नाशिकला उभे राहणार मल्टीमोडल हब
Multimodal hub to be built at Nashik
केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमातंर्गत निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेत 'मल्टीमोडल हब' होणार आहे.
- निफाड तालुक्यात ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय रस्ते वाहतूक व बंदरे विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.
- त्यानंतर ड्रायपोर्टबाबत केंद्र सरकारच्या धोरणात बदल झाल्यामुळे निफाड येथे ड्रायपोर्ट उभारता येणार नसल्याचे स्पष्ट झाले.
- जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने कंटेनर डेपोबाबत धोरणात्मक बदल करून या जागेवर मल्टीमोडल हब उभारण्याची तयारी दर्शवली.
- त्यानुसार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी संयुक्तपणे ५०० कोटींची गुंतवणूक असलेला मल्टीमोडल हब हा प्रकल्प राबविण्याची तयारी दर्शविली मल्टीमोडल हबचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला.
- निफाड सहकारी साखर कारखान्याच्या या जागेपासून रेल्वे आणि महामार्ग अगदी दहा किलोमीटरच्या आत उपलब्ध आहेत.
- या प्रकल्पात कस्टम पॅकेजिंग, हँडलिंग अशा सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे जेएनपीटी येथे होणाऱ्या या सुविधेकरीताचा वेळ वाचेल. या केंद्रामुळे कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्यासह औद्योगिक उत्पादनांची निर्यात सुलभ होईल.
- जिल्ह्याच्या विशेषतः निफाड, दिंडोरी, नाशिक, सिन्नर, येवला या तालुक्यांच्या अर्थकारणाची दिशा बदलून विकासाला चालना मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा