आद्रतेच्या वातावरणात तग धरण्याची क्षमता या जातीमध्ये असते. आणि ती अशा परिस्थितीत सुद्धा आजारी पडत नाही. दर १४ ते १५ महिन्याला एक असे अनेक वेत ती देते. बैल डोंगराळ भागात शेतीची कामे, ओढ कामे अतिशय उत्तमरीत्या करतात. म्हणून बैलाला सुद्धा मागणी असते.


डांगी गाईचे व्यवस्थापन

  डांगी गाईचे पारंपरिक व्यवस्थापन आणि संगोपन यातील बारकावे श्री.महाले यांनी समजून घेतले. डांगी हा देशी गोवंश शेती आणि ओढ कामासाठी प्रामुख्याने वापरली जाणारी जात असली तरी त्यातील काही गाई ह्या जास्त दूध देण्याच्या क्षमता असणाऱ्या आहे असे श्री.महाले यांना निरीक्षणावेळी दिसून आले. त्याचबरोबर येणाऱ्या काळात बैलाचे शेतीतील महत्त्व कमी होत असले तरी मनुष्याला, जगाला दुधाची आवश्यकता भासणार आहेच. 


ओढ कामातील बैलाचे महत्त्व कमी

पारंपरिक पद्धतीने डांगी गाईच्या पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या वळूची निवड ही शेती आणि ओढ कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलाची शारीरिक ठेवणेनुसार केली जाते. परंतु, गाईचे दूध उत्पादन हे दुय्यम गोष्ट आहे हे लक्षात आले. त्यानुसार जास्त दूध उत्पादनक्षमता असलेल्या गाईच्या शारीरिक ठेवण नुसार असलेले वळू कसा असावा हे निश्चीत केले. कारण आता डांगी गाय जगवायची म्हणजे त्यातून दूध निर्मिती वाढली पाहिजे आणि शेतीतील व ओढ कामातील बैलाचे महत्त्व आधुनिकीकरणानुसार जवळपास संपलेले किंवा कमी झालेले आहे. तसेच जास्त पाऊस पडत असलेल्या डोंगराळ भागात, जास्त आद्रतेच्या भागात, मुबलक प्रमाणात दूध देणारी गाय तयार होऊ शकते हे जाणले. 


पैदाशीची शास्त्रशुद्ध आखणी

दूध देणाऱ्या गाई आणि जास्त दूध देणाऱ्या गाईच्या शरीररचनेत बदल आत्मसात करत त्याचे निरीक्षण काटेकोर केल्यानंतर असे अनेक गुण जे बाहेरून दिसतात, त्याचा दूध उत्पादन क्षमतेशी संबंध कसा व का आहे, हे गणित पक्के झाले. आणि त्या गुणवैशिष्ट्यांची यादी केली. यामध्ये प्रामुख्याने नाकपुड्यांची ठेवण, चेहऱ्याची लांबी निंबोली, शिंगाचे प्रकार, शिंगाचा आकार,शिंगाच्या टोकांची दिशा, डोळ्यांची ठेवण, कपाळाची ठेवण, मानेची लांबी, त्वचा रंग, व वंशिड, शरीराचा आकार, शेपटी, कमरेचा चौक, मागील पायांची ठेवण, अंगावरील केस, भवरे, गळवंट, कासेची ठेवण, सडांचे प्रकार, सडांची ठेवण, दुधाची शीर इत्यादी प्रत्येक बाह्मगुणाचे वेगवेगळे उपप्रकार आणि त्याची जास्त दूध देणाऱ्या आणि कमी दूध देणाऱ्या गाईमध्ये आढळण्यानुसार वर्गवारी केली, त्यानुसार गाईची निवड करून वंशवळीनुसार त्यांच्या पैदाशीची शास्त्रशुद्ध आखणी केली आणि सुरुवातीलाच  गाई आणि वळू यांच्यापासून पुढे जाण्याचे ठरवले आणि डांगी गोपालन संघटन वाढवले. त्यांना या कामी श्री. दत्तू महाले, अंकुश महाले इ. ची मदत लाभत आहे.

© दीपक केदू अहिरे
नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************



सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...